शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शिथिल व्हा आणि सहज राहा; समर्पण ही ताकद! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 19:08 IST

‘समर्पण’ या शब्दाचे दोन पैलू आहेत. एक आहे ‘समर्पण’ शब्दाचा पौर्वात्य पैलू तर दुसरा पाश्चात्य दृष्टिकोनातून येणारा. एक प्रकार आहे तो पराभूत झाल्याने केलेले समर्पण. गुलाम स्वत:ला समर्पित करतात.

- श्री श्री रविशंकर‘समर्पण’ या शब्दाचे दोन पैलू आहेत. एक आहे ‘समर्पण’ शब्दाचा पौर्वात्य पैलू तर दुसरा पाश्चात्य दृष्टिकोनातून येणारा. एक प्रकार आहे तो पराभूत झाल्याने केलेले समर्पण. गुलाम स्वत:ला समर्पित करतात. ते हृदयातून केलेले समर्पण नसते, तर ते केवळ आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक दुबळेपणामुळे केलेले असते. त्यांना दुबळेपणामुळे वश केले जाते. आता आध्यात्मिक दृष्टीने याचा पूर्णपणे वेगळाच अर्थ आहे. तुम्ही नकारात्मक भावना आणि नकारात्मक गुणांनी त्रस्त होत असता आणि त्याला तसेच बाळगणे ही अजून मोठी पीडा असते. ती नकारात्मकता सोडून देणे, जी अजून सहणे, हाताळणे अशक्य आहे, तिला आध्यात्मिक दृष्टिकोनातून ‘समर्पण’ असे म्हटले जाते. हे पूर्णत: वेगळे आणि पाश्चात्य प्रकारच्या पराभव अर्थाच्या  समर्पणाच्या अगदी विरु द्ध आहे. हा समर्पणाचा प्रकार म्हणजे त्याला जिंकून घेणे आहे. तुम्ही नकारात्मकता सोडून देऊन, त्याला दूर सारून त्यावर, स्वत:वर, आपल्या मनावर मात केली आहे. म्हणून आध्यात्मिक दृष्टीने समर्पण म्हणजे ताकत व सामर्थ्य होय, गुलामगिरी नव्हे. यामुळेच जेव्हा तुम्ही वैष्णव मंदिरात जाता, तेव्हा ते  शरणागती म्हणतात, ज्याचा अर्थ आहे भगवंताला समर्पण. जेव्हा तुम्ही अशी शरणागती करता, तेव्हा तुमच्या डोक्यावर एक चांदीचा मुकुट ठेवला जातो. या मागचा आध्यात्मिक भाव असा आहे की, जर तुम्ही आपली नकारात्मकता समर्पित केलीत, तर तुम्ही एखाद्या राजासारखे सामर्थ्यशाली बनता. कन्नडमध्ये एक म्हण आहे, शरणा शरणार्थी. म्हणजे जो शरण गेला आहे, त्याला मी शरण जातो. इथे संतांना शरण गेलेले म्हणजेच ‘समर्पित’ असे म्हटले आहे आणि संत हे सर्वात सामर्थ्यवान आणि आदरणीय असतात. कारण त्यांनी आपली नकारात्मकता पूर्णपणे अर्पण करून, ते दिव्यतेला शरण गेलेले असतात. जेव्हा नकारात्मकता सोडून दिली जाते, तेव्हा आपण पूर्णपणे सकारात्मक असतो आणि हेच संतत्व आहे. जेव्हा तुम्ही आपल्या नकारात्मक गुणांचे आणि तुम्हाला नको असलेल्या सर्व गोष्टींचे समर्पण करता, तेव्हा तुम्ही शक्तिशाली बनता. तसेही, सर्व काही त्या विशाल चेतनेच्या, ब्रह्मांडाच्या अधीन आहे, हे लक्षात असावे. अर्थात, समर्पण करण्यासाठी फार धडपड करू नका. नाहीतर विचार करत बसाल, अरेरे, मी तर शंभर टक्के समर्पण करू शकत नाही किंवा व्वा, मी शंभर टक्के समर्पण करू शकतो. हे सारे मनाचे खेळ आहेत. हे सारे सोडा. शिथिल व्हा आणि सहज राहा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक