शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

गुणसंपत्ती हेच खरे वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 12:10 IST

ज्ञानाने संपन्न असणारा नेहमीकरिता कधीच गरिबीत राहत नाही आणि एखादा खूप वैभवशाली, समृद्ध आहे; परंतु मूर्ख असेल तर त्याच्याजवळ वैभव हे टिकून राहत नाही.

सर्वसामान्य लोक घरदार, जमीन, सुखसाधने आणि द्रव्य यालाच ऐश्वर्य समजतात; परंतु ऐश्वर्य मोजायचे असेल तर ज्ञान आणि कर्तृत्वात मोजायला हवे. कारण ज्ञानाने संपन्न असणारा नेहमीकरिता कधीच गरिबीत राहत नाही आणि एखादा खूप वैभवशाली, समृद्ध आहे; परंतु मूर्ख असेल तर त्याच्याजवळ वैभव हे टिकून राहत नाही. अशा प्रकारची अनेक उदाहरणे समाज जीवनात प्रत्ययास येतात.भगवंताने गुणांनाच महत्त्व दिले आहे. त्यासंबंधीचे एक उदाहरण दृष्टीसमोर येते. बलरामाची वत्सला नावाची मुलगी होती. ती दुर्योधन पुत्र लक्ष्मणास देण्याचे बलरामांनी ठरविले. कारण लक्ष्मण हा ऐश्वर्यशाली घरातील होता; परंतु ती वत्सला मुलगी अर्जुन पुत्र अभिमन्यू यास देण्याचे गोपालकृष्णांनी बलरामास सुचविले. बलराम म्हणाले, कृष्णा अभिमन्यू हा वनवासी आहे. त्याच्याजवळ वैभव नाही. काय उपयोग? परंतु कृष्णाने बलरामाची समजूत घालून वत्सला अभिमन्यूला दिली. कारण तो गुणाने श्रीमंत होता. गीतेनेसुद्धा गुणांनाच श्रीमंती संबोधिले आहे. जीवनामध्ये ज्ञान ही खरी संपत्ती आहे. कारण ज्ञानातून वैभव निर्माण होऊ शकते. वैभवातून ज्ञान निर्माण होण्याची काही खात्री नसते. हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच विद्यार्थी जीवनात गुणांचे भांडवल जमा करता आले पाहिजे. गुण संपत्तीनेच आपले जीवन समृद्ध होते आणि दुर्गुणामुळे जीवनाचे सूत्र पूर्णत: विस्कटून जाते.श्रीमद्भगवद्गीतेत संपत्तीचे दोन प्रकार सांगितले आहेत १) दैवी संपत्ती २) आसुरी संपत्ती. १६ व्या अध्यायात दैवी संपत्तीचे २६ गुण आहेत. दैवी संपत्तीचा पहिला गुण निर्भयता असून, शेवटचा गुण नम्रता आहे. दैवी संपत्तीला भरती आली तर जीवनाची दिवाळी होते. ओहोटी लागली तर जीवनाचे दिवाळे वाजते. दैवी संपत्तीमुळे प्रकृती संस्कृत होते. दैवी संपत्ती मिळविण्यासाठी रवींद्रनाथ म्हणतात आपण संपूर्ण शरणागती (प्रभूचरणी) स्वीकारली पाहिजे.आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक सुखानंदाचा नाश करणारे ६ दुर्गण आहेत.दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध : पारुष्यमेवचअज्ञानं चाभि जातस्य पार्थ संपदमासुरीम अ १६/४ (गीता)ह्यालाच आसुरी संपत्ती म्हटले आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरता, अज्ञानामुळे माणसाची दुर्गती होते. ज्ञानेश्वर माउली म्हणतात,धातयाही गेलिया शरण । त्रिदोषी न चुके मरणतथा तिहिंची दुही जाण । साही दोष हे ।।जीवनात दैवी गुण मिळविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्याकरिता शुद्ध स्वरूपी ज्ञान आणि दैवी संपत्तीवर श्रद्धाभाव जपला पाहिजे. भारतीय संस्कृतीने शुद्ध ज्ञानावर अधिष्ठित अनेक श्रद्धा सामाजिक मनात रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. गीताशास्त्राच्या मते चांगले कर्म करीत राहावे.एका छोट्या मुलाने ८५ वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला आंब्याचे झाड लावताना पाहिले. तो म्हणाला, ‘आजोबा! ह्या झाडाचे आंबे तुम्हाला खायला मिळणार नाही कारण तुमचे वयोमान खूप झाले. तेव्हा आजोबांनी उत्तर दिले, बाळ ज्या आंब्याची फळे मी खाल्ली ते झाड मी थोडेच लावले होते. कोणीतरी पूर्वजांनी लावले. त्यांचे हे सत्कर्म. आपल्या जीवनातील मोठी कामे याच विशाल दृष्टीतून होत असतात. फळाची अपेक्षा न करता श्रेष्ठ कर्म आपल्या जीवनात पूर्ण होतीलच असे नाही; पण सत्कर्म गुण जोपासला पाहिजे. कर्मापेक्षा कर्माकडे पाहण्याची आंतरिक दृष्टी महत्त्वाची. आपल्या सर्वच कर्मांनी ईश्वराची पूजा करावी. जीवनातील प्रत्येक काम ईश्वरार्पण भावनेने करावे. कर्म कोणत्या भावनेने करीत आहो, याला महत्त्व आहे. जेथे-जेथे श्रेष्ठता आहे, गुणांचा उत्कर्ष आहे, शील कर्माचे सौंदर्य आहे, तेथे-तेथे भगवंताचे अधिक तेज प्रगट झाले आहे.- ज्ञानेश्वर मिरगे(शेगाव) 

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक