शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मन ठरवते माणसाची विचारशैली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 11:54 IST

माणसाच्या मनात सतत विचारांचा गुंता सुरू असतो. शरीर व मन यांचा समतोल राखता आला पाहिजे. कारण मन चंचल, चपळ आहे. मनाला सतत सजग ठेवले पाहिजे. ‘मन’ प्रसन्न असले की अंत:करणातील भावही प्रसन्न असतात.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

माणसाच्या मनात सतत विचारांचा गुंता सुरू असतो. शरीर व मन यांचा समतोल राखता आला पाहिजे. कारण मन चंचल, चपळ आहे. मनाला सतत सजग ठेवले पाहिजे. ‘मन’ प्रसन्न असले की अंत:करणातील भावही प्रसन्न असतात. कारण मनाचे भाव आपल्या शरीरातील हालचालीवरून ओळखता येतात. अंत:करणातील चाललेली मनाची स्थिती-गती-लय ही स्वभावातून प्रकट होते. मनापासून हसणे व वरवर हसणे यातून त्याचे प्रात्यक्षिकीकरण आढळते. माणसाचे मनच आपली चांगली किंवा वाईट विचारशैली ठरवत असते. आपले मन कधीही दृढ असावे. त्यासाठी रोज सकाळी सूर्यस्नान केले पाहिजे. मनाला चेतना व स्फूर्ती देणारे सकाळीचे कोवळे ऊन मनाला प्रसन्न ठेवते. त्यालाच मनाची स्थिती कायम स्थिर ठेवता येते. थोडक्यात मनावर ताबा मिळवता येतो. मन सात्त्विक बनते. सात्त्विक मन भक्तिमार्गाचा अवलंब करते. मनातील वाकडेपणा दूर करण्यासाठी सात्त्विक मनाची गरज आहे.

सात्त्विक मन विचारांना शुद्ध करते. जीवन समृद्ध बनवून त्यातील वाईट विचारांना नष्ट करते. कारण आपल्या मनात जशी भावना असते तसेच त्याचे कर्म घडते. जसे कर्म घडते तसेच त्याला फळ मिळते. ज्याचे मन शुद्ध त्याची वाणी शुद्ध, विचार पवित्र असतात. म्हणून प्रत्येकाने दैनंदिन जीवन जगताना आपल्या नेहमीच्या व्यापातून एक-दोन तास तरी संतचरित्र वाचावेत. त्यामुळे ‘मन’ प्रफुल्लित होईल. प्रफुल्लित झालेले मन उत्तम कार्य करण्यास प्रेरणा देते. त्या मनाला बळही मिळते. कर्तव्यनिष्ठा व परोपकार वृत्तीवाढीस लागते. ज्ञानयोग-कर्मयोग व भक्तियोग यांचा सुंदर समन्वय त्या मनाला घडतो. त्यातून मनचिंतन केल्याने जीवन प्रकाशमान होते. मन आनंदी होते. आनंदी मन मानसिक शांती देते. समाधानी राहाते. समाधानी जीवन जगणे हीच खरी भक्ती किंवा उपासना ठरू शकते; पण त्यासाठी शुद्ध व सात्त्विक मनाची गरज असते.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक