शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

सकारात्मक विचारानेच जीवनात यशप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:09 IST

संत तुकाराम माऊलींनी अत्यंत मार्मिक स्वरूपात कर्माची फळे वरीलप्रमाणे वर्णन केली आहेत. मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर सद्विचार सद्वर्तन यांची कास धरून मोक्ष पंत आगमन करणे शक्य आहे.

- भालचंद्र संगनवारबीज तेंचि फळ येईल शेवटी ।लाभ हनितुटी ज्याची तया।।संत तुकाराम माऊलींनी अत्यंत मार्मिक स्वरूपात कर्माची फळे वरीलप्रमाणे वर्णन केली आहेत. मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर सद्विचार सद्वर्तन यांची कास धरून मोक्ष पंत आगमन करणे शक्य आहे. असे असतानादेखील काम, क्रोध, मद, मत्सर अशा गुणांचा अंगीकार केला जातो. आणि शेवटी काय तर हे कसे झाले यावर चिंता करीत बसतो. आयुष्यभराची कामे केली. त्याचे फळ निश्चितच प्राप्त होते. चांगल्या गोष्टी अंगीकार केल्यास चांगल्या गोष्टी दृष्टिक्षेपात येतात. 

पेरिलीया एरंड । ऊस मागील कवण्या तोंड ।। 

आपल्या शेतात जर एरंड लावले असेल तर ऊस येईल आणि मी त्याचा गोड रस तयार करण्याची अपेक्षा फक्त मूर्ख व्यक्तीच करतात. आपल्या आजूबाजूच्या विविध प्रवृत्ती दिसून येतात. सर्व वाईटच घडते आहे असे नाही. कित्येक व्यक्ती आणि प्रसंग या ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती देऊन जातात. बहुतांशी ध्येयवेडे समाजाच्या, निसर्गाच्या, परंपरेच्या वाढीसाठी रात्रंदिवस कष्ट करताना दिसतात. त्यांना कोणीही प्रेरित करीत नाही तर ते अंत:प्रेरणेने कार्य करताना दिसतात. ईश्वराचा पाईक या नात्याने चांगल्या विचारांनी ते प्रेरित असतात आणि समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. हे करीत असताना मात्र ते अत्यंत निर्विकार व निरागस पद्धतीने त्यांचे कार्य करतात. जसे काही मानवरुपात आगात शक्ती अवतरले आहे. या कार्याचा मात्र ते कधी दंभाचार, गर्व, मत्सर अथवा गवगवा करीत नाही. या उलट ते म्हणतात,

फोडीले भांडार धन्याचा हा माल ।तेथे मी हमाल भार वाही ।।

या भूमातेचे, निसर्गाचे व समाजाचे प्रत्येक प्राणिमात्राला अनंत उपकार आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत निसर्गावर व समाजावर अवलंबून राहावे लागते. त्यात स्वत:च्या श्रमाचा वाटा असणे क्रमप्राप्त आहे. तो श्रमाचा वाटा किती प्रमाणात आहे, याला महत्त्व नसून तो किती सात्विक भावनेने व प्रेरणेने केलेला आहे, याला महत्त्व आहे. याचे एक उदाहरण म्हणजे एका जंगलात वणवा पेटला होता. वाढली झाडे, पाणी तर आगीच्या भक्ष्यस्थानी होते तर त्यासोबत उभी डोलदार झाडेदेखील गिळंकृत करीत होती. आपापल्यापरीने सर्वांनी मिळून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न स्थानिक करीत होते. त्यामध्येच एक चिमणी आपल्या चोचीत जेवढे पाण्याचे थेंब असतील तेवढे थेंब  घ्यायचे आणि जेथे वणवा पेटला होता त्यावर आणून शिडकाव करू लागली. असा आग विझविण्याचा चिमणीचा प्रयत्न चालूच होता. ही बाब तेवढीच सत्य होती की, तिच्या योगदानाने फारसा फरक पडणार नव्हता. तेवढ्यात दुसºया पक्ष्याने विचारले की, हे तू काय करतेस? तुला माहिती आहे तुझ्या इवल्याशा चोचीतील पाण्याने या आगीवर नियंत्रण आणले जाऊ शकत नाही. त्यावर त्या चिमणीने उत्तर दिले... हे मी जाणते; परंतु प्रयत्न करणाºयाच्या यादीत मी असेल. जेणेकरून हताशी, निरुत्साही प्रवृत्ती माझ्याजवळदेखील फिरकणार नाही. समाजात जाणून-बुजून अलिप्त स्वरूपाच्या काही व्यक्ती असतात. जसे त्यांची या पृथ्वीतळाशी काही देणेघेणे नाही आणि या भूतलावर ते पाहुणे आहेत. त्यांचे विश्व हे स्व म्हणजेच मी आणि माझे यामध्येच विलुप्त झालेले आहे. अशा अनुभूतीबाबत संत कबीर म्हणतात,बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर। पण ती को छाया नही फल लागे अति दूर ।।खजुराच्या झाडासारखे मोठे होऊन काही समाजाच्या उपयोगाचे नाही तर आपल्यात सकारात्मक समाजहित साधावे हीच अपेक्षा.

(लेखक वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक