शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक विचार प्रगतीकडे नेणारा : हभप चंद्रकांत महाराज वांजळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 12:30 IST

खरे तर मानवी जन्म, जीवन मिळणे ही अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची बाब आहे.

- संत साहित्याचे आणि संत विचारांचे महत्त्व मनुष्य जीवनात आहे. ‘दुर्लभम् मनुष्य देहो...’, अशी एक भूमिका संत महात्म्यांनी आणि रचनाकारांनी अनेक ठिकाणी मांडली आहे. जगद्गुरू शंकराचार्यांनीही जीवन उन्नत करणारे विचार मांडले आहेत. शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात, ‘साधू संत संग्रह या देवाच्या अनुग्रहासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत. मनुष्यत्व, मोक्षत्व, महापुरुष संचया. महापुरुषांचा असणारा आश्रय किंवा महापुरुषांची असलेली संगती. या तीन गोष्टी शास्त्रकारांनी अत्यंत दुर्लभ मानल्या आहेत. यातील प्रथम क्रमांक जर कोणता आहे, तो मनुष्यत्वाचा आहे. मनुष्यजन्माचा आहे.खरे तर मानवी जन्म, जीवन मिळणे ही अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची बाब आहे. अर्थात ही देवदुर्लभ बाब आहे. मानवी जीवन मिळून मला परमात्मा पाहिजे, देव पाहिजे अशा स्वरूपाची आणि तीव्र स्वरूपाची लालसा, अंत:करणात असणे याला मोक्षत्व म्हणतात. मानवी जीवन आणि मोक्षत्व परिपूर्ण करण्याचा संत-महात्म्यांचा समागम, या तीन गोष्टी दुर्लभ आहेत. नंतरच्या दोन गोष्टी आपण जरी दूर ठेवल्या तरी प्रथम क्रमांक त्यांनी मनुष्यत्वास दिला आहे. आयुष्याच्या साधनेत सच्चिदानंद पदवी घेणे, आपल्याला जे आयुष्य मिळाले आहे, त्या आयुष्यात आपणास सचिदानंद पदापर्यंत पोहोचता आले पाहिजे. ही लालसा जीवन उद्धारक आहे. जुने कीर्तनकार किंवा जुने संप्रदायिक विचारवंत जीवनाविषयी एक चिंतन नेहमी मांडत असत. मानवी जन्म, मानवी देह, देवलोकांना मिळाला नाही, पण मानवी देहाचे महत्त्व त्यांना कळाले. परंतु पशू, पक्षी यांना मानवी देह मिळाला नाही आणि कळालाही नाही. पण मानवी जीवनाची शोकांतिका आहे. ज्याना देह मिळाला; पण कळाला नाही, ते कळून देण्यासाठी संत साहित्य किंवा शास्त्र आहे. संत साहित्य आणि संतांचे विचार हे जीवनास पुढे नेणारे असतात. प्रगती करणारे असतात. अर्थात जीवनाविषयीची ही चर्चा आजच नाही तर किंबहुना  युगानुयुगे ही चर्चा सुरू आहे. देह हे परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन आहे. 

(हभप चंद्रकांतमहाराज वांजळे, प्रसिद्ध प्रवचन, कीर्तनकार) ......

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक