शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

आनंद तरंग - होकाराचे बीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 03:54 IST

सुप्तशक्तीची ताकद ठिणगीतून लागलेल्या आगीसारखी असते.

विजयराज बोधनकरसुप्तशक्तीची ताकद ठिणगीतून लागलेल्या आगीसारखी असते. फक्त ती ‘हो’ म्हणण्याची सुप्त अग्नी आहे की ‘नाही’ म्हणण्याचा सुप्त अंधार आहे यावर ते अवलंबून आहे. नकाराचा अंधार सर्व आयुष्य भस्मसात करून टाकते तर होकाराचा यज्ञ दिव्य दृष्टी प्रदान करून जाते. सकारात्मक विचार करण्याची एक कला आहे. ही कला एक अंगभूत कला असते. जी अभ्यास करून शिकविली जात नाही, प्रत्येक माणसाची विचारतरंगशक्ती भिन्न असू शकते. म्हणून तर प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. मग विचार करणे म्हणजे काय हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी नेमके एक उदाहरण म्हणून घेतले तर जसे, दहावीनंतर विद्यार्थी अवस्थेत आपण काय शिकले पाहिजे याचा विचार स्वत:च करणे योग्य मार्ग दाखवू शकते. याउलट ज्याला त्याला विचारून मग अभ्यासाची दिशा ठरविणे घातक ठरू शकते. म्हणजेच स्वत:ला विचारक्षमता वाढविण्याची इच्छाच नाही ही नकाराची भावना माणसाचे आयुष्य डळमळीत बनवू शकते.

ज्या व्यक्तीजवळ विचार ऊर्जाच नाही अशा व्यक्तीला करिअरसाठी कुणीही मदत करू शकत नाही. कारण आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा, स्वत:ची विचारक्षमता नसलेल्या व्यक्तीच्या वाटा सतत चुकत जाऊन शेवटी पदरी दु:ख पडत राहते. म्हणून सतत विविध स्तरांवरचे वाचन करणे गरजेचे असते. मग पुस्तके किवा अनेक घडलेल्या घटना जरी डोळसपणे वाचल्या तरी विचारक्षमता ही उत्तर प्रक्रियेला हातभार लावत असते. जो युवक सतत उत्तम काही ना काही वाचत असतो, निरीक्षण करीत असतो, त्याच्या विचारांचा पिंड तयार होत जातो. या वाचनक्षमतेतून विचार सामर्थ्य वाढत जात राहते. ज्यांनी ज्यांनी आयुष्यात सकारात्मक मुसंडी मारली त्यामागे केवळ अनुभवाची विचारऊर्जाच असते. ही विचारऊर्जा एखाद्या उंच उडणाऱ्या पक्ष्यासारखी असते जी गगनाला गवसणी घालू शकते.

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक