शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

पितृलोक नेमका आहे तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 10:43 IST

पितृलोक म्हणजे अंतरिक्ष स्थान होय. स्वर्ग व पृथ्वी यांच्यातील अंतरिक्ष स्थानास पितृलोक म्हणतात.

पितृलोक, पितृस्वरूप व पितरांच्या तृप्तीचे मार्ग, याबद्दल प्राचीन ग्रंथांतून सविस्तर माहिती मिळते. ऋग्वेदादि प्राचीन ग्रंथांच्यावेळेपासून पितृविषयक काही निश्चित कल्पना होत्या, असे स्पष्टपणे दिसते. वैदिक साहित्यात शतपथ ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, छांदोग्य उपनिषद आदी ग्रंथांत तो लोक अनुभवून आल्यासारखी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्यावरून त्यांच्या निश्चित कल्पना कोणत्या होत्या, हे समजावून घेता येते.

पितृलोक म्हणजे अंतरिक्ष स्थान होय. स्वर्ग व पृथ्वी यांच्यातील अंतरिक्ष स्थानास पितृलोक म्हणतात. निरुक्तकार यास्कांनी दैवत कांडात पितृ ही देवता मानून त्यावर वरीलप्रमाणे विवेचन करून पितर हे अंतरिक्षातील देव आहेत, असे म्हटले आहे.

माध्यमिको यम इत्याहु:

तस्मात माध्यमिकान्पितृमन्यते

यावरून पितृलोक म्हणजे अंतरिक्ष, हे निश्चित होते. यम हा पितृलोकांचा अधिपती आहे, असे ऋग्वेदात म्हटले आहे व निरुक्तकारांनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे.

द्युस्थ, अंतरिक्षस्थ आणि पृथ्वीस्थ, असे देवतांचे तीन वर्ग निरुक्तकार पाडतात. परंतु उपनिषदादि ग्रंथांत ही कल्पना स्वीकारलेली दिसत नाही. स्वर्ग, मृत्यू, मोक्ष अशी त्यांची विचारसरणी आहे, हे ध्यानात घेतल्याने पुढील विचार पटण्यासारखे वाटतात.

पितरांचे प्रकार

पितरांचे तीन प्रकार आहेत. त्याबद्दल ऋग्वेदात खालील ऋचा आहे-

उदीरतामवरउत्परास उन्मध्यमा: पितर: सोम्यास:

असुं य ईयुरवृका ऋतज्ञा:, ते नोवन्तु पितरो हवेषु

याचा अर्थ असा - मुक्त कंठाने स्तवन करा. पितृगण सोमप्रिय आहेत. त्यापैकी काही खालच्या लोकांत, काही मध्यम लोकांत तर काही वरच्या लोकांत वास करीत असतात. ते सरल वृत्तीचे, धर्म जाणणारे व प्राणरूप आहेत. हविदान करणा-या आमचे ते रक्षण करोत.या मंत्रावरून अवर, मध्यम व पर अशा तीनही ठिकाणी पितर असतात, हे स्पष्ट होते. छांदोग्य उपनिषदात यांनाच पृथ्वीलोक, सूर्यलोक व ब्रह्मलोक असे म्हटले असून, ते त्या लोकी कसे जातात व परत येतात, याचे विस्तारपूर्वक वर्णन केलेले आहे.

तेथे पृथ्वी व चंद्रलोक यांमध्ये पितृलोक असल्याचे वर्णन आढळते- मासेभ्य: पितृलोकं पितृलोकात आकाशम

आकाशात च चंद्रमसम

यावरून पितृलोकाची स्थानकल्पना निश्चित होऊ शकते. सूर्यलोक, चंद्र व पृथ्वी या तीनही स्थानी आपापल्या कर्माप्रमाणे जाणा-यांना सामान्यत: पितर असे ऋग्वेदात म्हटले आहे. या तिघांची गती कोणत्या कर्माने कोणत्या ठिकाणी होते, हे छांदोग्य उपनिषदातील उपरोक्त उद्धरणात वर्णिलेले आहे. जे लोक पृथ्वीवरच सारखे फिरत राहतात, त्यांना दीर्घकाल स्थिती कोठेच नसते. त्यांची कर्मेही हीन प्रतीची असतात. त्यामुळे पृथ्वीला पितृलोक म्हणणे यथार्थ होणार नाही. त्याच्या उलट ब्रह्मलोक किंवा सूर्यलोक ज्याला ऋग्वेदात पर असे म्हटले आहे तेथे गेलेले लोक पुनरावर्तित होत नसल्यामुळे त्याला पितृलोक हा शब्द लावणे योग्य होणार नाही. म्हणून मध्यम स्थानालाचपितृलोक  म्हणणे योग्य ठरते. स्वर्ग व पितृलोक यांमध्ये विशेष फरक नाही, हे यावरून दिसून येते. आपण नेहमी बोलताना पितृलोक, असा उल्लेख करतो. परंतु वरील विवेचनाद्वारे पितृलोक नेमका कोठे आहे, हे स्पष्ट होते.

संकलन : सुमंत अयाचित

 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAdhyatmikआध्यात्मिक