शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंधळा खेळ हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 05:28 IST

आज हजारो आंधळे नको त्यांचे पाय चेपत आहेत. त्यांचे डोळे उघडायला तयारच नाहीत.

-प्रा. शिवाजीराव भुकेलेआकाशात विजांचा कडकडाट होऊ लागला. काळ्याकुट्ट मेघांचे गर्जन तर्जन सुरू झाले. रिमझिम पावसाची बरसात झाली की, मयूराच्या आनंदाला उधाण येते व आपला भव्य पिसारा फुलवून तो नाचू लागला की, मोरपिसांचे सप्तरंग आणि प्रत्येक पिसामधील डोळाभाव वेड्या रसिकाला भाव समाधीचा आनंद देतात; पण हळूहळू लक्षात यायला लागते, मोराच्या पिसाऱ्यातील सहस्रावधी डोळे दिसायला कितीही सुंदर असले तरी असायला सुंदर नाहीत, ते तर आंधळे आहेत. अंधश्रद्धा नावाच्या आंधळ्या खेळाचे अगदी असेच आहे. त्यामध्ये सुंदरता, प्रदर्शन प्रधानता व राजसी वैभव आहे, पण साराच आंधळा खेळ आहे. आज हजारो आंधळे नको त्यांचे पाय चेपत आहेत. त्यांचे डोळे उघडायला तयारच नाहीत. ते उघडू नयेत यासाठी काही यंत्रणा पद्धतशीरपणे कार्यरत आहेत. ज्या अनेक साधू, बापू, योगी, योगिनी यांचे केवळ पाय धुऊन पित नाहीत तर त्यांचे पाय डोक्यावर घेऊन नाचत आहेत. ज्यांच्याविषयी मध्ययुगातले महात्मा फुले, तुकोबाराय स्पष्टपणे म्हणाले होते,टिळा-टोपी घालून माळ म्हणती आम्ही साधू,दया धर्म नाही चित्ती ते जाणावें भोंदू।कलीयुगी घरोघरी संत झाले फार,वीतभर पोटासाठी हिंडती दारोदार।।डोळस श्रद्धेचे भाव ज्यांच्या मनी-मानसी भरून उरले होते, त्या तुकोबांनी निक्षून सांगितले होते. गंडे, दोरे, तंत्र, मंत्र, ताईत घालून भवरोगाचे दु:ख नाहीसे होईल, असे मानणे शुुद्ध आंधळेपणा आहे. आज ताईत जाऊन लॉकेट आली, पण आंधळे ते आंधळेच राहिले.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक