शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

विचारांची चुकीची पद्धती नि दिशा बदलली तर आपला स्वभाव बदलतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 20:38 IST

आज अजय घरी आला तेव्हा भीतीनं पार गोठून गेला होता.

- रमेश सप्रेआज अजय घरी आला तेव्हा भीतीनं पार गोठून गेला होता. त्याच्या डोळ्यासमोर आधीच्या दोन परीक्षांचे निकाल तरंगत होते. पहिल्या परीक्षेत तो दोन विषयांत नापास झाला होता. त्या वेळी त्याच्या बाबांनी त्याला संपूर्ण दिवस उपाशी ठेवलं होतं. त्या धसक्यानं दुस:या परीक्षेला तो जाम घाबरला होता. परिणाम चार विषयात नापास. बाबांनी रात्रभर घराबाहेर ठेवलं होतं त्याला. आई म्हणत होती, ‘अजू भितो अंधाराला. त्याला मागच्या अंगणात जातानाही रात्री सोबत लागते.’ पण बाबा म्हणजे जमदग्नीचा अवतार. त्यांनी कुणाचं काहीही ऐकलं नाही. त्याला अगदी बागेच्या फाटकाबाहेर ठेवलं नि कुलूप लावलं. दिवसा कुत्र्यांना प्रचंड भिणा-या अजयला रात्री रस्त्यावर भटकणा-या नि त्यांच्यावर त्या गल्लीतील अखंड भुंकणा-या कुत्र्यांमुळे ती काळरात्र कधी संपतेय असं वाटत होतं. फाटकाबाहेरच्या एका दगडाच्या आस:यानं शरीराची मुटकुळी करून बिचारा रात्रभर पडून राहिला.त्याचे बाबा भुजंगराव शिक्षण खात्यात शाळा तपासनीस (स्कूल इन्स्पेक्टर) होते. त्यांच्या कडक स्वभावामुळे सारेजण त्यांना टरकून असत. घरी ते येताहेत असं कळलं की सारं चिडीचूप. आजूबाजूचे गल्लीतले लोकसुद्धा त्यांना दुरून येताना पाहून एकमेकांना म्हणायचे, ‘आला रे, वाहनासकट यम!’ भुजंगराव होतेही तसेच. काळेकभिन्न नि आडदांड. कार्यालयातले सहकारी आपसात त्यांना ‘काळसर्प भुजंग’ म्हणायचे. कुणाला केव्हा दंश करील याचा नेम नसे. असो.आज साक्षात मृत्यूच अजयसमोर उभा होता. कारण परीक्षेच्या वेळी मनावर येणारं दडपण आणि अभ्यासावेळी परीक्षेच्या भीतीनं पोटात उठणारा गोळा याचा अटळ परिणाम म्हणून या तिस-या परीक्षेत तो सहा विषयात नापास झाला होता. आईच्या आधारानं थरथरत वादळातल्या केळीच्या झाडासारखा उभा होता. आज बाबा आपल्याला ठार मारणार याची त्याला खात्री होती. बिचा-या आईचाही नाइलाज होता आणि नाइलाजाला इलाज नसतोच ना?अखेर भुजंगराव घरी आले. आज मुलांची प्रगतिपुस्तकं दिली हे त्यांना कार्यालयातच कळलं होतं. बाबांनी आल्या आल्या हाक मारली, ‘अज्जूबेटा..’ या कधीही न मारलेल्या प्रेमळ हाकेनं अजय यांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं, अजयच्या धमन्यातील गोठलेलं रक्त वाहू लागलं. त्याला परिस्थितीचा अंदाज येईना. बाबांकडे जाऊन सारं धैर्य एकत्र करून म्हणाला, ‘काय बाबा?’ ‘अरे त्या पिशवीत काय आहे ते आण पाहू! अजय पिशवीकडे गेला खरा पण त्याची छाती अजून धडधडतच होती. पिशवीत एक फुलांचा हार, थोडी फुलं, अगरबत्तीचा पुडा, एक सी.डी. आणि एक पुडी होती. अजयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.. म्हणजे बाबा आपली पूजा करणार की काय? त्यांना कळलेलं दिसतंय की आपण सहा विषयात नापास झालो आहोत. त्यानं ती पिशवी थरथरत बाबांच्या हातात दिली. बाबांनी शांतपणो त्या सा-या वस्तू देवघरात ठेवल्या नि अजयला जवळ घेऊन त्याच्या केसातून, पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, ‘आज तुझं प्रगतीपुस्तक मिळालं ना रे? काय म्हणतोय निकाल?’ अजय चाचरत म्हणाला, ‘बाबा यावेळी सहा विषयात..’ त्याचं वाक्य पुरं होण्यापूर्वी बाबाच म्हणाले, ‘नापास झालायस ना? हरकत नाही. अजून एक परीक्षा राहिलीय ना? त्यात चांगलं पास होण्याचा प्रयत्न कर. नाहीच जमलं तर तुला आपल्या रघुकाकाचं गॅरेज आहे ना, गाडय़ा दुरुस्त करण्याचं? तिथं पाठवू हं. तुला आत्ताच सर्व गाडय़ांची मॉडेल्स, इंजिनं याबद्दल खूप माहिती आहे ना रे?अजयचा स्वत:वर नि बाबांच्या बोलण्यावर विश्वासच बसेना. आईच पुढे होऊन म्हणाली, ‘अरे अज्जू, बाबा खरंच म्हणताहेत. कदाचित शाळेतल्या पुस्तकी शिक्षणापेक्षा गाडय़ा दुरुस्तीसारख्या तांत्रिक शिक्षणात तू चांगली प्रगती करू शकशील. हो, ना हो!बाबांनी संमतीदर्शक मान हलवल्यावर घरातलं सारं वातावरण निवळलं. पण बाबांच्या वागण्यात अचानक हे परिवर्तन कसं घडलं याबद्दल आई अजय दोघांच्या मनात शंका होती. ती बाबांनीच दूर केली. ‘आज ऑफिसमध्ये एक सद्गृहस्थ आले होते एका कामासाठी. व्यवसायानं ते पालकांचे समुपदेशक होते. आपल्या मुलांना समजून कसं घ्यायचं याविषयी बोलताना सहज म्हणाले, ‘तुम्ही इन्स्पेक्टर आहात ना? इन्स्ट्रक्टरही (प्रशिक्षक) आहात ना? म्हणजे तुमचं काम आहे. दुस-याची इन्स्पेक्शन (तपासणी) करण्याचं, दुस-यांना इन्स्क्ट्रक्शन देण्याचं (म्हणजे प्रशिक्षित करण्याचं) पण स्वत:ची तपासणी (इंट्रोस्पेक्शन) कधी करता का? स्वत:ला सूचना (ऑटो  सजेशन) कधी देता का? तसं केलंत तर मुलांना, इतरांना समजून घेणं अधिक सोपं जाईल तुम्हाला. आत्मनिरीक्षण नि आत्मपरीक्षण करून बघा.’‘त्यांच्या या उद्गरांनी माझे डोळे उघडले. दृष्टी बदलली. भुजंगरावांच्या शब्दाशब्दातून पश्चातापाची आसवं ओघळत होती. त्यांनी त्या समुपदेशकांच्या सी.डी वरचं चित्र पहिलं. शांत, निस्तरंग जलाशय, वरती मोकळं निळं असीम आकाश आणि शांतप्रशांत वाटणारा आजुबाजूचा निसर्ग. सी.डीचं नाव होतं -‘माईंड युवर माईंड’आपलंही असंच भुजंगरावांसारखं असतं. विचारांची चुकीची पद्धती नि दिशा बदलली तर आपला स्वभाव बदलतो. इतरांशी असलेले संबंध बदलतात. मुख्य म्हणजे आपल्यात एका नव्या व्यक्तीचा जन्म होतो. पण हे एका दिवसात होत नाही. अभिषेकाच्या पाण्यासारखं संततधारेनं जीवनाविषयीचा दृष्टीकोन बदलायचा असतो. त्यासाठी श्रवण-वाचन-चिंतन-ध्यान आणि सत्संग म्हणजे सदाचरणी, सद्विचारी व्यक्तींची साथसंगत. यासाठी भुजंगरावांना उपयोगी पडली ती ‘माइंड युवर माइंड (म्हणजे तुमचं मन तुम्हीच सांभाळा) ही ध्वनिफित. ती पेन ड्राइव्हवर जाताना ते सदैव ऐकत असतात. त्यावर सतत चिंतन करत राहतात. आता घरचे आणि दारचे सारे त्यांना भुजंग म्हणजे काळसर्प म्हणत नाहीत, तर ज्याच्यावर शांत पहुडलेले विष्णु भगवान असतात तो शेषनाग. शातांकारं भुजगशयनम्.!