शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पकार तुम्हीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:01 IST

आंतरिक पातळीवरसुद्धा जोपर्यंत तुम्ही यथायोग्य ती कृती करत नाही, तोपर्यंत तिथेही काही साध्य होणार नाही.

- सद्गुरू जग्गी वासुदेवप्रत्येकाला आपले जीवन आणि सुख-समृद्धी महत्त्वाची असते आणि म्हणून लोक त्यांच्या स्व-कल्याणात भरपूर वेळ गुंतवतात. तुम्ही पाहिले असेल, एखाद्या व्यक्तीने इंजिनीअर बनून पैसे कमविण्यासाठी त्याच्या आयुष्याची पंचवीस वर्षे गुंतविलेली असतात. त्याचे कुटुंब उभे करण्यासाठी त्याने त्याच्या आयुष्याचा अर्धा वेळ खर्ची केलेला असतो, परंतु त्याने किती वेळ स्वत:च्या आंतरिक-कल्याणासाठी दिला आहे? आज लोक त्यांच्या सभोवतालची स्थिती हाताळण्यात आणि दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत, परंतु परिस्थितीत कितीही सुधारणा केली, तरी तुम्ही त्यांना शंभर टक्के दुरु स्त करू शकणार नाहीत. अगदी कोणीही हे करू शकणार नाही. जगभरात असलेले समृद्ध समाज, ही याची जिवंत उदाहरणे आहेत. त्यांनी बाहेरील परिस्थितीवर उत्तम प्रकारे नियंत्रण मिळविले, पण जरा लोकांची अवस्था पहा. उदाहरणार्थ, युरोपीयन देशांनी, बाह्य परिस्थिती सुयोग्य पद्धतीने बसवल्या आहेत, पण त्यांच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे ४0 टक्के लोक मानसिक विकारांनी ग्रस्त झालेले आढळतात. दैनंदिन व्यवहारात सामान्य माणसासारखे वागण्यासाठीसुद्धा त्यांना दररोज औषधे घ्यावी लागतात! हे काही कल्याण नव्हे.आंतरिक पातळीवरसुद्धा जोपर्यंत तुम्ही यथायोग्य ती कृती करत नाही, तोपर्यंत तिथेही काही साध्य होणार नाही. जसे बाह्यकल्याणाची निर्मिती करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, तसेच आंतरिक कल्याण साधण्यासाठीसुद्धा एक परिपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, ज्याला आपण योग विज्ञान म्हणतो, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या नियतीचे शिल्पकार बनू शकता.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक