शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीपासून मुंबईपर्यंत दिसलं चंद्रग्रहण, पहाटे 4.29 वाजेपर्यंत राहणार प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:20 IST

149 वर्षांनंतर दिसणाऱ्या दुर्मीळ चंद्रग्रहणाला सुरुवात झाली आहे.

नवी दिल्लीः 149 वर्षांनंतर दिसणाऱ्या दुर्मीळ चंद्रग्रहणाला सुरुवात झाली आहे. 149 वर्षांपूर्वीही गुरुपौर्णिमेच्या दिवशीच चंद्राला ग्रहण लागलं होतं, त्यावेळी चंद्र हा शनि आणि केतूबरोबर धनू राशीमध्ये स्थित होता. तर सूर्य राहूसोबत मिथुन राशीमध्ये होता. मंगळवारी मध्यरात्री 1.31 वाजता चंद्रग्रहणाला सुरुवात झाली असून, पहाटे 4.29 वाजेपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधोमध आली असून, जवळपास तीन तास हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे.कोलकातातल्या एमपी बिर्ला तारामंडळ संशोधन आणि अकादमीचे संचालक देबीप्रसाद यांच्या मते, मध्यरात्री तीन वाजता चंद्रग्रहण स्पष्टपणे नजरेस पडणार आहे. जेव्हा चंद्राचा जास्त करून भाग कललेला असेल. खगोलीय हालचालींची आवड असणाऱ्यांनी ही संधी दवडता कामा नये, कारण 2021पर्यंत अशा प्रकारचं कुठलंही चंद्रग्रहण पाहता येणार नाही. भारतातल्या प्रत्येक भागातून हे चंद्रग्रहण थेट पाहता येणार आहे. चंद्राला पहाटे 4.29 वाजेपर्यंत हे ग्रहण लागलेलं दिसेल. पहाटे 3.01 वाजता चंद्राच्या 65 टक्के व्यास पृथ्वीच्या सावलीखाली असेल. भारतात पुढचं चंद्रग्रहण 26 मे 2021ला दिसेल, जेव्हा चंद्राला पूर्ण ग्रहण लागेल. 

  • ग्रहणात हे करा अन् हे करू नका

ग्रहणात मंत्राचा जाप सुरूच ठेवला पाहिजेग्रहणात अन्न शिजवू नये किंवा काही खाऊ नयेखाण्या-पिण्याच्या वस्तूमध्ये तुळशीची पानं टाकून ठेवली पाहिजेतग्रहणात घरातल्या देवघराचे दरवाजे आणि पडदे बंद करणं गरजेचं आहे. ग्रहणात कोणतंही शुभ आणि नवं कार्य सुरू करू नयेग्रहणात जीवाणूंचा प्रादुर्भाव तेजीनं वाढणार असून, तो पसरणार आहे. ग्रहणानंतर पूर्ण घरात गंगेच्या पाण्याचा शिडकावा करावावैज्ञानिकांच्या मते, पृथ्वी सूर्याची प्रदक्षिणा करते, तेव्हा चंद्र पृथ्वीच्या चारही बाजूंना फिरत राहतो. पृथ्वी आणि चंद्र फिरता फिरता एका क्षणी अशा स्थानावर येतात, जिथे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र तिन्ही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा पृथ्वी फिरता फिरता सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते, तेव्हा चंद्र पृथ्वीच्या मागे लपतो. त्याच्यावर सूर्याची किरणं पडत नाहीत, यालाचा चंद्रग्रहण म्हटलं जातं. तर चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध येऊन सूर्याला झाकोळतो, त्याला सूर्यग्रहण म्हणतात.पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या माहितीनुसार, ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकाळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनश्चरण ग्रहणामध्ये करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणाचा स्पर्श झाल्यानंतर मात्र झोप, मलमूत्रोत्सर्ग, भोजन व कामविषय ही कर्मे करू नयेत. अशौच असताना ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान, करण्यापुरती शुद्धी असते, असे दाते यांनी सांगितले. भारतासह संपूर्ण आशिया खंड, संपूर्ण युरोप, आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, रशियाचा दक्षिण प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, प्रशांत महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर या प्रदेशात ग्रहण दिसणार आहे, असेही ते म्हणाले होते.

टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहण