शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पंढरपुरा नेईन गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 16:21 IST

वारकरी होऊन पंढरीला जाण्यात जो आनंद आहे तो तसे जाण्यात नाही. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज सांगतात,

वारकरी होऊन पंढरीला जाण्यात जो आनंद आहे तो तसे जाण्यात नाही. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज सांगतात, ‘होय होय वारकरी’ ‘पाहे पाहे रे पंढरी १ ‘काय करावी साधने, फळ अवघेची येणे २ ‘अभिमान नुरे’ ‘कोड अवघेची पुरे’ ३ ‘तुका म्हणे डोळा’ ‘विठो बैसला सावळा ४ हा तुकाराम महाराजांचा मोलाचा उपदेश आहे. वारी म्हटले कि एक वेगळाच आनंद सोहळा असतो वारी या शब्दाचा अर्थ होतो. येरझरा करणे इतरही काही देवांच्या त्यांचे भक्त वारी करीत असतात. अगदी खंडोबाची वारी असते, कुलदैवताची सुद्धा वारी असते. हल्ली तर साईबाबाची सुद्धा वारी आणि पालखी निघत असते. अनंत काळापासून वारी म्हटले कि पंढरपूरचीच असे रूढ झाले आहे. पांडुरंग आणि वारी एक समीकरण आहे. पाण्यात मासा झोप घेतो कसा ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ याप्रमाणे असे सहज पंढरपूरला जाण्यात जेवढा आनंद नाही तेवढा आनंद वारकरी होऊन जाण्यात आहे. एखादी सासुरवाशीण जेव्हा आपल्या माहेरी जाते तेव्हा तिला जो आनंद होतो तेवढा आनंद नव्हे त्यापेक्षा जास्त आनंद वारकरी होऊन जाण्यात आहे. संतांनी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी’ ‘बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. पुंडलीक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण. अर्थात वारकरी होणे म्हणजे एक व्रत आहे. एक साधना आहे. पतिव्रता जशी आपल्या पतीशी एकनिष्ठ असते तसे वारकरी विठ्ठलाशिवाय दुस-या दैवताची भक्ती करीत नाही.एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. या न्यायाने आचरण करीत असतो. वारकरी होण्याकरिता काही महत्वाच्या बाबी असतात. गळ्यात १०८ मण्यांची तुलसीची माळ धारण करावी लागते. कपाळाला ऊर्ध्व पुंड्र, गोपीचंदन व बुक्का लावावा लागतो. पवित्र तुलसीची माळ वारकरी संप्रदायातील एखाद्या संत पदावर पोहचलेल्या, शाब्दे परेच निष्णातम, अशा महात्म्याला शरण जावून ती माळ धारण करावी लागते. जेव्हा माळ गळ्यात घालतो तेव्हा तो महात्मा त्या वारक-याला सांगतो कि, ‘येथून पुढे खोटे बोलायचे नाही, गळ्यातून माळ काढायची नाही. हि माळ आता मरेपर्यंत गळ्यातच राहणार, परस्त्री मातेसमान मानावी, चोरी, लबाडी करायची नाही. आषाढी, कार्तिकी एकादशी पंढरीची वारी करायची. देहू, आळंदी, पैठण व इतर संतांच्या स्थानाकडे आवर्जून जायचे असा थोडक्यात वारकरी संप्रदायाचा आचार धर्म असतो.भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिलेगुरुकुल भागवाताश्रम, चिचोंडी(पाटील)ता. नगरमो. ९४२२२२०६०३

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर