शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

तुका झालासे कळस, भजन करा सावकाश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 19:26 IST

जीवनाला आनंदाने सामोरे जाण्याची दीक्षा ही वारी देते.

हभप. चंद्रकांत महाराज वांजळे

वारी हा एक आनंद सोहळा आहे. निसर्गातील अनुकूल प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत देत हा सोहळा मार्गस्थ होत असतो. आनंदाला सामोरे जाणे आणि आनंद घेणारा हा सोहळा आहे. कोणत्याही प्रकारचा शीण वाटत नाही़ वारकरी नामघोष करीत वारीची वाट चालत असतात. जीवनाला आनंदाने सामोरे जाण्याची दीक्षा ही वारी देते. यात लोकशिक्षण आहे. कुणी म्हणेन, महिनाभराची वारी झाली उर्वरित दिवसांचे काय? घड्याळाला चावी दिली की दोन दिवस घड्याळ चालते. त्यानुसार वारी केली की वर्षभर ऊर्जा देते. मानवी विचारांची खूप चांगल्या स्वरूपांची उधळण होत असते. ऊर्जा वाढविणारी ही वारी आहे. या संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी घातला आहे. अर्थात तो ज्ञानाचा आहे. संतकृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया.., हे कार्य काही एक दोन शतकात झालेले नाही. तर एकाने पाया रचावा याप्रमाणे ज्ञानदेव महाराजांनी पाया रचला. नामा तयाचा किंकर, त्यानें केला हा विस्तार,नामदेवरायांनी या मंदिराच्या भिंती बांधल्या. प्रसार केला.जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत.,  तो शांतीचा खांब आहे. आणि तुका झालासे कळस, भजन करा सावकाश..असे भागवत धर्माच्या मंदिराचे वर्णन संत बहिणाबाई यांनी केले आहे. परिपूर्णता तुकोबारायांनी दिली. भजन सावकाश करा, म्हणजे खूप वेळ घालविणे असा नाही तर, सावकाश. अत्यंत व्यापक भाव ठेवून हे विश्वची माझे घरे...या भावनेने भक्ती करा, असा आहे. जन-जनार्दन ही एकनाथमहाराजांनी केलेली भजनाची व्याख्या आहे. तर देवही बोलतात म्हणून माझे भजना, उचित तोची अर्जुना, गगन जैसे अंलिगणा, गगणाचिया...ह्ण गगन होण्याकरिता दुसरे गगन असावे लागते. माझे भजन करण्यासाठी मीच व्हावे लागते. मीच होऊनी पांडवा, करती सेवा.. अशी सेवा वारीची असते. म्हणून नामदेवमहाराज अशी वारी करणाऱ्यांस पंढरीच्या वाटेवर पाऊल पडण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. असे एका चरणात म्हणतात. खरे तर ही अतिशयोक्ती वाटेलही कदाचित. संत वाङ्मयाचा आपण जर थोडा आधार घेतला. तर ह्यह्यवाराणसी एक मास, गोंदावरी एक दिवस, पंढरी पाऊन परियसा ऐसा महिमा नामाचा.... याचाच अर्थ वाराणसी-गोदावरी आणि पंढरीच्या वाटेवरील प्रत्येक पावलातून मिळणारे पुण्य एकच आहे.चंद्रकांत महाराज वांजळे

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी