शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

​​​​​​​आनंदाचे डोही आनंद तरंग : अज्ञानाचा भवसागर तरून ज्ञानतीराकडे जाण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 12:15 IST

विठ्ठलाकडे येणाऱ्यांना भवनदी किंवा मायानदी मुळीच खोल नाही. ती कमरेइतकीच खोल आहे...

- डॉ . रामचंद्र देखणे  (प्रवचन व कीर्तनकार ) 

सकल संतांनी विठ्ठलाच्या वर्णनासाठी आपली अभंगसंपदा समर्पित केली. त्यांचे तळवे विटेवर समचरणांनी शोभत आहेत. त्यांच्या जोडून असलेल्या पदकमलावर अनेक ऋषिमुनींचे मन रंगून गेले आहे. छातीवर वैजयंतीमाळा ऐटीत रुळत आहेत. चंदनाची उटी लावली आहे. ‘‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रवी शशी कळा लोपलिया।’’ पांडुरंग हा सुंदर, सुकुमार, मदनाचा पुतळा आहे. त्याच्या तेजापुढे चंद्रसूर्याच्या प्रभाही लोपून जातात. सर्वस्व देणाच्या मेघांप्रमाणे त्याची अंगकांती निळ्यासावळ्या रंगांने शोभून दिसत आहे. जणू काही चैतन्यरूप आनंदच विठ्ठलाच्या रूपात साकारले आहे. कपाळावर तिलक आहे, तर माथ्यावर ज्ञान आणि सद्गुणांच्या रत्नजडित मुकुट घातला आहे. त्या मुकुटाच्या प्रकाशात तो कृपादृष्टीने भक्तांना न्याहाळतो आहे. ही स्वयंभू वालुकामय मूर्ती १०८ सें.मी. उंचीची आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला दोन हात असून ते कटीवर ठेवले आहेत. विठ्ठलाच्या मूर्तीवर शिवलिंग, पाठीवर शिंके, गळ्यात कौस्तुभमणी आणि हृदयावर श्रीवत्सलांछन आहे. पोटावर त्रिवळी असून कमरेला कमरबंद आहे. मूर्तीच्या पायावर ध्वज, अंकुरादी चिन्हे आहेत. दर्शनी रूपाने ती योगमूर्ती, तत्त्वदर्शनाने ज्ञानमूर्ती तर भावदर्शनाने भवमूर्ती आहे. तो कटेवर हात ठेवून का बरे उभा आहे? त्याने कोणतेही आयुध हाती न घेता कटेवर हात ठेवले आहेत. म्हणजे तो उदास नाही, तर त्याद्वारा लक्षणेने तो आपल्या भक्तांना दाखवतो, की ‘‘मामेव ये प्रपद्यन्ते, मायामेतां तरन्ति ते’’ माझ्याकडे येणाऱ्यांना भवनदी किंवा मायानदी मुळीच खोल नाही. ती कमरेइतकीच खोल आहे. ती सहज तरून जाणे शक्य आहे. मायेलाच अविद्या असे म्हणतात आणि अविद्या हे अज्ञानाचे रूप आहे. अज्ञानाची नदी तरून माझ्या दर्शनाने ज्ञानतीरावर सहज जाता येते. ती नदी विठ्ठलनामानेच पार करायची आहे.‘‘नाव चंद्रभागे तीरी । उभी पुंडलीकाचे द्वारी ।। कर धरुनिया करी । उभाउभी पालवी ।’’ अज्ञानाचा भवसागर तरून ज्ञानतीरावर जायचे आहे.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर