शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

एकोणीस वीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 17:17 IST

रमेश सप्रे अजय-विजय तसे लंगोटी यारच. जन्म जवळ जवळ एका वेळीच झालेला. घरंही शेजारी शेजारी. दोघांच्यात घट्ट घरोबा. साहजिकच ...

रमेश सप्रेअजय-विजय तसे लंगोटी यारच. जन्म जवळ जवळ एका वेळीच झालेला. घरंही शेजारी शेजारी. दोघांच्यात घट्ट घरोबा. साहजिकच शिक्षणही एकाच शाळेत, एकाच वर्गात एवढंच नव्हे तर एकाच बाकावर. परीक्षेतील प्रगतीही समसमान. शिक्षण संपल्यावर नोकरी, लग्न, मुलं हेही सारखंच. दोघांनीही आपल्या एकुलत्या मुलांची नावंही एकच ठेवलेली स्वप्नातील. जणू दोघांच्या जीवन प्रपंचातील स्वप्नांची पूर्ती झाली त्याचं प्रतीकच स्वप्नील!

पुढे गावाबाहेरील वसाहतीत एकच जागा घेऊन त्याच्यावर अरशातील प्रतिमा शोभावीत अशी अगदी सारखी घरंही बांधली. वीज-पाणी यांच्या जोडण्याही एका मुख्य खांबावरून किंवा नळावरून. सर्वजण त्यांना राम-लक्ष्मणासारखे भाऊ नव्हेत; पण त्याच्यापेक्षाही जवळचे मित्र मानीत. सारं कसं छान चाललं होतं. अगदी दृष्ट लाखण्यासारखं. गंमत दोघं त्यांचं गाणं सुद्धा एका सुरात गोड गळ्यानं अनेक वेळा गात असत.

देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला।लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला।।

या सा-या साखर भातात एकच खडा वरचेवर दातात अडकत असे. तो म्हणजे त्यांच्या बायकांचे स्वभाव. ते मात्र परस्परांविरुद्ध. अगदी उत्तर-दक्षिण ध्रुवांसारखे. एक अत्यंत शांत, संयमी, समाधानी तर दुसरी अशांत, अस्वस्थ, असमाधानी. त्यामुळे एकाचं घर होतं शांत तेवणा-या देवघरातील नंदादीपासारखं. अजयची पत्नी शरयू होतीच खूप प्रसन्न नि तृप्त; पण विजयची अर्धागिनी मात्र सदा अप्रसन्न, वखवखलेली. जणू ज्वालामुखीच. तिचं नाव होतं शरावती. तशा शरयू-शरावतीही मैत्रिणी होत्या; पण दोघींच्या दृष्टीत वृत्तीत नि कृतीत खूप बदल. जमीन आकाश एवढा फरक. 

त्याच दिवसाचं पाहा ना. दोघांच्या मुलांचा महत्त्वाच्या परीक्षेचा निकाल होता. आपापली प्रगतीपुस्तकं घेऊन दोघेही स्वप्नील आनंदात घरी आले होते. दोघांच्याही मातोश्रींनी ते पाहिले होते, मात्र दोघींच्याही प्रतिक्रिया अगदी भिन्न. 

तसं पाहिलं तर विजय शरावतीच्या  स्वप्नीलचा वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांत विसावा क्रमांक पाहून शरावती प्रचंड भडकली. ज्वालामुखीच ना ती! धूर-आग सदैव तिच्या मुखातून बाहेर पडत. त्याचवेळी शरयूनं आपल्या  स्वप्नीलला प्रेमानं जवळ घेतलं. छातीशी धरलं नि त्याच्या केसातून हळूवार ममतेनं हात फिरवून म्हणाली, ‘बाळा, खूप आनंद होतोय मला. बाबांनाही होईल. आता पुढच्या परीक्षेत याच्यापेक्षा थोडा वरचा क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करायचा हं!’ आईला घट्ट बिलगत  स्वप्नील उद्गारला, ‘होय, निश्चित मिळविन मी. प्रॉमीस!’ दिवसभर एका घरात शिक्षेचे फटके तर दुस-या घरात आनंदाचे फटाके ऐकू येत होते. 

संध्याकाळी विजय-अजय कार्यालयातून परतले. त्या दिवशी जरा उशीरच झाला होता त्यांना. अंधारून आलं. घराच्या जवळ पोचल्यावर दोघांनाही आश्चर्य वाटलं. विजयच्या घरात पूर्ण अंधार तर अजयचं घर दिवाळीसारखं उजळलं होतं. 

‘आमचे चिरंजीव नापास झाले की काय? असं अजयनं म्हटलं त्यावेळी विजयला आठवलं आज मुलांचा निकाल होता. खरंच विजयच्या घरात अंधार होता. फ्यूज उडाला की काय? दोघांचं विजेचं मीटर एकच होतं. म्हणजे तीही शक्यता नव्हतीच. दोघं घराजवळ पोचले. प्रवेश करताना अजयनं विचारण्यापूर्वीच शरावती कडाडली, ‘या. बघा आपल्या मुलाचा निकाल.’ ‘अगं, पण अंधार का झालाय एवढा?’ या अजयच्या प्रश्नावर शरावती म्हणाली, ‘मुलानं परीक्षेत दिवे लावलेयत ते पुरेसे आहेत.’ ‘अगं पण काय निकाल लागला?’ यावर तिनं तुसडय़ा शब्दात उत्तर दिलं ‘चाळीसात विसावे आलेत चिरंजीव’ आणि शेजारचा  स्वप्नील ? असं अजयनं विचारल्यावर शरावती उद्गारली ‘ते युवराज आलेत एकविसावे!’

विजयच्या घरात तरीही दिवाळीसारखा उजेड कसा? असा विचार अजयच्या मनात येत असतानाच शरयू आली नि म्हणाली. ‘भावोजी, शिरा आणलाय साजूक तुपातला. अहो आमचा स्वप्नील वर्गात एकविसावा आला.’ विजयनं विचारलं, ‘आमचा  स्वप्नील विसावा आला तरी शरावती असं का वागतेय?’ शांतपणो शरयू म्हणाली ‘तिला वाईट वाटतंय याचं की त्याच्यावरती एकोणीस मुलं आहेत. मला आनंद याचा होतोय की माझ्या  स्वप्नीलच्या खाली एकोणीस मुलं आहेत. म्हणजे वीस मुलात त्याचा क्रमांक पहिलाच नाही आहे का? विजय नि शरावती दोघेही पाहतच राहिले. असाही विचार जीवनाचा करता येतो तर!

जीवनातील आनंदाचं रहस्यच हे आहे. सकारात्मक विचारसरणी नि होकारात्मक जीवनसरणी!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक