शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 14:43 IST

वारी परंपरेची...

माझे जीवीची आवडी।

पंढरपुरा नेईन गुढी॥

या संत उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी आषाढी वारीचा संकल्प केला आणि तो आजही भव्य-दिव्य स्वरूपात चालू आहे. आळंदी येथे माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते आणि ती पालखी माऊलींच्या आजोळ घरी मुक्कामी थांबते. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या गजरामध्ये मोठ्या उत्साहात पुढे मार्गस्थ होते. आळंदीवरून निघाल्यानंतर पुणे शहरामध्ये मुक्कामी थांबते. दोन दिवस मुक्कामी राहून परिसरातील वातावरण माऊलीमय बनलेले असते. वारीच्या मार्गावर प्रत्येक गावात दररोज सात्विक आणि माऊलीस्वरूप बनलेले असते. पहावं तिथे हाच गजर सुरू असतो. त्यामुळे माळकरी व वारकरी नसलेले सुद्धा लोक सेवाभावी बनतात. पालखी आलेल्या दिवशी गावात प्रत्येक जण उपस्थित सर्व वारकरी भाविकांची सोय करण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशावेळी जात, पात, धर्म, पंथ, पक्षभेद विसरून संपूर्ण गाव स्त्री-पुरुषांसहित वारकरी सेवेबद्दल प्रयत्न करताना पाहायला मिळतात. पालखी मार्गावर गावागावात सलोखा, ऐक्य, सेवाभावाचे संस्कार या माध्यमातून होत असल्याने पालखी सोहळ्याची आतुरतेने सर्व जण वाट पाहत स्वागताचीही तयारी करतात. 

माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते त्यावेळी आपण हजर राहून सोहळ्याचा आनंद घ्यावा, ही धारणा वारकरी भाविकांची असते. प्रस्थानाला उपस्थित राहिल्याने वारी केल्याचे पुण्य मिळते म्हणून ज्यांना वारीसाठी प्रारब्धामुळे जाता येत नसेल तर त्यांनी प्रस्थानाला उपस्थित रहावे, ही धारणा वारकरी भाविकांची असते. काही वारकरी पालखीसोबत चार पाऊल चालावं लागतं म्हणून पुण्यापर्यंत चालत येतात. आळंदी ते पुणे भाविकांची गर्दी वाढतच असते. उत्साहपूर्ण वातावरणात नामाचा गजर करत तरुणही पायी चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. ‘चला पंढरीसी जाऊ।रखुमादेवीवरा पाहू॥’या संत उक्तीप्रमाणे वारकरी पायी चालत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. कोणत्याही सोयीसुविधांचा विचार न करता भजनामध्ये तल्लीन होऊन अठरा दिवस पायी चालत येतात. वारकरी परंपरेतील सर्वात मोठी परंपरा म्हणून या वारीकडे पाहिलं जातं. वारी सर्व वारकरी भाविकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. - सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर