शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - पैशाचं झाड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 00:37 IST

जमिनीवरून चंद्राला पाहिलं, तर चंद्र जवळ दिसतो; पण तो भ्रम असतो. आपल्याला दिसतं, वाटतं तसं वास्तव नसतं, त्यापेक्षा ते कितीतरी पटीने वेगळं असतं

विजयराज बोधनकरमोजूनमापून अक्षरे लिहिली म्हणून त्याला लेखन म्हणायचं का? लेखनासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं! चार जवळच्यांनी कौतुक केलं म्हणून त्याला यश म्हणायचं का? यश मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी आयुष्यभर जागृत राहावं लागतं. भगवे कपडे घातले म्हणजे तो संत होतो का? संत बनण्यासाठी मोहाचे, लोभाचे दरवाजे बंद करावे लागतात, तसंच आंब्याच्या झाडालासुद्धा आंबे लागायला झाड मालकाला ते वाढवावं लागतं. प्रतीक्षेनंतर रसाळ फळे लागतात. कुठल्याही स्पर्धेत अव्वल येण्यासाठी त्या विषयात खूप मेहनत घ्यावी लागते. स्वप्नात चटकन् मिळणारं यश वास्तवात चटके देऊन जातं.

जमिनीवरून चंद्राला पाहिलं, तर चंद्र जवळ दिसतो; पण तो भ्रम असतो. आपल्याला दिसतं, वाटतं तसं वास्तव नसतं, त्यापेक्षा ते कितीतरी पटीने वेगळं असतं. कुठल्याही यशस्वी माणसाला विचारलं की तुम्ही यश मिळविण्यासाठी नेमकं काय केलं, तर तो इतकंच म्हणेल की, मी सतत निरपेक्ष कर्म, सखोल अभ्यास व टोकाची मेहनत केली. याला या जगात पर्याय नाही. जे मेहनतीशिवाय यश मिळतं ते फार काळ टिकत नाही. आजही यशाबद्दल असे अनेक अधांतरी प्रश्न आहेत. याविषयी समज-गैरसमज कमी वयातच निकालात निघाले, तर नेमकं सत्य आहे तरी काय, याची जाणीव होऊ शकते. कुठल्या गोष्टीला बुद्धिसमर्पित वृत्ती हवी, याचा अंदाज आला की, मोठं आकाश हाताशी येऊ लागतं. ईश्वरभक्ती व कर्मभक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी खूप क्षेत्रे आहेत, ज्यात पटकन् यश तर मिळतं व पुढे मेहनत कमी पडली की अपयश दाराशी उभं राहतं. अपयशी माणसे जगासमोर येत नाहीत, म्हणून अपयश आपल्याला दिसत नाही; पण ते असतं आणि नेमकं यश जगापुढे येतं व अस्सल असेल तेच दिसतं, जसे पैशाचे झाड अद्याप जन्माला आले नाही, तसे शंभर टक्के यश मिळवून देणारे विद्यालय जन्माला आले नाही. ते यशाची हमी देत नसते. कारण आपल्या स्वानुभवाच्या विद्यालतातूनच आपल्या जागृत कर्माने यश मिळते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकMONEYपैसा