शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 18:46 IST

मानवी स्वभावाचे अनेक पैलू आहेत. त्या त्या स्वभावानुसार आनंद, दु:ख वाट्याला येत असते.

- धर्मराज हल्लाळेमानवी स्वभावाचे अनेक पैलू आहेत. त्या त्या स्वभावानुसार आनंद, दु:ख वाट्याला येत असते. संतांनी कर्मसिद्धांताला मोठे महत्त्व दिले आहे. आपण जसे वागू तशीच प्रतिक्रिया समोरून येते. अर्थात आपले चित्त, हेतू शुद्ध असेल तर शत्रूसुद्धा मित्र होऊ शकतो. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून कृतीला हेतूची जोड दिली आहे. आपण जे वागतो वा बोलतो त्या पाठीमागे कोणता हेतू आहे, यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. एखादे काम करीत असताना चूक झाली अथवा ते काम योग्यरीतीने पार पडले नाही तर त्याचा अर्थ सर्व चुकले असे होत नाही. कृतीच्या मागील भावना मोलाची असते. आई-वडील आपल्या मुलाला कठोर शब्दात समज देतात, याचा अर्थ त्यांच्या हृदयात कायम क्रोध असतो असे नाही. त्या कठोर शब्दांमागेही आपल्या अपत्याचे हित दडलेले असते.स्पष्टपणे बोलणे हा गुण असला तरी अनेकदा स्पष्ट बोलणारे जवळच्यांना मुकतात. तात्कालिक कठोरतेमुळे दुखावलेली माणसे दुरावतात. खरे तर त्या शब्दप्रहाराने न दुखावता त्या मागच्या हेतूकडे लक्ष वेधले पाहिजे. मी चुकलो होतो, माझ्यात सुधारणा व्हावी म्हणून मला हे ऐकावे लागले, असे समजून घेणारा हेतूकडे लक्ष देत असतो.चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती... हे कसे घडते? चांगला विचार मनात ठेवून आपण शत्रूबरोबरही तितक्याच प्रामाणिकपणे जेव्हा वागतो तेव्हा तो शत्रूही नकळत आपला मित्र बनतो. द्वेष भावनेतून आनंद निर्माण होत नाही. ज्याच्याशी पटत नाही त्याच्याशी वाईट वागत राहिलो, त्याच्या उणिवा सांगत राहिलो तर अंतर वाढतच जाते. मात्र आपण जेव्हा सद्हेतूने सद्वर्तनाच्या मार्गावर चालत राहतो तेव्हा शत्रुत्वाचा थांबा मागे पडतो. निर्मळ मनाचा माणूस प्रत्येकात दडला आहे. त्यावर अनेक रूपांची छाया पडते. ती कशी दूर करतो आणि आपल्या निर्मळ विचारांना कसे पेरतो, यावर नात्याची वीण घट्ट होत जाते.