शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मनासाठी विचारांचे पोषण गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 04:13 IST

नकारात्मक विचार वाढले, तर मन कमकुवत होईल. यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांना वाट मिळेल.

- माता अमृतानंदमयीशरीराला अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे मनाला चांगल्या विचारांच्या पोषणाची गरज असते. कोणत्या प्रकारचे अन्न आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि कोणत्या प्रकारचे धोकादायक असते हे माहीत असणे आवश्यक आहे. त्यानुसार आपण आपला आहार ठरवायला हवा. आपण केवळ गोडच पदार्थ खाल्ले, तर आपले शरीर आजारांना बळी पडेल. त्याचप्रमाणे जर नकारात्मक विचार वाढले, तर मन कमकुवत होईल. यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारांना वाट मिळेल. मन हे विचारांचा प्रवाह असते. जर विचार नसतील, तर मन नसेल. मनावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर आपल्या विचारांबाबत जागरूक व्हायला हवे. कोणते विचार स्वीकारायचे आणि कोणते झिडकारायचे याबाबत आपण कायम सावध असले पाहिजे. पंतप्रधानांनी कायम त्यांच्या मंत्र्यांवर देखरेख करायला हवी. त्यांच्या बुद्धिमत्तेची क्षमता त्यांना माहीत असायला हवीच, त्यांची मते आणि सूचना कितपत स्वीकारायच्या हेही माहीत असायला हवे. जर त्यांनी मंत्री म्हणेल ते सर्व ऐकले आणि फारसा सारासार विचार न करता कार्यवाही केली, तर त्यांना आपले पद गमवावे लागेल. हीच गोष्ट विचारांनाही लागू होते. विचार समजून घेणे आणि त्यानुसार त्यांना हाताळणे अतिशय आवश्यक आहे. तसे न झाल्यास ते विनाश करतील. शेत पिकते तिथे तण माजतातच. ते अधूनमधून मुळापासून काढून टाकले पाहिजेत. नाहीतर ते सर्व खत शोषून पिकाचा नाश करतील. मात्र, आपण पिकांना योग्य वेळेस पुरेसे पाणी आणि खत द्यायला हवे. कीटकांमुळे पिकाचा नाश होऊ नये यासाठी कीटकनाशके फवारली पाहिजेत. त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच प्रकारे नकारात्मक विचार आपोआप फोफावत असतात, त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. मात्र, चांगल्या विचारांच्या मशागतीसाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक