शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मनुष्याला योग्य मार्गाने नेणारे मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 09:39 IST

उत्तम सारथी ज्याप्रमाणे घोड्यांना हाकतो व लगामाच्या योगाने त्यांना योग्य मार्गाने नेतो, त्याप्रमाणे हृदयामध्ये राहणारे, कधीही वृद्ध न होणारे, अत्यंत शीघ्रगामी ‘मन’ संकल्प करीत असते.

उत्तम सारथी ज्याप्रमाणे घोड्यांना हाकतो व लगामाच्या योगाने त्यांना योग्य मार्गाने नेतो, त्याप्रमाणे हृदयामध्ये राहणारे, कधीही वृद्ध न होणारे, अत्यंत शीघ्रगामी ‘मन’ संकल्प करीत असते. मनाच्या जोरावर, भावनेच्या बळावर माणूस बऱ्या-वाईट गोष्टी करीत असतो. योग्य-अयोग्य मार्गाने कार्य होणे हे सर्वस्वी मनाच्या चांगले-वाईटपणावर अवलंबून आहे. घोड्याच्या लगामाप्रमाणे हे मन मनुष्याला योग्य मार्गाने नेते. मनाचा कारभार लक्षात येत नाही. कारण मनात केव्हा काय संकल्प येतील ते त्या मनालाच माहिती. मनाची स्थिती चंचल असली की शांती नाही. ज्याचे मन ताब्यात आहे त्यालाच इहपरलोक प्राप्त होतो.

मनाशिवाय कोणतेच कर्म करता येत नाही. भावना हा मनाचा अधिकार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासाला कारणीभूत मनच असते. म्हणून मनाला उत्तम संगती, योग्य आहार, विहार इतर गोष्टींमध्ये रममाण करावे. अध्यात्म विद्येशी त्याची संगती घडवावी म्हणजे राष्ट्रहित व समाजहित पदरात पडेल. व्यक्ती व्यक्ती मिळून समाज बनतो. म्हणून माणसांच्या अनुकरणाने समाजाचे मन सुधारते किंवा बिघडते. तात्पर्य कोणतेही साध्य साधायचे असेल तर मन सुदृढ केले पाहिजे. हल्ली आपल्या समाजाकडे पाहिले तर तरुण पिढी दिवसेंदिवस अत्यंत अशक्त व अल्पायुषी होत आहे. आपल्याला निसर्गाने दिलेल्या आयुष्याच्या आतच आपण संपतो आहे. सर्व समाज अल्पायुषी व रोगी झाला तर उद्धार कोण करणार?

समर्थ रामदास स्वामी म्हणतात,धन्य धन्य हा नरदेहो ।येथील अपूर्वता पहाहो।।नरदेह महत्त्वाचा आहे. आहार, निद्रा, भय, मैथून यापलीकडे काहीतरी वेगळे जग आहे. त्यासाठी मनाची क्रिया फार महत्त्वाची आहे. कार्यक्षम करणारी पिढी निर्माण व्हावी, असे वाटत असेल तर त्यांच्या मनाला शुद्ध बनवले पाहिजे. समाजाची हानी होऊ नये असे वाटत असेल तर मनाला शुद्धतेकडे वळवा. राष्ट्राचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. मनात देशभक्ती निर्माण करा. सामर्थ्यवान मनाला सन्मार्गाकडे लावा. मन सन्मार्गाकडे वळल्यास ‘आत्मवत्सर्वभूतानि य: पश्यति स पश्यति’ या न्यायाने सर्व समाजाची सर्वांगीण ऐहिक, पारमार्थिक उत्क्रांती होते. एवढेच नव्हे तर मनाची स्थिती मजबूत झाली की सुदृढ सुविचारी व कार्यकर्ती पिढी निर्माण होते त्यामुळे राष्ट्राचे हित जोपासता येते. लोककल्याणासाठी मार्ग अवलंबता येतात. त्या योगाने सुप्रजा निर्माण होते. म्हणून तुकोबारायांच्या शब्द आठवतात, ‘शुद्धबीजापोटी फळे रसाळ गोमटी’ शुद्ध बीज असेल आणि ते भुसभुसीत जमिनीत पेरले तर धाण चांगले येते. तसे मन शुद्ध केले की समाज चांगला निर्माण होतो. समाज चांगला झाला की राष्ट्र कल्याण होते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक