शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक सुख हे शारीरिक सुखापेक्षा तिप्पट जास्त महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 04:28 IST

आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करता, ते त्यापासून सुख मिळते म्हणून. जीवनात तुम्हाला काय हवे असते तर सुख.

- श्री श्री रविशंकरआयुष्यात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करता, ते त्यापासून सुख मिळते म्हणून. जीवनात तुम्हाला काय हवे असते तर सुख. तुम्हाला पैसे कशासाठी हवे असतात, तर सुख मिळविण्यासाठी. कोणत्याही प्रकारची कोणतीही गरज ही शेवटी सुखासाठी असते. सुखाचेही वेगवेगळे स्तर आहेत. एक आहे शारीरिक - तुम्ही जर गवतावर बसला असाल, तर तुम्हाला वाटते की, ‘एक उशी असती तर बरे झाले असते.’दुसरे आहे मानिसक सुख - हे तर आणखीनच आवश्यक आहे. जरी तुमचे घर सुखदायी असले, पण मन सुखी नसले, तर तुम्ही त्या आरामदायी गादीवरही नीट झोपू शकणार नाही. आणखी एक आहे भावनिक सुख. तुमच्याकडे सगळे काही असेल, पण तुमच्या अगदी जवळची एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल किंवा त्याने तुम्हाला दुखावले असेल, तुमचे भावनिक सुख गेलेच. आणखी एक म्हणजे आध्यात्मिक सुख. हे सुख आत्म्याचे असते. पूर्ण शांती, आतून येणारा अखंड असा शांती आणि आनंदाचा झरा. असे सुख म्हणजे तुम्ही स्वत: आहात तसे असणे. सुख कुठे असते ? ते शरीरात असते की मनात ? ते दोन्हीचा मिलाफ असते. कधी-कधी शरीर सुखी नसेल, तर मनही सुखी नसते आणि मन सुखी नसेल तर शरीर सुखी नसते. शरीरापेक्षा मनाचे सुखी असणे जास्त महत्त्वाचे. मन शरीरापेक्षा तिप्पट जास्त सामर्थ्यवान असते. त्यामुळे मानसिक सुख हे शारीरिक सुखापेक्षा तिप्पट जास्त महत्त्वाचे असते. सुख हे बांधिलकी/वचनबद्धतेवर अवलंबून असते. इतरांची वचनबद्धता तुम्हाला सुख देते. उदाहरणार्थ, रोज दूध आणून देण्याची दूधवाल्याची वचनबद्धता तुम्हाला सुख देते. तुमच्या वचनबद्धतेमुळे इतरांनाही सुख मिळायला हवे. कधी-कधी लोक म्हणतात की, ‘या बांधिलकीमुळे मी दु:खी आहे.’ मात्र, असे समजू नका.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक