शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २६, माणूस ही परमेश्वराची प्रतिकृती आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 11:27 IST

माणसाची बुध्दी ही दुधारी आहे. एखादे दुधारी शस्त्र ज्याला दोन्ही बाजूंनी धार असते तशी माणसाची बुध्दी ही दुधारी आहे म्हणजे ती विनाश करू शकते तशी ती उत्कर्ष  देखील करु शकते,विकासही करु शकते.

ठळक मुद्देपरमेश्वराने माणूस ही आपली प्रतिकृती निर्माण केलेली आहे म्हणूनच माणूस प्रतिसृष्टी निर्माण करू शकतोमाणसाने देव व्हायचे की दानव व्हायचे हा प्रश्न माणसाच्या समोर आहे

सदगुरू श्री वामनराव पैमाणसाची बुध्दी ही दुधारी आहे. एखादे दुधारी शस्त्र ज्याला दोन्ही बाजूंनी धार असते तशी माणसाची बुध्दी ही दुधारी आहे म्हणजे ती विनाश करू शकते तशी ती उत्कर्ष  देखील करु शकते,विकासही करु शकते. पण ही बुध्दी विनाशाकडे जास्त झुकते व विकासाकडे जात नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. जर माणसाने आपल्या बुध्दीचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला तर तो या जगाचे नंदनवन करू शकतो कारण माणूस ही परमेश्वराची प्रतिकृती आहे. माणसाने जशी प्रतिसृष्टी निर्माण केली तसे परमेश्वराने माणूस ही आपली प्रतिकृती निर्माण केलेली आहे. त्याचसोबत हे ही लक्षांत ठेवली पाहिजे की परमेश्वराने माणूस ही आपली प्रतिकृती निर्माण केलेली आहे म्हणूनच माणूस प्रतिसृष्टी निर्माण करू शकतो.

माणूस हा परमेश्वराचे प्रतिक आहे म्हणूनच माणसाने सुखी होण्यासाठी काय केले पाहिजे हया प्रश्नाचे उत्तर आपोआप आले. लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करण्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशिर्वाद द्या. आपले वाडवडिल आपल्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद देतात. मला मला काही लोक सांगतात आमच्या डोक्यावर हात ठेवा. त्याला बरे वाटते म्हणून मी ठेवतो. आपण त्याला आशिर्वाद देण्यासाठी त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि भस्मासूर त्याचे भस्म करण्यासाठीच त्याच्या डोक्यावर हात ठेवत होता. अशी जगात दोन माणसे आहेत. सूर व असूर अशी दोन प्रकारची माणसे या जगात आहेत. देव व दानव दोन्ही माणसांत आहे. माणसाने देव व्हायचे की दानव व्हायचे हा प्रश्न माणसाच्या समोर आहे.

आपण म्हणतो माणसासमोर अनेक प्रश्न आहेत पण मी म्हणतो माणसाच्यापुढे एकच प्रश्न आहे व तो म्हणजे आपण देव व्हायचे की दानव व्हायचे. देव व्हायचे ठरविले की माणसाचे सर्व प्रश्न सुटतात व तो सुखी होतो व त्याने दानव व्हायचे ठरविले किंवा ठरवायला कशाला पाहिजे तो दानव झालेलाच आहे व त्यामुळेच सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत. घरामध्ये, दारामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये कुठेही बघा सर्वत्र प्रश्न, समस्या, संकटे, दु:ख हे सर्व पहायला मिळते याचे कारण माणूस आपल्या बुध्दीचा वापर जसा करायला पाहिजे तसा करत नाही. तो देव होत नाही तर तो दानव होतो. माणूस जर देवाची प्रतिकृती आहे तर तो देव होण्याऐवजी दानव का होतो. त्याचे एक कारण असे की पाणी हे जमिनीवर पडले की ते खालच्या दिशेने वहाते तसे माणसाचा कल हा सखल दिशेला जातो.