शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

श्रीमंत बनायला अन् गरीब बनायला माणूसच कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:15 IST

श्रीमंतीचं शास्त्र आहे अन् गरिबीची कारणं आहेत. श्रीमंत बनायला अन् गरीब बनायला माणूसच कारणीभूत असतो. श्रीमंतीचं शास्त्र फारच सोपं आहे. या शास्त्रात फक्त चांगलाच विचार करायचा आहे.

- विजयराज बोधनकरश्रीमंतीचं शास्त्र आहे अन् गरिबीची कारणं आहेत. श्रीमंत बनायला अन् गरीब बनायला माणूसच कारणीभूत असतो. श्रीमंतीचं शास्त्र फारच सोपं आहे. या शास्त्रात फक्त चांगलाच विचार करायचा आहे. श्रीमंत माणसं सकारात्मक म्हणजे यशाचाच विचार करतात. म्हणून त्यांच्या पदरात यशच पडतं आणि गरिबी टिकवणारी माणसं नकारात्मक म्हणजे अपयशाचा विचार करतात. त्यांच्या पदरात अपयशच पडतं. देव हा सकारात्मक विचार करायला लावणारा मार्ग आहे. पण गरीब माणसं देवाजवळ फक्त आपली गाºहाणी घालतात. अडचणी आपण निर्माण करतो. त्या सोडवायच्यासुद्धा आपणच. त्यात देव काहीही सहकार्य करू शकत नाही.देव हा नेमकं काय देतो तर नवा विचार आणि प्रेरणा देतो. बुद्धी हे असं एक कपाट आहे ज्यात माणूस आपले अनंत विचार, बालपणापासूनच्या आठवणी, घडून गेलेल्या घटनांचे तपशील, पुस्तकातून वाचलेल्या गोष्टी, कथा, व्यथा, भेटलेल्या चित्रविचित्र माणसांचे अनुभव, अचानक सुचलेल्या नवकल्पना, मित्रांनी, गुरूजनांनी, मातापित्यांनी दिलेले मौलिक सल्ले अशा अनेक गोष्टी मेंदू आपल्या कप्प्याकप्प्यात साठवून ठेवतो आणि योग्य वेळी योग्य गोष्टीचा वापर करतो. ज्याची बुद्धी सतत निसर्गाकडून, समाजाकडून प्रेरणा घेत कृती करीत असतो आणि तोच कृतिशील मानव मनाने, धनाने, तनाने श्रीमंत होऊ शकतो. यात देव फक्त एक दुवा असतो.जो मानव बुद्धीचा काहीच वापर करीत नसेल तर त्याला गरिबी अधिक गिळत जाते. अशा गरिबांनी कितीही तीर्थयात्रा केल्या, पूजापाठ केले, व्रतवैकल्ये केली तरी देव त्याच्या पदरात गरिबीच टाकत राहतो. कारण देव झोपणाऱ्याला झोप देतो आणि बुद्धीने चालणाºयाला बुद्धी देतो. हेच श्रीमंतीचं शास्त्र आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक