शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रसंतांची पत्रे : एकांत व साधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:37 IST

अहो, ज्या दिवशी तुम्हाला देवाची चिंता लागेल त्या दिवशी तुमचा धंदाच तुम्हाला मदत करील. लोकच तुमच्याजवळ हल्लाकल्ला करणार नाहीत. पण प्रथम तुम्हाला वेड तर लागू द्या देवाचे! मी एकान्त करू नये असा आग्रह धरणारापैकी नाही. पण जसे काम करताना शीण येतो तसाच एकान्तातही माणूस जास्त वेळ राहिला तर तेथेही उपद्रव निर्माण करतो.

ठळक मुद्देअध्यात्म

प्रिय मित्र -आपण एकान्तासाठी फारच धडपडला आहात असे आपल्या पत्राावरून दिसते. पण तुम्हाला तो एकान्त तुमच्या कामातही साधता आला पाहिजे ना! नाही तर एकान्तात गेला तर घरादाराची चिंता त्रास देईल व लोकान्तात बसलात तर एकान्तात त्याची धडपड राहील. मला वाटते, आपण दोहोचा समन्वय केला पाहिजे व तो तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या मनाची धारणा योग्यवेळीयोग्य चिंतन करण्याची होईल. 

हे बघा, साधारण विषयी माणसालासुद्धा लोकान्तात आपली भावना आपल्या पत्नी, पुत्राबद्दल दृढ करता येते. तो त्याकरिता काय वाटेल ते काम करून त्यांच्या भलाईचे नेहमी चिंतन करत राहतो आणि तुम्हाला म्हणे, देवाच्या भक्तीकरिता देवळात जाऊन, डोळे लावून, नाक धरून व कान दाबून चोरासारखे बसून चिंतन करावे लागते आणि तरी ते पूर्ण होणे कठीणच आहे, नाही का?अहो, ज्या दिवशी तुम्हाला देवाची चिंता लागेल त्या दिवशी तुमचा धंदाच तुम्हाला मदत करील. लोकच तुमच्याजवळ हल्लाकल्ला करणार नाहीत. पण प्रथम तुम्हाला वेड तर लागू द्या देवाचे! मी एकान्त करू नये असा आग्रह धरणारापैकी नाही. पण जसे काम करताना शीण येतो तसाच एकान्तातही माणूस जास्त वेळ राहिला तर तेथेही उपद्रव निर्माण करतो. कारण ज्या मनामुळे आपण एकान्त चाहतो ते मन एकान्तात गेले म्हणजे स्वस्थ बसून राहते काय? छे! ते तर जास्त हलकल्लोळ करते. मग त्याला समजावण्यासाठी विवेक बलवान करून स्थिर करावा लागतो. तेही होईल की नाही शंकाच आहे. प्राणायामाने, योगासनाने, मनाची गती थोडी थांबते एवढेच. पण तेवढी कसरत संपली की पुन्हा ते तसेच वागू लागते. हा बऱ्याच साधकांचा अनुभव आहे.माझे म्हणणे असे आहे की काही श्रवणभक्ती करावी. काही नामस्मरणाची वाणी मनाने चालवावी व कामातही त्याला वेळ देत जावा. ‘हात कामी व चित्त नामी’ असाही अभ्यास करावा आणि आपली आवड सत्कार्याबद्दल तन-मन धनाने वाढवावी. म्हणजे मनाला जेव्हा त्याचा स्वाद लागेल तेव्हा लोकान्तातही एकान्त साधता येईल. नाही तर वाघासारखी गुहेत राहण्याची सवय असूनही वेळ आली की उडी मारणार! आपली शिकार थोडीच सोडणार आहे तो! तसे मन वाईट प्रसंगी पाप करणार व मग एकान्तात जाऊन ध्यान साधणार! यात काय अर्थ? त्याकरिता सत्समागम करीत राहावा व संयमाने वागावे म्हणजे मनाला तशी सवय लागेल. पण हे सर्व अभ्यासानेच होत असते.-तुकड्यादास

  • संकलन : बाबा मोहोड
टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजYogaयोग