शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कृष्ण माझा सखा.......!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:53 IST

भारतीय तत्वज्ञान हे महान विचारांची जननी आहे. त्यामध्ये कृष्णाची भगवद्गीता हा ग्रंथ तर मानवी जीवनाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे.

अवघ्या भारत वर्षांमध्ये कृष्ण जन्म हा जन्माष्टमीच्या उत्सव म्हणूनमोठ्या आनंदात साजरा होतो. कृष्ण हा एक बालगोपाल म्हणून समजूनघेतला तर समजतो. राधेच्या कृष्ण समजायला आणखीच भक्तीची साधनाआवश्यक आहे तर, अर्जुनाचा सारथी असणारा पार्थसाठी समजून घेण्यासाठीभगवद्गीता समजून घेणे गरजेचे आहे. कृष्णाय वसुदेवाय हरये परमातमनेनमः।।प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नम:भारतीय तत्वज्ञानानुसार कृष्णजीवनहा एक अदभूत असा चमत्कार आहे. प्रत्येकाला असे वाटावे की, कृष्ण हे आपल्याचजगण्याची कथा सांगत आहेत. मनुष्य जन्माची क्षणभंगुरता व मानवाला असलेलीविवंचना हे आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून पदोपदी दिगदर्शित करते. भारतीयतत्वज्ञान हे महान विचारांची जननी आहे. त्यामध्ये कृष्णाची भगवद्गीता हा ग्रंथतर मानवी जीवनाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. त्या ग्रंथाद्वारा आपणजीवनातील पराक्रमाची अत्त्युच्च पातळी तर गाठू शकतो. सोबतच आपणसमाधानाने जीवन कसे जगावे याचा वस्तुपाठच आहे. भारतीय जीवनमार्गाचेअनेक मार्ग आपल्याला दिसत असले तरी, त्यातील कृष्णविचार हा अतिशयमहत्वाचा सिद्धांत आहे. त्यातून जीवनाची अपारता, भव्यता व समतानताआपल्याला अनुभवता येते. मनुष्यानाम सह्स्त्रेषू । या वचनानुसार प्रत्येक पुरूषानेआपल्या प्रकृतीनुसार आपल्या जीवनधरणा निश्चित करून त्याप्रमाणे जीवनातयोगी होण्याच्या वाटेवर प्रवास करावा त्यामुळे प्रत्येकाला आपल्या जीवनातकृष्णभावना जोपासण्याचा प्रयत्न करावा. ते आपल्याला जीवन कसे जगावे याचाआदर्श वस्तुपाठ देतात.

अनन्याच्श्रिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।तेषा नित्याभियुक्तांना योगक्षेम्य वहाम्यहम ।। गीता 9/22

जीवनामध्ये जे भक्त एकनिष्ठेने ईशचिंतन करतात. त्याचा योग व क्षेमसाक्षात परमेश्वर चालवतात. असे भगवान गीतेमध्ये सांगतात. जे भक्तपरमेश्वराच्या भावाला विकले गेलेले आहेत. आईच्या गर्भामध्ये असणारे मूलकोणत्याही व्यवहाराला जाणू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे परमेश्वराशिवायज्यांना काहीच चांगले वाटत नाही. ते केवळ परमेश्वरासाठीच जगतात. असेएकनिष्ठपणे परमेश्वराचे चिंतन करतात, परमेश्वराची उपासना करतात. परमेश्वरअशांची सेवा करीत असतो. ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात् त्याचे वर्णन करतात-

आणि मी वाचूनि काही । आणिक गोमटे नाही ।ऐसा निश्चयोचि तिही । जयांचा केला ।।जो अनन्य यापरी ।मी जाहलाही माते वरी ।तेची तो मूर्तधारी । ज्ञान पै गा। ज्ञाने. 13/603

परमेश्वराचा अनन्यभक्त परमेश्वराकरीताच शरीराने कर्म करतो. त्यालापरमेश्वरावाचून जगात दुसरे काहीच चांगले नसते. संत ज्ञानेश्वर अनन्यभक्ताचेवर्णन ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात सांगतात. अशा प्रकारे परमेश्वरावरअनन्यभक्तांची श्रद्धा व प्रेम सतत पडणा-या पावसामुळे नदितील वाढत्यापाण्याप्रमाणे वाढत असतो. त्याचप्रमाणे रात्रंदिवस सर्व इंद्रियासहीत परमेश्वराच्यादृढ अतःकरण ठेवून परमेश्वराची भक्ती – उपासना अनन्यभक्त करीत असतो. जोअनन्यभक्त असतो, त्या ज्ञानी अनन्यभक्ताला जगात एका परमेश्वराच्यास्वरूपाशिवाय काहीच विश्वसनीय न चांगले नाही,. असा त्याच्या काया, वाचामनाने केलेला निश्चय असतो.

परिपूर्णतमः साक्षात श्रीकृष्णनान्य एवहि।एककारार्थमागत्य कोटी कार्य चकार ह ।। .. गर्गसंहितादूर्जनांचा येणे करूनी संहार । पूर्ण अवतार रामकृष्ण ।। तु. म.

रामकृष्ण पूर्ण अवतार आहेत. मात्र राम अवतारात सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्यनाही. रामाने वनवासात जांतांना सितेला सोबत घेतले परंतू ऊर्मिलेला सोबतघेण्यासाठी ते परवानगी देवू शकत नाहीत कारण वाल्मिकिने रामायणात फक्त

तिघांनाच वनवास लिहीला आहे. यावर लक्ष्मण काहीही बोलू शकले नाही. मात्रश्रीकृष्णांचे तसे नाही सामर्थ्यासह स्वातंत्र्य आहे. रामाने अकरा हजार वर्षे राज्यकेले. पण श्रीकृष्णाने फक्त सव्वाशे वर्षे राज्य केले.

यदुवंशेsवतूर्णस्य भवतः पुरूषोत्तमा ।शरच्छतम व्यतीताय पच्चविशाधिकं प्रभो। भागवत

मृत्युलोकी मनुष्यमर्यादा । शतवर्ष जी गोविंदा । ते अतिक्रमोनि अवदा।

अधिक मुकुंदा पंचविस जाहली ।। भागवत

श्रीकृष्णाला पापपुण्य नाही, त्यांना म्हातारपण नाही, शोक नाही ते विशोकोआहेत. गोकुळातून सहज मथुरेत गेले, किबहुना स्वतःचे कुळ संपवून अवतारसंपविला तरी चेह-यावर हास्यच. यांना मृत्यू नाही कारण जन्ममरणांतीत आहेत.ते विधिघत्सो आहेत त्यांना भूक लागत नाही. अभिप्यास यांना तहान लागत नाही.पूर्णकाम यांचा काम नेहमी पूर्ण असतो. पूर्ण तृप्त हे असतात त्यांना पूर्णत्व प्राप्तझालेले असल्याने त्यांना कोणत्याही कामना पूर्ण होते. श्रीकृष्ण हे सत्यसंकल्पाचेदाता आहेत त्यांचे प्रत्येक कार्य सफल होते.

आदौ देवकी गर्भ जननं गोपीगृहे वर्धनम ।माया पुतना जीवताप हरणं गोवर्धन धारणम ।कंस छेदनं कौरवादि हननम् कुंती सुता पालनम ।एतद्वी भागवत पुराण कथितम श्रीकृष् लीलामृतम ।।

ठायिचाची काळा अनादी बहू काळा । महणवूनी वेगा चाळा लावियेला ।। ज्ञाने.श्रीकृष्णास समजून घेणे हे अंतराम्याला जाणून घेण्यासारखे आहे. श्रीकृष्ण हे असेव्यक्तीमत्त्व आहे जे प्रत्येक अवस्थेतल्या व्यक्तीला आपल्यासारखे वाटते. त्यांनाश्रीकृष्णाचा जीवनविचार आपल्या जीवनाला मार्गदर्शक आहे. श्रीकृष्णानेसांगीतलेला गीताविचार सर्वकाळात सर्वांना लागू होणारा आहे. प्रत्येकाच्याजीवनाला मार्गदर्शक आहे. श्रीक़ृष्णविचार हा कोणत्याही धर्मासाठी कालातीतआहे. तो सर्वांना सर्वकाळात लागू पडतो. अर्जून युद्धप्रसंगी जेव्हा श्रीकृष्णाला

विचारतो रणांगणावर जे युद्धासाठी उभे आहेत ते माझे काका, मामा , गुरू आहेत.मी युद्ध कसा करू. श्रीकृष्ण अर्जूनाला सांगतात –“ तुझे कर्म आहे क्षत्रियाचाधर्मपालन कर, समोर कोण उभे आहे याचा विचार करू नकोस” . कृष्ण कृष्णमहाकृष्ण सर्वज्ञ त्व प्रसिद्ध महें। रमा रमणे विद्येशू विद्या म माहीप्रयच्चेशु।।आपल्याही जीवनाचे असेच आहे जेव्हा संसाराच्या रणांगणावर मन सैरभैरहोते त्यावेळी श्रीकृष्णाचा कर्मयोग मार्गदर्शक आहे म्हणून कृष्णभावना हीसमजावून घेण्यासाठी आहे. जन्माष्टमी हा सण सर्व भारतामध्ये मोठ्या उत्साहातसाजरा केला जातो. दहीहंडी फोडण्याचा साहसी खेळ ह्या सणाचे महत्वाचेआकर्षण असते. कृष्णविचार व कृष्णभावना समजून घेतल्यास प्रत्येकाच्याजीवनात आनंदाच्या दहिहंडीची उधळण होईल.

- प्रा. डॉ. हरिदास आखरे

टॅग्स :spiritualअध्यात्मिकJanmashtamiजन्माष्टमीAdhyatmikआध्यात्मिक