शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Kojagiri Purnima 2020 : कोजागरी पौर्णिमा कधी?, काय आहे व्रत अन् महत्त्व?... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 11:27 IST

Kojagiri Purnima 2020 : कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो. 

शीतलता आणि सुंदरता यांचा एक आल्हाददायी सुंदर समन्वय म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमेचा चंद्र हा तर पूर्णत्वाचा आविष्कार आहे. यंदा कोजागरी पौर्णिमा ही शुक्रवारी (30 ऑक्टोबर) आली आहे. कोजागरी पौर्णिमेलाच शरद पौर्णिमा, रास पौर्णिमा, कौमुदी व्रत म्हणतात. विविध नावांनी ती ओळखली जाते. हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो. 

चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची शक्ती असते जी आरोग्यदायी असते असं म्हटलं जातं. चंद्राच्या किरणांमध्ये अमृत असतं अशा कोजागरी पौर्णिमेशी संबंधित मान्यता प्रचलित आहेत. त्या रात्री चंद्राची किरणं ही विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. त्यामुळे कोजागरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करुन करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ, कार्यक्रम हे आवर्जून आयोजित केले जातात. 

कोजागरी पौर्णिमेची वेळ आणि शुभ वेळ

कोजागरी पौर्णिमेचा प्रारंभ - 30 ऑक्टोबर 2020 रोजी 7 वाजून 45 मिनिटं

कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय - 30 ऑक्टोबर 2020 रोजी 7 वाजून 12 मिनिटं 

कोजागरी पौर्णिमेची समाप्ती - 31 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 8 वाजून 18 मिनिटं

कोजागरी पौर्णिमेचं व्रत

कोजागरी पौर्णिमेचं व्रत हे विशेष मानलं जातं. हे व्रत ठेवल्यास विविध रोगांपासून मुक्तता मिळते असं म्हटलं जातं. गंभीर आजारांनी पीडित असलेल्या व्यक्तींसाठी कोजागरी पौर्णिमेचा उपवास अत्यंत फलदायी मानला जातो. विशेष म्हणजे कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खीर बनवली जाते आणि ही खीर रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. दुसर्‍या दिवशी ही खीर प्रसाद म्हणून स्वीकारली जाते. कोजागरी पौर्णिमेचं व्रत हे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी देखील ठेवलं जातं, हे व्रत आनंद आणि समृद्धी आणतं. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी तांबे किंवा मातीच्या कलशावर कपड्यांनी झाकलेली लक्ष्मीची मूर्ती स्थापित करुन त्याची पूजा केली जाते. तसेच या दिवशी तुपाचे 100 दिवे प्रज्वलित केले जातात. असं केल्याने घरावर लक्ष्मीची कृपा असते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असं म्हटलं जातं. 

टॅग्स :kojagariकोजागिरीAdhyatmikआध्यात्मिक