शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

पानी पिना छानके और गुरु करना जानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:40 IST

दांभिकता ही फार पुरातन कालापासून चालत आलेली आहे. सत्य-असत्य हा सापेक्ष धर्म आहेच. धर्माचा खरा अर्थ न समजता आपल्या पोटासाठी धर्माचे सोंग घेतलेली माणसे आजही कमी नाहीत. अंधश्रध्देचे बळी याच लोकांमुळे होत असतात. परमार्थाचा खरा अर्थ कळलेला नसतो आणि सोंग मात्र करतात. ‘पानी पिना छानके और गुरु करना जानके’   

भज् गोविंदम - ६

         जटिलो मुण्डी लुंचितकेश: काषायाम्बरबहुक्रुत वेष : ॥         पश्यन्नपि च न पशति मूढ उदरनिमित्तं बहुक्रुतवेष : ॥          भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मुढमते...॥ध्रु॥ दांभिकता ही फार पुरातन कालापासून चालत आलेली आहे. सत्य-असत्य हा सापेक्ष धर्म आहेच. धर्माचा खरा अर्थ न समजता आपल्या पोटासाठी धर्माचे सोंग घेतलेली माणसे आजही कमी नाहीत. अंधश्रध्देचे बळी याच लोकांमुळे होत असतात. परमार्थाचा खरा अर्थ कळलेला नसतो आणि सोंग मात्र करतात. ‘पानी पिना छानके और गुरु करना जानके’  बाजारात गेल्यानंतर माणूस मडके घ्यायचे असेल तर ते वाजवून घेतो. मग गुरु करायचा तर तो आंधळेपणाने कसा करावा ? जगात भोंदू लोकांचा भरणा तर भरपूर आहे. जगदगुरु श्री. संत तुकाराम महारांजाच्या काळातही असे भोंदू लोक होतेच. महाराजांनी अशा लोकांचा बुरखा फाडला आहे. ते त्यांच्याच शब्दात पाहू.

लांबवुनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोठा करिताती ॥१॥सर्वांगा करिती विभुती लेपन । पहाताती मिष्टान्न भक्षावया ॥२॥

           किंवा.

दाढि डोई मूंडी मुंडूनियां सर्व । पांघुरती बरवी वस्रे काळे ॥१॥उफराटी काठी घेउनियां हाती । उपदेश देती सर्वत्रासी ॥२॥

          किंवा

ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू ॥१॥अंगा लावुनिया राख । डोळे झांकुनि करती पाप ॥२॥

        किंवा 

ऐसे संत झाले कळी । तोंडी तंमाखुची नळी ॥१॥स्नान संध्या बुडविली । पुढे भांग वोढवली  ॥२॥भांग भुर्का हे साधन । पची पडे मद्यपान ॥३॥तुका म्हणे अवघे सोंग । तेथे कैचा पांडुरंग ॥४ ॥ वरील अभंगाचा विचार केला तर लक्षात येते की, लोक डोक्याचे केस वाढवतात. दाढी वाढवतात. भगवे कपडे घालतात. मिथ्याचार करीत लोकांना फसवतात. असे हे साधू कुकर्म करुन, विषय भोग भोगून, अंगाला राख लावून पाप करतात. आचार्यांनी नेमके वर्मावर बोट ठेवले दांभिकतेवर. त्यांनी सुंदर विचार मांडले. जसे गुण कळावे तसे अवगुणसुध्दा कळावे लागतात. कारण दोष जर कळले नाही तर ते (दोष) टाकता येत नाहीत. आचार्यांनी समाजाला भोंदू, दांभीक साधू कळावे म्हणून त्यांनी ‘जटिलो मुण्डी लुंचितकेश: काषायाम्बरबहुक्रुत वेष : ॥ पश्यन्नपि च न पशति मूढ उदरनिमित्तं बहुक्रुतवेष : ॥ह्या श्लोकाद्वारे स्पष्ट केले आहे. 

बुडते हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणोनिया ॥ ह्या तुकोक्तिप्रमाणे समाजाची आचार्यांना दया आली आणि त्यांनी पोटासाठी ‘बहुक्रुत वेष’ नाना वेष करुन समाजाची दिशाभूल करतात. यामुळे समाज अधोगतीस जातो. समाज आचार-भ्रष्ट, विचार-भ्रष्ट, धर्म-भ्रष्ट, होताना संतांनी पाहिला आणि त्यांना ते बघवले गेले नाही. म्हणून त्यांनी समाज प्रबोधन केले. ‘उजळावया आलो वाटा । खरा खोटा निवाडा ॥ खºया-खोट्याचा निवाडा करण्यासाठी आम्ही आलो आहोत. 

माउली ज्ञानोबाराय म्हणतात, तापत्रये तापली गुरुते गिवसीती । भगवा देखोनी म्हणती तारा स्वामी ॥ लोक त्रिवीध तापाने पोळलेले असतात. त्यांना कुठेतरी समाधान हवे असते. मग ते लोक भोंदू साधू, भगव्या वेषधारी साधुला खरा साधू समजतात व त्याला शरण जातात. तो त्यांना फसवतात. म्हणून संत समाजाला विचार देऊन जागे करण्याचा प्रयत्न करतात. प्रबोधन करुन समाज जागृती करुन फार महत्वाचे काम संतानी केले आहे. सदाचार संपन्न समाज घडवण्यात संताचे फार मोठे योगदान आहे. त्यांचे समाजावर फार मोठे उपकार आहेत.

जगदगुरु श्री. तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगो आता संताचे उपकार । मज निरंतर जागविती. धर्म जागृती, कर्म जागृती, उपासना जागृती, नाम जागृती, तीर्थ जागृती, अशा अनेक प्रकारच्या जागृती आहेत. तथापि सर्वात महत्वाची म्हणजे आत्म जागृती. ही जागृती संत करीत असतात. त्यामुळेच या जगाला खरे मार्गदर्शन होत असते. 

-भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले,( गुरुकुल भागवाताश्रम, चिचोंडी (पाटील) ता. जि. अहमदनगर)