शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 9:14 PM

आज कार्तिकी एकादशी.

आज कार्तिकी एकादशी त्यानिमित्ताने अवघ्या देशभरातून पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित झालेला आहे हा भक्तसमुदाय म्हणजेच वारकरी, टाळकरी, माळकरी संत-महंत व सामान्य भक्त या सर्वांसहित पंढरी मध्ये दाखल झाला आहे. कोणतेही पत्र कोणी पाठवले नाही. कोणताही सांगावा पाठवला नाही. तरीसुद्धा जमलेली ही भक्तांची मांदियाळी हेच दर्शविते की भक्तीचा उमाळा जेव्हा अंतकरणातून दाटून येतो , तेव्हा एकच शब्द उमटतो तो म्हणजे विठ्ठल... विठ्ठल.... देव विठ्ठल। क्षेत्र विठ्ठल । देवता विठ्ठल। नामदेवांचा हा अभंग सर्व जीवन हे विठ्ठल आणि त्याच्या भक्तीने भरलेले आहे असे दर्शविते. जळी-स्थळी विठ्ठल भरीला । रिता ठाव नाही उरला।। विठ्ठलची.. विठ्ठलची आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने भगवंत चातुर्मासाला चार महिने शयनासाठी गेलेले भगवंत आज जागृत होत आहेत. त्यांला डोळे भरून पाहून घ्यावे व आपल्या हृदयात साठवून घ्यावे यासाठी ही मांदियाळी चंद्रभागेच्या तीरावर जमलेली आहे.भक्त पुंडलिकाचे प्रथम अधिष्ठान त्याला पहिल्यांदा नमस्कार, चंद्रभागेमध्ये स्नान व भक्त पुंडलिकाची आईवडिलांची सेवाभाव पाहून आज प्रत्येक भक्तगण 20ते 25तास वारीमध्ये उभे राहून चालत चालत पंढरीच्या पांडुरंगाच्या पायापर्यंत आपले मस्तक टेकावे यासाठी विठ्ठल नामाचा गजर करीत करीत पोहोचत असतात. विठ्ठलाच्या नामामध्ये एक भावशक्ती असल्याचा भास त्यांना होतो. म्हणूनच ते पाचशे ते सहाशे किलोमीटर प्रवास त्यानंतर ३६ ते ४० तास दर्शन बारी मध्ये दर्शन बारी मध्ये चालणे हे सामान्य इच्छाशक्तीच्या बाहेरचे काम आहे.वेदांनाही नाही कळला अंतपार याचा । कानडा-राजा-पंढरीचा।। वेद, स्मृती, श्रुती उपनिशद यांच्या आवाक्या बाहेर असणारा हा विठ्ठल मात्र वारकऱ्यांच्या हृदयामध्ये व कंठामध्ये सदैव वास करीत असतो. त्याला पाहण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वारकऱ्यांची विशुद्ध कीर्तने व वारकऱ्यांची आषाढी - कार्तिकी वारी होय.घेई घेई माझे वाचे ।गोड नाम विठोबाचे ।।[हा विठोबा पंढरपूरला कोठून आला? कशाकरिता आला? व कसा आला? त्याबद्दल नाथ महाराज सांगतात- हरी वैकुंठ होऊनी आला । पुंडलिका लागुनी उभा राहिला अजुनी । युगा युगी भक्ता संगे । एका जनार्दनी संत शोभा शोभा ।।पुंडलिकाला जो भगवंताचा वर मिळाला होता त्यात त्याने मागितले आहे की विठोबा तुझ्याकडे जे येतील ते कसेही असले तरी त्यांना तुझ्या दर्शनाने मोक्ष मिळाला पाहिजे. ज्ञानविज्ञान हिन: नाम नाम पापीपापी नाम दर्शनासस्ते प्रार्थन: पुन्हा पुन्हा।। ज्यांना ज्ञान-विज्ञान जास्त माहित नाही, जे मूढ व पापी आहेत त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाने मोक्ष दे अशी मी तुला पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो. मूढ पापी जैसे तैसे उद्धरी कासे लावून ।।असे तुकाराम महाराज म्हणतात. तात्पर्य विठोबाचे हात, पाय व दृष्टी सर्वांच्या हृदयात सम असून, तो विठ्ठल सर्वांना दर्शनाकरिता खुला आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात -सर्वांच्या कल्याणासाठी उभा असलेला हा विठ्ठल युगे अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।। पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा।चरणी वाहे भीमा उद्धरी जगा।।असा जगाच्या उद्धाराकरिता उभा असलेला विठ्ठल सर्वांचे कल्याण करतो. कारण- नाथ बाबा सांगतात-पंढरपूर पाटणी ग महाराज सार्वभौम। पांडुरंग दिनबंधू जयाचे ते नाम।।डॉ. हरिदास आखरेसंतसाहित्याचे अभ्यासक
टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक