शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तुला जे करायचं ते कर; फक्त सर्वोत्तम कर.!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 20:57 IST

म्हणून आपल्याला जे हवे तेच मुलाने करावे हा हट्ट सोडून द्या .

डॉ - दत्ता कोहिनकर टिळकांनी मंडालेल्या तुरुंगातून मुलाला पत्र लिहिले होते , मॅट्रीकनंतर तुला जे काही करायचं ते कर . तु चप्पलंच दुकान टाकलं तरी चालेल पण लोक म्हटली पाहिजेत , तुम्हाला चप्पल घ्यायची का ? मग टिळकांच्या दुकानातूनच घ्या . जे काही करशील ते उत्तमातील उत्तम कर . सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी दोन - चार क्लास लावून मुलाला इंजिनियर बनवलं असतं . पण मग आज क्रिकेटचा बादशहा सचिन उदयास आला असता का ? सचिन तेंडूलकर दहावीच्या परिक्षेत अनुतीर्ण झाला होता पण त्याच्या आवडत्या क्षेत्रात आई वडिलांनी सचिनला एवढे प्रोत्साहन दिले होते त्या प्रोत्साहनातून भारतरत्न सचिन तेंडूलकर उदयास आला ..अब्राहम लिंकनने मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात लिहिले होते . " माझ्या मुलाला जगात कसं जगावं , व विषम परिस्थितीत कसं वागावं हे शिकवा" . मित्रांनो अमेरिकेतून एम . एस . करून आलेल्या मुलाला मुंबईची लोकल पकडता येत नसेल तर काय उपयोग ? म्हणून त्याला तुझ्यापेक्षा कमी मार्क असून तो करतोय मग तुला काय अडचण आहे ? किंवा दोन्ही विषयांचे क्लास लावू . पण तेच कर , हा आग्रह पालकांनी सोडला पहिजे . मुलांच्या करियरसाठी अ‍ॅप्टीट्यूड , डीएमआयटी यासारख्या टेस्ट करून त्याच्या आवडीचे क्षेत्र त्याला निवडू द्या , *बरखा , लतादीदीसारखं गाऊ शकणार नाही . सगळेच पी . टी . उषा सारखे पळू शकत नाही . प्रत्येक व्यक्तीचा पिंड वेगवेगळा आहे .म्हणून आपल्याला जे हवे तेच मुलाने करावे हा हट्ट सोडून द्या .त्यांना वेळ , प्रेम , कौतुकाचे दोन शब्द द्या. त्यांच्या आवडीचे क्षेत्र त्यांना निवडू द्या . अन्यथा आपली मुले नैराश्याकडे जातील . पालकांनो तुमच्या मुलात एक सचिन तेंडूलकर , एक अब्दूल कलाम , एक अर्जित सिंग , एक प्रभू देवा दडला असेल त्याचा शोध घ्या. सारखं अभ्यास कर. म्हणून मुलांच्या मागे लागून त्यांना पुस्तकी किडे बनवू नका . तुमच्या मुलांना कधी कधी चौकात मित्रांमध्ये मिसळू द्या . चौकात मित्रमंडळीमध्ये तयार झालेली मुल ही आयुष्यात कितीही संकट येऊ द्या . कधीच आत्महत्या करत नाहीत . मुलांना स्वता आपले पंख मजबूत करू द्या . डिग्री म्हणजे सर्वस्व नाही हे लक्षात ठेवा .

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक