शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

आनंद तरंग: प्रभू आले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 02:17 IST

जयजयकारे श्रीरामाच्या, स्वागता सज्ज झाली, विजयपताका रांगोळ्यांनी, घरे सारी नटली,

शैलजा शेवडेश्रीराम अयोध्येत परत आले. केवढी आनंददायी घटना अयोध्यावासीयांसाठी...! केवळ नुसत्या कल्पनेनेही आनंदाचे रोमांच उठतात अंगावर...! आपला परमप्रिय राम, पराक्रमी राम, आनंदघन राम, कनवाळू राम मर्यादापुरुषोत्तम राम परत आला. लंकेवर विजय मिळवून, रावणाचा वध करून. अत्यंत आनंदाची गोष्ट...! अश्विन महिन्यातल्या अमावास्येला दीपोत्सवच झाला. दिवाळी साजरी झाली.लक्ष दीप उजळले, नगरी, तेजोमय झाली,जयजयकारे श्रीरामाच्या, स्वागता सज्ज झाली,विजयपताका रांगोळ्यांनी, घरे सारी नटली,प्रभू आले, प्रभू आले, अयोध्या हर्षेभरीत झाली।गंधित वारे वाहू लागले, फळाफुलांनी वृक्ष लगडले,मंगलमय तो घोष, आणखी वेदातले ते मंत्रही घुमले,सात्विक भावे शरयुही मग निर्मल जणू झाली,प्रभू आले, प्रभू आले, अयोध्या हर्षभरित झाली।चौदा वर्षे वनवास संपला, दशाननाचा वधही झाला,आता करील राम राज्य, जनता आनंदली,उत्स्फूर्तपणे शोभायात्री, सामील सारी झाली,प्रभू आले, प्रभू आले, अयोध्या हर्षभरित झाली,श्रीराम रथावर, आरूढ असती,भरताच्या तो लगाम हाती,शुभ्र राजछत्र शत्रुघ्न धरी,लक्ष्मण बिभीषण चवऱ्या ढाळती,देवीदेवता, रामाचे गुणगान गाऊ लागली,प्रभू आले, प्रभू आले, अयोध्या हर्षभरित झाली।रघुनाथ असती, पूर्णचंद्र, जनसागरास आली भरती,उचंबळोनी, परमानंदे, रामासमीप येती,लाटांसम भासती,श्रीरामाच्या जयघोषाने, अवनी दुमदुमली,प्रभू आले, प्रभू आले,अयोध्या हर्षभरित झाली।

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक