शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग- पापामुळे सत्याचे वाटोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 02:29 IST

गेल्या अनेक शतकांपासून माणसांच्या मनात दोन संकल्पना घर करून बसल्या आहेत. एक म्हणजे ‘पाप’ आणि दुसरी म्हणजे ‘पुण्य’ पुण्याचा माणूस संचय करीत राहतो,

प्रा. शिवाजीराव भुकेलेगेल्या अनेक शतकांपासून माणसांच्या मनात दोन संकल्पना घर करून बसल्या आहेत. एक म्हणजे ‘पाप’ आणि दुसरी म्हणजे ‘पुण्य’ पुण्याचा माणूस संचय करीत राहतो, तर पापाला भित राहतो. आपल्या देशात सत्तर टक्क्यांहून अधिक माणसे पापभिरूआहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्रावर माणसांची गर्दी ओसंडून वाहत आहे. देवी-देवतांच्या देवळाच्या भिंंतीला सिमेंट आणि मातीसुद्धा शिल्लक राहत नाही एवढे त्यांचे उंबरे झिजविले जात आहेत. या वेळी सुज्ञ माणसाच्या मनात राहून-राहून एकच प्रश्न उभा राहतो. अत्याधुनिकतेची समज येऊनसुद्धा आमच्या घड्याळाचे काटे उलटे तर फिरत नाहीत ना? पाप मनाने करायचे आणि धुऊन शरीराला काढायचे हा कुठला पापक्षालनाचा न्याय? मुळात पाप ही एक रोगट मानसिकतेची प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती नको ती कृती करायला लावते आणि अशा कृती समाजाला विकृत करीत राहतात. आपण किती पापी आहोत याचे भूत-भविष्य वर्तविण्यासाठी कुठल्या गुरूची गरज नाही. तोंडात देवाचे नाव आणि बगलेत सुरी असेल. वरून-वरून दान-धर्माची दांभिक कृती करायची आणि मनात परधन, परनारी यांना ओरबाडून काढायचे प्लॅनिंंग सुरू असेल, दुसऱ्याला काटा रुतल्यानंतर आपले दात दिसत असतील, दुसºयाचे आसू हेच आपले हसू असेल तर आपण शंभर टक्के पापी आहोत, असे समजायला काहीच हरकत नाही. अशा पापात्मक प्रवृत्तीमुळे सत्याचे पार वाटोळे झालेय म्हणून या प्रवृत्तीचा निषेध करताना तुकोबाराय म्हणतात -पापाचिया मुळे, झाले सत्याचे वाटोळे।दोष जाहले बळीवंत, नाही ऐंसी जाली नीत ।मेघ पडो येतो भीती, पिके साडीयली क्षिती ।तुका म्हणे काही वेदावीर्य शक्ती नाही॥समाजात जेव्हा पापात्मक दोष बलवंत होतात तेव्हा त्या समाजातील दोषी मंडळींची वाटचाल नरकाच्या दिशेने सुरू आहे, असे समजायला काहीच हरकत नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक