शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

विनोदी वृत्ती नि जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 21:44 IST

नासिरूद्दिन होडजा नावाचा एक चतुर माणूस होऊन गेला.

- रमेश सप्रे

नासिरूद्दिन होडजा नावाचा एक चतुर माणूस होऊन गेला. आपल्या बिरबलासारखा किंवा तेनाली रमणसारखा हजरजबाबी आणि प्रसंगावधानी होता तो. त्याचे अनेक किस्से सांगितले जातात. ते नुसते मनोरंजक नसतात तर उद्बोधकही असतात. त्यातून आपल्या आजच्या जीवनाला मार्गदर्शन मिळते. हा किस्सा पाहा. एकदा नासिरूद्दिनला पोहणं शिकण्याची लहर आली. त्यानं आपल्या पत्नीला आपल्या मनातला विचार सांगितला. तिनं होकार देताना एक महत्त्वाची सूचनाही दिली. ‘आपल्या गावात तो एक पहलवान आहे ना? त्याच्याकडून शिका. म्हणजे तुम्ही बुडू लागलात तर तो आपल्या शक्तीनं तुम्हाला वाचवेल. नाहीतर तुम्ही शिकवणा-याला बरोबर घेऊन बुडाल. समजलं ना?’ ठरल्याप्रमाणे तो त्या पहलवानासह नदीच्या काठावर पोचला. पैलवानानं आपले कपडे काढले आणि तो पाण्यात उतरला नि त्यानं मजेत पोहायला सुरुवात केली. त्यानं नासिरूद्दिनलाही कपडे काढून पाण्यात यायला सांगितलं. आतापर्यंत पोहणं शिकायला उत्सुक असलेल्या नासिरूद्दिनला पाणी पाहून भय वाटू लागलं. त्याचे पाय थरथर कापू लागले. पहलवान पुन्हा पुन्हा बोलावतोय हे पाहून तोही पाण्याच्या दिशेनं निघाला. नदीकाठी झाली होती निसरण. त्या घसरडय़ावरून पाण्यात पोचण्यापूर्वीच नासिरूद्दिन पडला. नंतर कसाबसा उठून नदीपासून दूर धावू लागला. पहलवानानं कारण विचारताच तो म्हणाला, ‘अरे, पाण्यापर्यंत पोचण्याच्या आतच मी घसरून पडलो, मग पाण्यात उतरल्यावर बुडून मरेन हे निश्चित. ते काही नाही. पोहणं शिकल्याशिवाय मी कधीही पाण्यात उतरणार नाही.’

यातला गमतीचा भाग सोडला तरी आपण असंच नाही का वागत? ‘ते जमल्याशिवाय हे करणार नाही आणि हे केल्याशिवाय ते जमणार नाही’ अशा दुष्टचक्रात आपण अनेकदा गरगरत राहतो. सुरुवात केल्याशिवाय कोणतंही काम, संपणारच कसं? अन् वडील मंडळी तर सांगतात, ‘हाती घ्याल ते तडीस न्या. कसं न्यायचं तडीस? त्यासाठी शहाणी मंडळी म्हणतात तीन गोष्टी हव्यात ‘नड-आवड अन् सवड!’ विशेष म्हणजे या तिन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात तसंच एकमेकांना पूरकही असतात.

जीवनात आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते. प्रसंगाची तीव्रता जाणून घेऊन त्यातून आनंदी, हुषार वृत्तीतून मार्ग काढणं. काही जण याला विनोदी वृत्ती किंवा दृष्टी म्हणतात. आध्यात्मिक क्षेत्रातले अनेक संत महात्मेही याला खूप महत्त्व देतात. जीवनातली प्रत्येक घटना गंभीरच असते असं नाही. असली तरी तिला हलकी फुलकी बाजूही असते. या बाजूनं प्रयत्न करताना आपली विनोदी वृत्ती (‘सेन्स ऑफ ह्युमर’) खूप उपयोगी पडते.

नासिरूद्दिनचीच एक गोष्ट सांगतात. एकदा उन्हातून घरी पोचला. वेळ दुपारच्या जेवणाची होती. घामानं भिजलेला सदरा त्यानं अंगणात वाळत घातला नि जेवायला बसला. इतक्यात एक बंदूक झाडल्याचा आवाज आला. नासिरूद्दिन नि त्याची पत्नी दोघेही धावत अंगणात आले पाहतात तो कुणीतरी मारलेली बंदूकीची गोळी त्यानं वाळत घातलेला सद-यातून आरपार गेली होती. ते पाहून नासिरूद्दिननं गुडघे टेकले नि आकाशाकडे हात करून प्रार्थना करून तो म्हणाला, ‘खुदा तुम बडे रहमदिल हो। आज तुमने मुङो बचाया। शुक्रिया!’ हे पाहून पत्नीनं विचारलं, ‘अशी प्रार्थना का केलीत? कारण तुम्ही तर घरात जेवत होतात. ‘हसून नासिरूद्दिन म्हणाला, ‘मी त्या सद-यात नव्हतो म्हणून तर वाचलो ना?’ म्हणून अल्लाचे आभार मानले.’जीवनाकडे पाहण्याची ही किती निर्मळ, आनंदी दृष्टी आहे नाही? एक सत्पुरुष काम संपवून घरी आले. अंगणात मुलींचा भोंडला चालू होता. पारावर एका हत्तीचं चित्र काढून त्याच्याभोवती फिरत गाणी म्हटली जात होती.

‘अस्सं माहेर सुरेख बाई खायला घालतं। अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारतं।।’ माहेर-सासरचा विवाहित स्त्रियांचा अनुभव किती हृद्य रीतीनं त्याने वर्णन केला होता. मागील अंगणात गेल्यावर पाहतात तो बायको गोठय़ात दूध काढत होती. तिचं अर्ध तोंड सुजलं होतं. ‘काय झालं गं?’ म्हणून विचारल्यावर म्हणाली, ‘अहो, दूध काढताना म्हशीनं लाथ मारली म्हणून सुजलीय तोंडाची उजवी बाजू. पण काही हरकत नाही कारण म्हैस माहेरची आहे ना?’ यावर हसावं की रडावं हे न कळून ते सत्पुरूष उद्गारले. ‘बरं झालं मी म्हशींच्या जवळ उभा नव्हतो नाही तर तीच लाथ सासरची झाली नसती का?’ यावर दोघंही खळखळून हसले. पत्नीची वेदना आणखी कमी झाली!

पण खरंच असतं का असं माहेर.. सासर? मुलीचं माहेर हे सुनेचं सासर नसतं का? मग सुनेला मुलगी मानली तर? ती माहेराहून माहेरीच येईल नाही का? असं झालं तर काय होईल? बघा विचार करून. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक