शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २९, मानवी शरीर हे साक्षात परमेश्वर आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 14:46 IST

आपल्याला सुख शांती देणारा हा देव आहे कुठे तर तुकाराम महाराज सांगतात हा देव नाही कुठे.“तुका म्हणे विठो भरला सबाह्यी तया उणे काय चराचरी”. कारण तो सर्वांमध्ये आहे व आपण सतत शुभ बोलून सर्वांना सुखी करणे हेच खरे भजन आहे

ठळक मुद्देदेवाने वाचा दिलेली आहे हे माणसाचे केवढे भाग्य आहेकल्पना करा मुक्या माणसाला केवढे वाईट वाटत असेल इतर माणसांना बोलताना पाहूनपण आपण बोलतो याचा आपल्याला खरा आनंद आहे का? नाही याचे कारण अतिपरिचयात अवज्ञा

- सदगुरू श्री वामनराव पैआपल्याला सुख शांती देणारा हा देव आहे कुठे तर तुकाराम महाराज सांगतात हा देव नाही कुठे.“तुका म्हणे विठो भरला सबाह्यी तया उणे काय चराचरी”. कारण तो सर्वांमध्ये आहे व आपण सतत शुभ बोलून सर्वांना सुखी करणे हेच खरे भजन आहे. याचा अर्थ आपण टाळ घेवून भजन करतो ते भजन वाईट आहे असे नव्हे. टाळ घेवून भजन करणे हा उपासनेचा एक भाग झाला पण तुकाराम महाराज तिथेच थांबत नाहीत तर ते पुढे असे सांगतात की देवाने माणसाला बुध्दी दिली आहे तसेच देवाने माणसाला वाचा देखील दिली हे एक अनोखे वैशिष्टय आहे. कारण देवाने ही वाचा  फक्त माणसालाच दिलेली आहे इतर प्राण्यांना दिलेली नाही. त्यामुळे फक्त माणसालाच बोलता येते इतर प्राण्यांना बोलता येत नाही.

प्राण्यांना शिकविले तर थोडे फार बोलू शकतील. पण देवाने वाचा दिलेली आहे हे माणसाचे केवढे भाग्य आहे. कल्पना करा मुक्या माणसाला केवढे वाईट वाटत असेल इतर माणसांना बोलताना पाहून. पण आपण बोलतो याचा आपल्याला खरा आनंद आहे का? नाही याचे कारण अतिपरिचयात अवज्ञा. बघा नवीन मोटार घेतली की सुरवातीला काय आनंद होतो. पण नंतर आपणच म्हणतो ड्रायव्हिंग करणे म्हणजे काय ताप आहे. आपण बोलतो ही देवाची केवढी मोठी कृपा आहे. माणूस ही देवाची प्रतिकृती आहे असे जे मी म्हणतो त्याचे कारण हेच आहे.

जीवनविद्येचा सिध्दांत आहे मानवी शरीर ही परमेश्वराची प्रतिकृती आहे. मानवी शरीर हे साक्षात परमेश्वर आहे. मानवी शरीराकडे बघा.अगदी केसांपासून ते पायाच्या अंगठयापर्यंत सगळे दिव्य आहे. प्रत्येक अवयव दिव्य आहे.डोळे आपल्याला देवाने दिलेत हे आपलं किती भाग्य आहे. याबाबत आंधळ्याला विचारा तो म्हणेल या जगात भाग्यवान तोच ज्याल्या डोळ्यांनी पहाता येते. मुका काय म्हणेल ज्यांना बोलता येते त्यांच्याइतके भाग्यवान दुसरे कुणीच नाही.बहिरा असेल तो काय म्हणेल ज्यांना ऐकता येते त्यांच्याइतके भाग्यवान कुणीच नाही. लंगडा काय म्हणेल ज्यांना चालता येते त्यांच्याइतके भाग्यवान दुसरे कुणी नाही.

जे थोटे असतील ते काय म्हणतील ज्यांना देवाने दोन हात दिले त्यांच्याइतके भाग्यवान कुणी नाही. त्यामुळे प्रत्येक अवयव हा दिव्य आहे.त्याचे मोल करता येणार नाही इतके ते दिव्य आहेत. एका कवीने फार सुंदर म्हटलेले आहे,“डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो मधुरही वाचे आम्ही बोलतो, हातांनी बहुसाळ काम करितो विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरूनी उठतो ही ईश्वराची द्या” यात फक्त द्या या शब्दाऐवजी कृपा हा शब्द वापरला पाहिजे होता. देवाची म्हणा नाहीतर निसर्गाची कृपा म्हणा. जे देव मानत नाहीत त्यांनी निसर्गाची कॄपा म्हणावी.