शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

आरामाची साधनं विकता घेता येतात; पण आनंदाचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 14:03 IST

कितीही पैैसा खर्च केला तरी सुख सोयी, आरामाची साधनं विकत घेता येतात; पण आनंद नाही विकत घेता येत.

- रमेश सप्रेनिधी म्हणजे खजिना, ठेवा किंवा भांडार. सागराला जलनिधी म्हणतात. आपण मात्र निधी शब्द फक्त पैशाच्या संदर्भात वापरतो. निधीसंकलन म्हणजे पैसा जमवणं, कलेचा, गुणांचा, ज्ञानाचा, भक्तीचाही निधी असतो याची आपल्याला कल्पनाही नसते. आनंदाचा निधीही अशा प्रकारचा असतो. कितीही पैैसा खर्च केला तरी सुख सोयी, आरामाची साधनं विकत घेता येतात; पण आनंद नाही विकत घेता येत.एक मार्मिक गोष्ट आहे. मृत्यूच्या क्षणी आपल्या दोन मुलांना बोलावून सांगितलं की शेतात जे राममंदिर आहे त्याच्या कळसात खूप धन लपवून ठेवलंय. मात्र रामनवमीचा उत्सव संपल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कळस फोडून मिळवलं तरच ते मिळेल. मुलं आळशी होती; पण ऐषारामाची त्यांना चटक लागली होती. ते तो दिवस येण्याची वाट पाहत होते. तसं ते मंदिर त्यांच्या पूर्वजांनी आपल्या शेतात बांधलं होतं. खूप कष्ट करून भरभराट झाल्यामुळे श्रीरामाबद्दल कृतज्ञता नि रामाच्या उपासनेकडे, मंदिराच्या देखरेखीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि होती ती धनदौलत उधळून टाकली; पण हा गुप्त निधी मिळाला तर पुन्हा चांगले दिवस येतील या आशेने रामनवमीच्या उत्सवाची गर्दी दुसरे दिवशी कमी झाल्यावर हे दोघे भाऊ हत्यारं घेऊन कळसावर चढले. वेळ सकाळची होती. दहा वाजायच्या सुमारास सर्व तयारीनिशी कळस फोडणार इतक्यात लोकांनी त्यांना पाहिलं; पण त्यांना पकडेपर्यंत दहा वाजले आणि कळस फोडला; पण आत काहीही सापडलं नाही. लोकांनी त्यांचा धिक्कार केला; पण शिक्षा केली नाही. कारण मंदिर त्यांच्याच मालकीचं होतं. हा प्रकार त्या शेतकऱ्यांच्या गुरूंना समजला. ते आले नि त्या दोघा भावांना उद्देशून म्हणाले, ‘मूर्खांनो असा कळसात कोणी रत्न, सोनं, नाणं,अलंकार याचा निधी लपवून ठेवू शकेल का? तुमच्या वडिलांच्या सांगण्याचा अर्थ होता त्या दिवशी त्यावेळी कळसाची सावली जिथं पडेल त्याच्या आजूबाजूला गुप्त निधी लपवून ठेवलाय. उद्याही तशीच सावली पडेल तुम्ही त्या ठिकाणाच्या आजूबाजूला खणून पाहा. निधी निश्चित मिळेल. मी काही दिवस इथंच थांबतो. ते दोघे भाऊ झपाटल्यासारखे खणत राहिले. अख्खं शेत त्यांनी खणून काढलं पण निधीचा पत्ता नाही. यावर गुरुदेव प्रसन्न होऊन म्हणाले, ‘आता पावसाळा जवळ आलाय. पेरणी करण्यासाठी चांगलं बी बियाणं आणा. आपण शेती करूया. त्या प्रमाणे केल्यावर काळाच्या ओघात शेतात भरघोस पीक डोलू लागलं. ते पाहून त्या भावांना, गुरुदेवांना तसेच गावकºयांनाही खूप आनंद झाला. कापणी करून धान्यानं कोठार भरल्यावर सर्व गावकºयांसमोर गुरुदेव म्हणाले, ‘पाहिलंत असा आयता गुप्त निधीबिधी काही नसतं. सामाजिक कष्टातून मिळवलेलं फळ हाच सारा आनंदाचा निधी असतो.’ किती खरंय हे! असेच तिघे भाऊ वडलांच्या अकस्मिक निधनानंतर सर्व संपत्ती उधळून दिवाळखोर बनले होते. एकेकाळी श्रीमंत असल्याने दुसºयाकडे नोकरी किंवा कष्टाचं काम करणं त्यांना कमीपणाचं वाटत होतं. वडील गल्ल्यावर बसून खूप गिºहाईक करायचे; पण वडिलांचा, कष्टाळूपणा, प्रामाणिकपणे केलेला व्यापार, लोकांशी केलेली सलगी हे गुण मुलांकडे नसल्याने ते वडील जिथं बसायचे त्याच जागी अगतिकपणे उपाशी बसून राहायचे.एके दिवशी तीर्थयात्रेला गेलेला वडिलांचा जवळचा मित्र परतला. त्याला सारी हकीगत कळल्यावर तो मुलांकडे येऊन म्हणाला, ‘तुम्ही कर्मदरिद्री आहात, जिथं बसला आहात ना त्याच्याखाली तुमच्या वडिलांनी मोठ्या मेहनतीनं मिळवलेला निधी ठेवलाय. चला कुदळी, फावडी घेऊन या नि कामाला लागा. खोल खणल्यावर खरंच तीन तोंड बंद केलेले कुंभ होते ते उचलल्यावर पाहतात तर त्यात सुवर्णमुद्रा होत्या. ‘त्या सोन्याच्या नाण्यांनी पुन्हा कष्टानं व्यापार-व्यवसाय सुरू केला. केवळ आयता मिळालेला हा खजिना व्यर्थ संपवू नका.’ तिघाही भावांना वडिलांच्या मित्रानं दिलेला हा सल्ला पटला नि पुन्हा त्यांच्या जीवनात आनंदाचा निर्झर खळाळू लागला.समर्थ रामदासांनी ‘यत्न तो देव जाणावा’ इतक्या स्पष्टपणे आनंदी जीवनासाठी प्रयत्न सायास कष्ट करण्यास सांगितलं आहे. प्रयत्न-प्रयोग-प्रचिती’ अशी त्रिसूत्री ते सांगत. दासबोध ग्रंथात अनेक ठिकाणी आनंदाचं असंच रहस्य त्यांनी वर्णन केलंय. ‘लक्ष्मीमध्ये करंटा नांदे। त्याचे दारिद्र्य अधिक सांदे।। म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वास किंवा अस्तित्व आपल्या आत असूनही जो कमनशिबी करंटा असल्यासारखा वागतो त्याचं दारिद्र्य अधिक तीव्रतेनं जाणवतं.दुसऱ्या ठिकाणी त्यांनी फार प्रत्ययकारक रितीनं म्हटलंय‘भांडारे असती भरली। परी अडकून पडली। जोवरी हाता न ये किल्ली।।’ आनंदाची अक्षय भांडारं म्हणजे आनंदाचा निधी आपल्या आतच आहे; पण किल्ली हाती न लागल्याने अमूल्य निधी आत अडकून पडलाय. समर्थ म्हणतात ‘गुरुकृपा हीच ती किल्ली’ पण गुरूची कृपा म्हणजे गुरूचं मार्गदर्शन, उपदेश किंवा अनुग्रह. गुरू आपल्या आतील आनंदाच्या निधीचा पूर्ण उपभोग, आस्वाद घेण्यासाठी जी गुरूकिल्ली सुचवतात ती म्हणजे प्रयत्न-प्रयोग-प्रचिती. म्हणजेच खूप प्रयास, कष्ट नवनवीन मार्ग हेच आनंदाच्या अनुभवाचं (प्रचितीचं) रहस्य आहे. यात दुमत असायचं कारण नाही. खरं ना?

टॅग्स :spiritualअध्यात्मिक