शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

आनंद तरंग : श्रद्धेय साधक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 03:09 IST

माझ्या अस्तित्वाचा विसर पडलेली ही दुर्दैवी माणसे मला प्राप्त करून न घेता, जन्म-मृत्यूच्या चक्रावर फिरत राहतात. वेगवेगळ्या योनीत प्रवेश करीत जगत मरत राहतात.

वामनराव देशपांडे

भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला प्रत्यक्ष युद्धभूमीवर आंतरिक मन:शांतीची दर्शनवाट दाखवली. माणसापाशी परमेश्वराविषयी अतुट श्रद्धा, दृढविश्वास हवा. ज्ञानभारला विवेक हवा. वैराग्याचे वरदान लाभायला हवे. परमेश्वर जरी मर्त्य दृष्टीचा विषय नसला तरी परमेश्वरी तत्त्व सत्य आहे आणि त्यानेच निर्माण केलेले हे मायावी विश्व, जे आपण दृष्टीने प्रत्यक्ष अनुभवतो, ते असत्य आहे. भगवंतांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की,अश्रद्धाना: पुरुषा धर्मस्यास्य परन्तप।अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसाखत्मनि।।पार्था, तू दोषदृष्टीरहित आहेस म्हणून तुला प्रेमाने अंत:करणातले गुह्यतत्त्व सांगायला सतत उत्सुक असतो. तुझे अशुभापासून रक्षण करणारे, तुला मुक्ती अर्पण करणारे हे गोपनीय ज्ञान ध्यानपूर्वक श्रवण कर. जे या विश्वात देहभावनेने जगत आहेत, ते दुर्दैवी जीव या सहजसोप्या तत्त्वाचे श्रवणच करीत नाहीत. कारण ती माणसे मूलत: अश्रद्धेय वृत्तीची असतात. या मर्त्य दृश्य विश्वावर श्रद्धेय अंत:करणाने आंधळा विश्वास ठेवणारी, माझ्या अस्तित्वाचा विसर पडलेली ही दुर्दैवी माणसे मला प्राप्त करून न घेता, जन्म-मृत्यूच्या चक्रावर फिरत राहतात. वेगवेगळ्या योनीत प्रवेश करीत जगत मरत राहतात.भगवंतांनी अर्जुनाला श्रद्धेय साधकांची मनोवृत्ती सांगताना महत्त्वाचा विचार दिला की, परमेश्वराविषयी अतुट श्रद्धा, त्याच्या अस्तित्वाविषयी दृढविश्वास आणि ज्ञानभारला विवेक याची साधकाला नितांत आवश्यकता आहे. हे गुण त्याच्यापाशी नसतील तर तो नामसाधनेला आणि शुद्ध ज्ञानाच्या प्राप्तीला अपात्र ठरतो. विवेकहीन माणसाला भगवंत अस्तित्वसुद्धा जाणवत नाही, तर भगवंताची प्राप्ती कशी काय होणार?