शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - स्नेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 07:24 IST

श्रीचक्रधरस्वामी मराठीतून उपदेश देत सारगर्भ छोटे छोटे वाक्य ते सांगत त्याला सूत्र असं म्हणतात.

बा.भो. शास्त्री

श्रीचक्रधरस्वामी मराठीतून उपदेश देत सारगर्भ छोटे छोटे वाक्य ते सांगत त्याला सूत्र असं म्हणतात. त्यातलंच हे एक सुंदर सूत्र आहे ‘स्नेहाचा ठाई उचित स्फुरे’. मानवी हृदयात अनेक कप्पे असतात. त्यात एक स्नेहाचा कप्पा आहे तो स्वामींनी उघडला, ज्यातून स्नेह पाझरतं. देहबोलीतून बाहेर येतं. उचित-अनुचितांचे तरंग मनात उठतात व वाचेतून शीतोष्ण शब्द बाहेर पडावे तसं हे स्फुरण. बरं-वाईट घेऊन बाहेर येतं. अनुचित असुरी तर उचित दैवी गुणाचं लक्षण आहे. असुर नाश तर दैवी निर्माण करतं. अजिंठा वेरूळची सुंदर शिल्पं ही दैवी देण व त्याच शिल्पाला भग्न करणं हे असुरपण. आपल्याला साई व्हायचं की कसाई हे स्वत: ठरवावं. यातले आपण कोण? उचित की अनुचित, ज्याचं चिंतन खराब आहे तो वाईट करतो. ज्याचं चिंतन चांगलं आहे तो चांगलं करतो. आपलं भावविश्व जसं आहे तसंच आपण वागतो. मन विटलं, माणसं फाटले, माणूस वर गेला व मानवता खाली आली अशा वेळी जगातलं अनुचित कमी करावं, उचित वाढावं म्हणून स्वामींनी ‘स्नेहाचा ठाई उचित स्फुरे’ असं एक गोड सूत्र सांगितलं आहे. जिथं पाणी तिथं हिरवळ व प्रसन्नता असते. हिरवळीत गती व विकास असतो. हेच जिवंतपणाचं लक्षण आहे. वाळवंटात गरम हवा असते. तिथं सगळं मृत असतं. स्नेह ओलं आहे. तिथं बाग आहे. तीळगूळ घ्या गोडगोड बोला, का गुळात गोडवा तर तीळात तेल आहे. स्नेहविना गोडवा फसवा आहे. स्नेहाची ओळख करून देताना स्वामी म्हणाले, ‘मातेचं स्नेह ते नैसर्गिक’ इथे आईचा दाखला दिला. मैत्रीला समानगुण हवेत. लग्नाला वय हवं. सगळं हेतूशी बांधलेलं आहे. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक