शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून मुळात प्रत्येकाने प्रथम स्वत:चे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 05:04 IST

भारतात कोणत्याही प्रकारचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी ब्रह्मसूत्र देण्याची प्रथा होती.

- सद्गुरू जग्गी वासुदेवभारतात कोणत्याही प्रकारचे शिक्षण सुरू करण्यापूर्वी ब्रह्मसूत्र देण्याची प्रथा होती. म्हणजे आध्यात्मिक पाऊल हे नेहमी पहिले पाऊल असे, त्यानंतरच मग व्यक्तीचे इतर प्रकारच्या शिक्षणाने सशक्तीकरण होत असे. जीवनात अध्यात्म हे पहिले पाऊल आहे, हे जो जाणत नाही अशा व्यक्तीला थोडे जरी सशक्त केले तरी तो धोकादायक ठरतो.आजकाल जगात हेच घडतेय. आज शिक्षणामुळे म्हणा किंवा राजकीय आणि आर्थिक सामर्थ्यामुळे; ममताशून्य आणि आनंदहीन लोकांच्या हाती पुष्कळ अधिकारिक सत्ता आली आहे. आज वाईट लोक नव्हे, तर चांगले, सुशिक्षित लोक जगाला विनाशाच्या खाईत लोटत आहेत. जगात माजलेला संघर्ष हा वाईट विरुद्ध चांगले असा नाहीये. तो नेहमी दोन चांगल्या व्यक्तींमध्ये आहे. जगात ज्याला दहशतवादी म्हणतात, त्याला वाटते की तो खूप चांगला माणूस आहे. जेवढे अधिक आपण चांगले आहोत असे त्याला वाटते तेवढा तो आपल्यासाठी विनाशकारी ठरतो. वाईट माणसे लढायच्या भानगडीत पडत नाहीत. फक्त चांगली माणसेच संपूर्ण संस्कृती नामशेष करतील आणि एकमेकांचा समूळ नायनाट करतील यात शंका नाही. म्हणून मुळात प्रत्येकाने प्रथम स्वत:चे परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. तर प्रत्येक व्यक्तीची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्याने आपले आंतरिक स्थैर्य प्रस्थापित करणे व एक आनंदी व्यक्ती बनणे. ज्या माणसाला स्वत:चे शरीर, मन आणि भावना नीट हाताळता येत नाहीत; पण त्याला जग हाताळायचे आहे, हे कदापि शक्य नाही. जर तुम्हाला स्वत:ला कसे सांभाळायचे हे माहीत नसेल, तर जग कसे सांभाळावे हे तुम्हाला कळणारच नाही. म्हणून स्वत:मध्ये स्थैर्य प्रस्थापित करणे, आपला आंतरिक समन्वय आणि सुसूत्रता साधणे आणि आतून एक आनंदी व्यक्ती होऊन बहरणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आणि जबाबदारी आहे. माणूस एकदा जर आनंदी झाला की साहजिकच तो जगात केवळ आनंदच उधळणार.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक