शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे सत्कर्म हेच तुमच्या मदतीला येईल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 22:19 IST

समाजकुटुंबातील सदस्यांना मदत करा व मदत मागायला लाजू नका. 

डॉ . दत्ता कोहिनकर-  हेनरी फोर्डने एका अनोळखी एजंटला स्वतःची पॉलिसी काढावयास दिली.हेनरी फोर्ड सारख्या उद्योगपतीची पॉलिसी काढावयास मिळाल्यामुळे त्या एजंटला झटक्यात लाख रुपये कमिशनपोटी मिळाले. एका रात्री तो एजंट लक्षाधीश झाला.पेपरमध्ये ही बातमी हेनरी फोर्ड च्या मित्राने वाचली व तो हेनरी फोर्ड ला   फोन करून म्हणाला, अरे हेनरी आपला मित्र स्मित पण पॉलिसी चे काम करतो. त्याची आर्थिक स्थिती पण बिकट आहे .तु ही पॉलिसी काढावयास अनोळखी एजंट ऐवजी स्मीतला का नाही दिली? त्याची पण आर्थिक स्थिती सुधारली असती ना? त्याचवेळी डोक्याला हात लावत हेनरी फोर्ड म्हणाले ,  अरे यार स्मित मला कधीही बोललाच नाही . तुला तर माहित आहे मी किती व्यस्त असतो. तो जर मला पॉलिसीबाबत म्हटला असता तर ही पॉलिसी मी त्यालाच काढावयास दिली असती. मित्रांनो या गोष्टीतून मी एवढंच शिकलो की जोपर्यंत समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला काय हव आहे? हे तत्सम व्यक्तींना  तुम्ही सांगत नाही, तोपर्यंत त्यांना कळणार कसे? मित्रानो लोक मदत करायला तयार असतात .लॉक डाऊनच्या या काळात अनेक अडचणींचा सामना तुम्ही करत असाल व त्यामुळे अस्वस्थ असाल. म्हणून आपल्या लोकांना फोन करून अवश्य बोला. तुमच्या समस्या त्यांना सांगा. त्यांना मदत मागा .लोक मदत करायला सदैव तयार असतात. मदत मागायला अजिबात लाजू नका व मदत करायला देखील पुढे या .लक्षात ठेवा कधी कोणावर कसली वेळ येईल हे सांगता येत नाही म्हणून मदत मागा व मदत करा .

भगवान बुद्धांना भक्तांनी विचारलं , भगवान आमच्या वाईट वेळेला आमच्या मदतीला कोण येईन ? भगवान बुद्ध म्हणाले, तुम्ही केलेले सत्कर्म हेच तुमच्या कामाला येईल. म्हणून सत्कर्माची कास धरा.आपली सोसायटी ,आपला वाडा, आपला परिसर ,आपली मित्रमंडळी, आपला समाज , हे पण एक आपलं कुटुंबच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना,  '' हे विश्वची  माझे  घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला...''त्यामुळे समाजकुटुंबातील सदस्यांना मदत करा व मदत मागायला लाजू नका. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकPuneपुणे