शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

भावभक्तीच्या वाटेनेच होईल देवाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 20:20 IST

भावाचा अभाव असेल तर भगवंताचा प्रभाव प्रत्ययाला येणार नाही

 - ह.भ.प. भरतबुवा रामदासीअध्यात्म हे श्रद्धेचे शास्त्र आहे. ज्या साधकाच्या अंत:करणात भाव, निष्ठा, विश्वास, परमश्रद्धा असेल त्या साधकालाच परमेश्वराचे सगुण दर्शन होईल. भावाचा अभाव असेल तर भगवंताचा प्रभाव प्रत्ययाला येणार नाही. भावातच ईश्वराचे अस्तित्व दडलेले आहे. भक्तीशास्त्रात भावाला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपण म्हणाल भाव म्हणजे तरी काय..? तर भक्तीरसायन सिंधुकार भावाची व्याख्या करतांना म्हणतात-प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधै: ॥प्रेम ही भावाची पहिली अवस्था आहे. अंत:करणात शुद्ध सत्वगुण असणे हे भावाचे लक्षण आहे. देवाच्या प्राप्तीसाठी तीव्र अभिलाषेने चित्तात निर्माण झालेली जी आर्द्रता, जो स्नेह, जे प्रेम त्या परमप्रेमासच भाव असे म्हणतात.भगवंताबद्दल परमप्रेम असणे म्हणजेच भक्ती. देवर्षी नारद महाराज म्हणतात -सा तु अस्मिन् परम प्रेम रूपा ।भक्तीसाधनेत परमप्रेम असल्याशिवाय भगवंत सगुण दर्शनाचा विषय होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले -भक्ती एक जाणे । तेथे साने थोर न म्हणे ॥ आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥बहुतांशी लोकांना असे वाटते की, देव दिसत का नाही..? तो दिसत नाही याचाच अर्थ तो या जगात नसावा मग जो इंद्रिय गोचर नाही, बुद्धी गम्य नाही. जो तर्काच्या ताजव्यात तोलता येत नाही, त्याला मानावयाचे काही कारण नाही पण हा पाखंडी विचार करण्याचे काही कारण नाही. अध्यात्मशास्त्र हे श्रद्धेचे शास्त्र आहे. स्वामी विवेकानंदांनी भगवान रामकृष्णांना विचारले,  भगवान या जगात देव आहे का..? असलाच तर तो दिसत का नाही..? भगवान म्हणाले - नरेंद्रा..! आग पेटितल्या प्रत्येक काडीत अग्नी असतोच पण तो दिसतो का..? प्रत्येक बीजात वृक्ष असतो पण तो दिसतो का..? दुधात तूप असतेच पण ते दिसते का..? नरेंद्रा... दुधातले तूप दिसण्याकरिता काही क्रिया प्रक्रिया कराव्या लागतील, नंतरच ते दिसेल.तुकाराम महाराज म्हणतात -दुधी असता नवनीत नेणे तयाचे मथित ।भावभक्तीच्या फुलांनी अंत:करणाची परडी भरली की सगळ्या आयुष्यालाच भक्तीचा सुगंध प्राप्त होतो. भावाची वाट वहिवाटली तर देहबुद्धी तुटेल, भवसिंधु आटेल, विवेक जागेल, पाखंड भंगेल, भास निरसेल, सद्वस्तु भासेल आणि भगवंत प्रगटेल अशा भावभक्तीच्या वाटेनेच देवाचे दर्शन होईल.

(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, 9421344960)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक