शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

देव सगळीकडे, पण मन एकाग्र करायला मूर्तिपूजा सोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 05:56 IST

परमेश्वर तर आसमंत व्यापून राहिला आहे. मग तरी आपण मूर्तिपूजा का करतो? देवळात का जातो? का डोळ्यांसमोर एक सगुण रूप आणतो? का आपण सगुणोपासना करतो?

- शैलजा शेवडेनाही कळस मंदिर, नाही कुठला देव्हारासारे आसमंंत आहे, त्याचा गाभारा गाभाराखरंंतर प्रत्येकाला तसं माहीत असतं, देव केवळ या मूर्तीत नाही. परमेश्वर तर आसमंत व्यापून राहिला आहे. मग तरी आपण मूर्तिपूजा का करतो? देवळात का जातो? का डोळ्यांसमोर एक सगुण रूप आणतो? का आपण सगुणोपासना करतो? ज्ञानी लोक निर्गुण निराकाराला जाणण्यासाठी तळमळतात. पण आपल्याला देव म्हटले की डोळ्यांसमोर एखादी मूर्तीच पाहिजे असते.भागवतात एक अतिशय सुंदर प्रसंग वर्णन केला आहे. कृष्ण मथुरेत गेल्यावर त्याच्या विरहाने गोपी व्याकूळ झाल्या आहेत. तेव्हा उद्धव येतो. गोपींना समजावतो, ‘तुम्ही समजता तसा कृष्ण माणूस नाही. सामान्य नाही, तो तर परमात्मा आहे. अणुरेणूत कृष्णतत्त्व भरले आहे ते ओळखा, त्याची उपासना करा.’ पण गोपींना पटत नाही हे तत्त्वज्ञान. त्या म्हणतात, ‘आम्हाला आमच्याबरोबर हसणारा, रास खेळणारा, रुसणारा, तर कधी आम्ही रुसलो की आमची समजूत काढणारा कृष्ण पाहिजे.’ आपलं मनही तसंच असतं.आपल्याला देवापाशी काही मागायचं असतं, देवाला आपली सुख-दु:ख सांगायची असतात. देवापाशी हट्ट करायचे असतात. कधी देवावर रुसायचं असतं, रागवायचं असतं... तर कधी पूजा, धूप, फुलंं याच्यामुळे मनाला एक आनंद मिळत असतो, समाधान मिळत असतं. खरंतर तसं पटतही असतं. देव सगळीकडे भरला आहे. पण मन एकाग्र करायला मूर्तिपूजा सोपी पडते. एकदा मन एकाग्र झालं, की मगच त्याच्या सर्वव्यापित्वाचा अनुभव येतो.देव अंतरातही, देव अंबरातही,मोहवी मनास जे, देव त्या सुरांतही

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक