शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

दुसऱ्याला आनंद देणे म्हणजेच परमार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 19:26 IST

दुसऱ्यला आनंद देणे म्हणजेच परमार्थ होय.

दुसला आनंद देणे म्हणजेच परमार्थ! दुसºयाच्या आनंदाचा विचार करणे म्हणजेच परमार्थ. यातून खरं तर आपण स्वत:लाच मदत करत असतो. त्यासाठी मनात स्वच्छ दातृत्वभाव हवा. मात्र आपला परमाथार्चा स्वार्थ साधण्याच्या नादात आपण याचकवृत्तीला खतपाणी तर घालत नाही ना, याचा विचार करायला हवा. दान हे नेहमीच सत्पात्री असायला हवे. स्वहिताचा म्हणजेच स्वाथार्चा विचार म्हणजे पाप आणि परमाथार्चा विचार म्हणजेच पुण्य हे आपल्यावर बिंबवले गेले आहे. त्यागाच्या चमत्कारिक कल्पनांनी भारावून, श्रीमंत होणे हे पाप मानले जाऊ लागले आहे.   भारतीय धर्मतत्त्वात, परमार्थात कुठेही मानवी जगण्याचा उपहास केलेला नाही. निराशा, पळपुटेपणा आणि दुर्बलतेला दुरूनही कुठे थारा दिलेला नाही. वेद-उपनिषदांचे सारे तत्त्वज्ञान आजन्म तारुण्याचा अनुभव घेण्याची प्रेरणा देणारे तत्त्वज्ञान आहे. मरणोत्तर मिळण्या, न मिळणा-या सुखांच्या मृगजळात वर्तमानातले मुसमुसणारे क्षण जाळण्याचे वैचारिक दारिद्र्य या तत्त्वज्ञानाच्या अंतरंगात औषधालाही सापडणार नाही. पण अन्वयार्थाच्या आवर्तात आत्माच हरवून बसला आहे. तरुणांना म्हणूनच परमार्थ प्रांत आपला वाटत नाही. आपल्या वाट्याला आलेल्या आयुष्याला धावत जाऊन मिठी मारण्याचा आणि त्या आयुष्याच्या आकंठ आस्वादातून, अंतर्बाह्य देखणे होण्याचा महामार्ग आहे परमार्थ! ती प्रखर प्रेरणा आहे अध्यात्म!  धर्म-परमार्थ शास्त्राचा कालानुकूल अर्थ लावायला विसरलो. तशी सरळ मोकळीक देणारा जगातील एकमेव तत्त्वमार्ग आपला असूनही ते कर्तव्य आपण बजावले नाही. लौकिकाची ओढ, धनसंपन्नतेचे आकर्षण, देहाचे सौंदर्य, संसाराचे सुख याची अवहेलना म्हणजेच परमार्थ, असा भाव प्रत्येकाला तेथे जाणवतो.  वषार्नुवर्षे परमार्थ सांगणारे आणि ऐकणारे, ज्याची निंदा करण्यात रस घेतात, त्या रसातच ते लडबडलेले दिसतात. पारमार्थिक माणूस फुलला, बहरला आहे असा अनुभव येत नाही. उलट त्यांच्या चेह-यावर जगण्याचे ओझे स्पष्ट दिसते. त्यांचे त्यांना लखलाभ असो, पण ऊजेर्चा मोठा वर्ग, तरुण वर्ग या महत्त्वाच्या संस्कार क्षेत्रापासून वंचित राहाणे जगाच्या दृष्टीने घातक आहे. -शून्यानंद संस्कारभारती  

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक