शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संवादाच्या पुलावरून थेट आनंदाच्या मळ्यात..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 21:03 IST

आयुष्य खूपदा नव्याने जगण्यासाठी नवनवीन संधी देत असतं..

डॉ. दत्ता कोहिनकर- 

आज लॉकडाऊनमध्ये आपले वयोवृद्ध आई-वडील घरात बसून बोर झाले असतील .त्यांचा ताणतणाव दूर करण्यासाठी त्यांच्या जुन्या मित्र-मैत्रिणींचे, नातेवाईकांचे, पूर्वीच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांचे नंबर मिळवून त्यांना फोन लावून द्या. बघा ते किती आनंदी होतील.मित्रांनो, आपल्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणे यापेक्षा दुसरे महत्तम कार्य काय असू शकते ? चला तर मग , त्यांना मोकळे व तणावमुक्त होण्यासाठी पुढाकार घ्या व घरातील वातावरण आनंदी करा. आपण सर्वजण व्हॉटसअ‍ॅप , फेसबुक डिजीटल मिडीयाच्या साह्याने जगाशी कनेक्ट आहोत. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये आपला वेळ जातोय . पण आपल्या आईवडिलांना टीव्ही शिवाय मनोरंजनाला साधनच नाही. तेथे सारख कोरोना, कोरोना ऐकून ते अस्वस्थ होतील. म्हणून त्यांना मोकळ होण्यासाठी हा उपक्रम राबवा व त्यांची सेवा करा.

खरंतर आपल्या अवतीभवती ''अशा '' माणसांची संख्या दिवसेंदिवस इतकी झपाट्याने वाढते आहे. ज्यांच्याकडे आलिशान गाडी, बंगला, सर्व सुखसोयी यांच्यासह सर्वप्रकारची स्थिरता आहे. यातही वेदनादायी बाब त्यांच्या वाट्याला कुठली आली असेल तर ती एव्हड्या मोठ्या विशाल जगात एकटी आहेत. त्यांच्याजवळ  रोजच्या छोट्या छोट्या संवादासाठी माणसं नाहीत..कुणी कुणी तर तासन तास भिंतीकडे डोळे लावून शून्यात हरवलं आहे तर कुणी अंधाऱ्या खोलीत एखाद्या नाटकातल्या स्वगताप्रमाणे पुटपुटत आहे. जी जगण्याची खरी पद्धत नाहीये.. ती सर्व माणसंच आहेत.. फक्त एकेकाळी माणसांपासून दूर गेलेली...त्यांचा आनंद त्यांना परत मिळवून द्या.. एवढं छोटं काम कुठल्याही माध्यमातून तुम्ही करू शकला तरी तुम्ही आयुष्यात यशाच्या सर्वोच्च शिखरावर आणि अपयशाच्या खोल डोहात देखील आनंदी राहाल.. 

आयुष्य खूपदा नव्याने जगण्यासाठी नवनवीन संधी देत असतं..कुणी ते किती गांभीर्याने घेते, कुणाला  संधीच ओळखता येत नाही.खूप उशिरा त्यांच्या लक्षात येतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते..माणूस आनंद एका क्षणात कमावू शकतो पण त्याला दुःख मिळवण्यासाठी खूप अपयश किंवा बोचऱ्या अनुभवातुन जावं लागते. अनुभव हा एकप्रकारे आयुष्याची पोकळी भरून काढण्याचे काम करत असतो. पण माणसाला आयुष्याने दिलेली संधी जर न कुरकुरता स्वीकारली तर तुमचं जगणं तर सुसाह्य होतंच शिवाय आपल्यासह खूप जणांच्या आनंदाची ती गुरुकिल्ली ठरू शकते.  

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक