शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 04:31 IST

एखाद्या विषयावर वारंवार बोलत राहिले तर त्याची सवय होते समजायला. आता आपण मराठी, स्वत:ला मराठी समजतो. मित्र इंग्रजीच्या वापरावर संतापला. अरे स्पेलिंगमध्ये एक चूक झाली तर बघ.

- किशोर पाठकएखाद्या विषयावर वारंवार बोलत राहिले तर त्याची सवय होते समजायला. आता आपण मराठी, स्वत:ला मराठी समजतो. मित्र इंग्रजीच्या वापरावर संतापला. अरे स्पेलिंगमध्ये एक चूक झाली तर बघ. आता मी राईट हा शब्द उच्चारला तर लिहिणे, उजवा, बरोबर असे तीन अर्थ सांगणारा उच्चार. स्पेलिंग वेगळे, पण उच्चारामुळे अर्थ कळत नाही. आता लिहिणे, उजवा, बरोबर या तिन्ही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. हळूहळू बातम्या येताहेत माध्यम बदलण्याच्या. एक पालक म्हटले सुटलो बुवा, का तर मराठीत अभ्यास घेणं सोपं. इंग्रजीत मुलगा आणि बाप दोघांना टेन्शन. घरात धेडगुजरी होतं हे वागणं. धड ना इंग्रजी पूर्ण धड ना मराठी. तो संतापून म्हणाला, प्रत्येकाने किमान बारावीपर्यंत मराठी अनिवार्य अभ्यासली पाहिजे. हा नियम सरकार का करीत नाही? कर्नाटक, तामीळ, तेलगू, बंगाली या राज्यांनी त्यांच्या ठिकाणी त्यांची भाषा सक्तीची केली की त्यातील रीतीभातींची, चवींची, भाषेची जाण मुलांना होते. मग भले तो कुठेही जगभर गेला तरी तो आपली भाषा विसरत नाही म्हणून मराठी सक्तीची केली पाहिजे. अलीकडे एकूणच माणसाची आवड कमी झाली आहे. थोडा मोकळा वेळ असला तर पूर्वी हमखास कपाटातून एखादं पुस्तक काढून वाचणारा माणूस हा कायम आता फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर असतो. या मोबाईलने वाचनाची आवड कमी झालीय. त्यामुळे पुस्तकांची आवड कमी झाली. पर्यायाने विक्री नाही. पुस्तकं विकली गेली नाहीत तर प्रकाशक पुस्तकं कसे काढतील, कशी परवडतील? मोठ्या मुश्किलीने काढलेली मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती संपायला किती वर्ष लागतात? एकूण मराठी माणूस समाजाच्या आकडेवारीत माणसं एक टक्का वाचतात तेही वाचनालय, फुकट. मग प्रकाशक कशाला पुस्तकं काढतील? म्हणून प्रकाशन व्यवसाय बंद पडत आहे. चांगली मराठी वाङ्मयीन मासिक बंद पडत आहेत. एका भाषिक अभिसरणाच्या न करण्याने विक्री व्यवसाय बंद होत आहेत. सरकारने बारावीपर्यंत मराठी सक्तीचीच केली पाहिजे. हा दबाव मराठी बोलणाऱ्या प्रत्येकाने सरकारवर टाकायलाच हवा. केवळ शासनात मराठी सक्तीची करून भागणार नाही आपल्या भाषेतच उच्च कंठरवाने मराठीचा जागर करायला हवा. आपली पूर्ण ऊर्जा मराठीचं जतन संगोपन आणि संवर्धनासाठीच वापरायला हवी. बघा ना विचार करून गांभीर्याने. लहान मुलं कोळपून जाताहेत त्यांना मराठीत खेळू बागडू द्या.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक