ऊर्जामय व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:33 AM2018-07-03T04:33:23+5:302018-07-03T04:33:45+5:30

अध्यात्म आणि योगशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते. मुख्यत्वे तीन प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते - सात्विक, राजसी व तामसी.

 Energetic personality | ऊर्जामय व्यक्तिमत्त्व

ऊर्जामय व्यक्तिमत्त्व

Next

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय

अध्यात्म आणि योगशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते. मुख्यत्वे तीन प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते - सात्विक, राजसी व तामसी. सात्विक व्यक्ती नेहमीच पवित्र विचार, वाणी व कर्माने ओतप्रोत असते. त्या व्यक्तीची सर्व कार्ये ही लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित असतात. याउलट तामसी वृत्तीचे व्यक्ती असतात, जे सदैव दुसऱ्यांचे नुकसान करीत असतात व त्यांचे विचार, वचन व कर्म निषिद्ध असतात. या दोहोंच्या मधली जी स्थिती असते त्याला राजसी संबोधले जाते.
या तीन प्रकारच्या व्यक्ती आपल्या चारही बाजूला एकप्रकारच्या ऊर्जेचे जाळे तयार करतात. हे ऊर्जामय जाळे कशाप्रकारचे असेल ते आपले विचार-वचन-कर्म यांची त्रिसूत्री ठरवते. सात्विक, राजसी व तामसी प्रवृत्तीचे जितके आधिक्य असेल तेवढे त्या प्रवृत्तीचे जाळे तयार होईल.
आधुनिक विज्ञानाने bio-feedback यंत्र बनविलेले आहे. मानवाच्या मनात कशाप्रकारचे विचार सुरू आहेत व मानवाच्या शरीरावर त्याचा काय प्रभाव पडेल, हे या यंत्राच्या माध्यमातून कळण्यास मदत होते. एका तणावग्रस्त व्यक्तीच्या मस्तिष्कामधून जी ऊर्जा निघते, ती एखाद्या आनंदी व्यक्तीच्या मस्तिष्कामधून निघणा-या ऊर्जेपेक्षा पूर्णत: वेगळी असते. भारतीय परंपरेत वलयाचे वर्णन पाहायला मिळते. अनेकदा चित्रात महान संतांच्या मस्तिष्काच्या चारही बाजूला एक दिव्य प्रकाश दिसून येतो. यालाच इंग्रजीमध्ये ं४१ं संबोधले जाते. हे वलय संतांच्या पवित्र ऊर्जेचा संकेत आहे.
अनेकदा बºयाच व्यक्तींना एखाद्याला भेटून असा अनुभव येतो की, त्याचे मन व शरीराची ऊर्जा वाढलेली आहे. याउलट अनेक व्यक्तींच्या संपर्कातून नैराश्य व नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या अनुभवाचे प्रमुख कारण म्हणजे - मानवाचे वेगवेगळे सात्विक, राजसी व तामसी कर्म. आपले व्यक्तिमत्त्व जसजसे सात्विक होईल, तसतशी आपल्या व्यक्तिमत्त्वामधून निघणारी ऊर्जा ही सकारात्मक होत जाईल. अध्यात्म व योगशास्त्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाºया अनेक विधींचे वर्णन आलेले आहे. शरीर व मनाच्या शुद्धीचा यात प्रामुख्याने उल्लेख आहे. शरीराची शुद्धी पाण्याने व मनाची शुद्धी सिद्धचाराने होते. वाणीची शुद्धी मधूर व सत्य वचनाने होते. नि:स्वार्थ भाव व लोककल्याणाच्या भावनेने केलेले कर्म आपल्याला कार्मिक शुद्धता प्रदान करतात. अशाप्रकारचे शुद्ध व्यक्तिमत्त्व आपल्याभोवती एक चुंबकीय ऊर्जामय वलय तयार करीत असतात.

Web Title:  Energetic personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.