सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 05:47 PM2017-08-04T17:47:29+5:302017-08-04T17:48:29+5:30

आपण जन्माला येतो तेव्हापासून आपला प्रवास सुरू होतो त्यात आपल्याला जे ज्ञान मिळाले पाहिजे, जी शिकवण मिळाली पाहिजे, जे संस्कार मिळाले पाहिजेत ते मिळत नाहीत व भलतेच संस्कार मिळतात व आपली जीवनाची गाडी चुकते.

Easy to sorrow is difficult to sorrow - Part 18 | सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १८

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १८

Next

- सदगुरू श्रीवामनराव पै

धर्मांतर हे अज्ञानाचेच लक्षण आहे.

आपण जन्माला येतो तेव्हापासून आपला प्रवास सुरू होतो त्यात आपल्याला जे ज्ञान मिळाले पाहिजे, जी शिकवण मिळाली पाहिजे, जे संस्कार मिळाले पाहिजेत ते मिळत नाहीत व भलतेच संस्कार मिळतात व आपली जीवनाची गाडी चुकते. मी हिंदू आहे  असे म्हटले म्हणजे आपली गाडी चुकली.मी मुस्लिम आहे असे म्हणतो तेव्हा आपली गाडी चुकते.ही गाडी चुकलेली आहे हे देखील आपल्या लक्षात येत नाही.प्रत्येकाला आपला धर्म श्रेष्ठ वाटतो.तुझा धर्म श्रेष्ठ बरोबर आहे पण आमचा धर्म आम्हांला श्रेष्ठ आहे.आमची आई आम्हांला बरी तुमची आई तुम्हांला बरी.नाही माझी आईच चांगली आहे तू तुझ्या आईला सोड व माझ्या आईकडे ये असे म्हटले तर चालेल का? असे म्हटले तर तो म्हणेल तुझी आई चांगली आहे हे ठीक आहे पण माझी आई जशी आहे तशी मला प्रिय आहे.या ठिकाणी वाद करण्याचा प्रश्नच येत नाही.हा हट्ट कशाला की तू आमच्या धर्मात आले पाहिजे.धर्मांतर हे अज्ञानाचेच लक्षण आहे.मानव ही एकच जात आहे व माणूसकी हा एकच धर्म आहे.पण हे कुठे सांगितले जात नाही.कुठे शिकविले जात नाही.आपल्याला चुकलेल्या गाडीत बसविण्याची जी एक सवय झालेली आहे त्यामुळे आपला प्रवास असा खडतर होतो, कष्टाचा होतो, दु:खाचा होतो.त्यासाठी जीवनविद्येच्या ज्ञानाला पर्याय नाही.माणूस दु:खी का होतो याचे कारण शोधून काढणे आवश्यक आहे ज्याला आपण निदान म्हणतो हे निदान होणे आवश्यक आहे.डॉक्टर जसे रोगाचे परिक्षण करतो व त्याचे परिक्षण जर चुकले तर रोगाचे निदान देखील चुकते व रोग बरा होण्याऐवजी तो बळावत जातो व रोगी मरण्याची शक्यता असते.तसे मानवजातीचे झालेले आहे.मी मानवजात म्हणतो तेव्हा हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन असे कोणीही नाही तर अखिल मानवजात डोळ्यासमोर ठेवून माझे प्रबोधन करतो हे लक्षात ठेवा.अखिल मानवजात ही आज दु:खाच्या खाईत आहे असे आपल्या लक्षांत येईल.आपण जर दहशतवाद, दंगेधोपे, तंटेबखेडे, बॉम्बस्फोट हे सर्व पाहिले तर लोक दु:खाच्या खाईत ढकलले गेलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल.याचे प्रमुख कारण आपण शोधून काढत नाही तोपर्यंत हे बदलणे कठीण आहे.त्यासाठी अचूक निदान होणे गरजेचे आहे.माणसाच्या सर्व दु:खाचे कारण अज्ञान आहे.हे अज्ञान म्हणजे तरी काय हे अज्ञान वेगवेगळ्या प्रकारचे असते.माणसाला व्यवहारिक ज्ञान नसेल तर तो फसेल.तो बुवाबाबाकडे जातो व फसतो कारण अज्ञान.शेतकरी सावकाराकडे जातात व सावकार त्यांना फसवतो कारण अज्ञान.माणसाला मनशांती मिळत नाही त्याला कारण अज्ञान.

Web Title: Easy to sorrow is difficult to sorrow - Part 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.