शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

नामस्मरण : सर्वात सोपा भक्तीमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:15 IST

नामस्मरण भक्ती हा प्रकार सोडला, तर सर्व प्रकार हे परस्वाधीन आहेत.

 नामस्मरणाचा मार्ग. हा भक्तीमार्ग सर्व मार्गातील सर्वात  वेगळा, सोपा आणि शीघ्र फलदायी असा आहे. भक्तींमध्ये श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चना, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे विविध प्रकार आहेत; परंतु यातील नामस्मरण भक्ती हा प्रकार सोडला, तर सर्व प्रकार हे परस्वाधीन आहेत. दुस-यावर अवलंबून असे आहेत.इतर भक्तीमार्ग वस्तू, व्यक्ती, काळ, वेळ यावर या सर्व अवलंबून आहेत; मात्र, नामस्मरणाला कसलेही बंधन नाही. त्यामुळेच हा बंधमुक्त असा भक्तीप्रकार आहे.  भक्ती मार्गातील श्रवण भक्तीमध्ये श्रवण करण्यासाठी कोणती तरी कथन करणारी शक्ती पाहिजे, वक्ता पाहिजे, कथाकार पाहिजे, कीर्तनकार पाहिजे. नुसती श्रवण करण्याची इच्छा असून चालत नाही, तर त्याची सिद्धता, तयारी पाहिजे. इथे परावलंबित्व आले. दुस-यावर आधारित ही भक्ती झाली, पण नामस्मरणाचे तसे नाही. फक्त इच्छा व्यक्त केली की, लगेच नामस्मरण सुरू करता येते. त्यासाठी दुसरे कोणी असण्याची गरज नाही. त्यामुळे हा अत्यंत सोपा आणि चांगला मार्ग आहे. तसेच कीर्तन भक्ती करायची म्हटली, तर त्यासाठी विशिष्ट प्रकारचा पोषाख आला, आसन आले. कुठेही जाऊन कीर्तन करता येत नाही. त्यासाठी विशिष्ट अशी जागा असली पाहिजे. ही सगळी सिद्धता असली तरच कीर्तन करता येते. याउलट नामस्मरणाचे तसे नाही. कसलीही तयारी नको. कसलीही सिद्धता नको. कसलाही पोषाख नको. कोणी समोर असण्याची गरज नाही. कसल्या साथीची गरज नाही. इच्छा झाली की, नामस्मरण भक्तीला सुरुवात करता येते. त्यामुळे अतिशय साधी सोपी आणि सहज साध्य असा हा भक्तीमार्ग आहे.नामस्मरण भक्तीसाठी कसल्याही वेळेचे, काळाचे, स्थानाचे बंधन नाही. ज्याप्रमाणे आपल्याबरोबर आपला श्वासोच्छवास असतो, त्याप्रमाणे नामस्मरण करता येते. प्रत्येक क्षणी आपण नामस्मरण करू शकतो. अगदी जेवतानाही आपण नामस्मरण करू शकतो. अखंडित चिंतीत जावे, अशी ही नामस्मरण भक्ती असते. अन्य कोणत्याही भक्तीप्रकारापेक्षा नामस्मरण भक्ती ही त्यामुळेच सर्वांना आवडते.

- वेदांताचार्य राधे राधे महाराजबर्डेश्वर संस्थान, तरवाडी, ता. नांदुरा

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक