शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

कायम दु:खाची ‘वजाबाकी’ करावी! म्हणजे सुखाची ‘बेरीज’ होते!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 11:24 AM

माणसानं कायम दु:खाची ‘वजाबाकी’ करावी! म्हणजे सुखाची ‘बेरीज’ होते. हेही आपली डोळस उपासना आपल्याला सांगते! दया, प्रेम हीच पूजा-उपासना अंश शिकवते. आज चौकोनी कुटुंब आपापल्या बेटावर स्वत:चं साम्राज्य उभारू पाहत आहे. ज्येष्ठांच्या-आई, वडिलांच्या नात्यातील दुरावा वृद्धाश्रमाची त्यांना वाट दाखवू लागला आहे. नात्यातील विश्वासार्हता टिकविण्यासाठीही आज दृढ उपासना उपयुक्तच ठरणार आहे.

ठळक मुद्दे व्रत-वैकल्ये त्यासाठी करायची उपासना ही ‘विशेष’ धर्म होत! आज संगणक युगातही मंत्रशक्तीचा, तिच्यातील तादात्म्याचा पाश्चात्त्य शास्त्रज्ञांकडूनही शोध घेतला जात आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्यानुसार उपासनेला दृढ चालवणं सोयीचं ठरतं! मंत्र ही एक स्वयंभू शक्ती आहे! सिद्धमंत्र, वरदमंत्र यासह ती सिद्धीप्रत नेणारी आहे.ज्या शक्तीनं अनुभवता येतं त्या शक्तीच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे ‘अध्यात्म’ होय. म्हणून तर ‘उपासना’ करताना कोणत्याही काल्पनिक देवदेवतांमध्ये अडकता कामा नये! उपासना ‘डोळस’च हवी!

डॉ. कुमुद गोसावीसृष्टीतील चैतन्य पानापानांतून ओसंडत असताना एखाद्या उपासनेत मन जर स्थिर होत नसेल, तर आधी त्या निसर्गदेवतेशी मनमुराद संवाद साधणं हीदेखील एक उपासनाच होय! पावसाची लडिवाळ सर, डोंगरमाथ्यावरून ओघळणारा दुधाळ धबधबा! त्याचे सुखावणारे असंख्य तुषार! हे सारं सारं आस्वादताना साधलेली आंतरिक भावलय यातूनही ‘तादात्म्य’ अनुभवता येतं!माणसाला जे जे काही अनुभवयाला येतं त्याच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे ‘विज्ञान!’ नि ज्या शक्तीनं अनुभवता येतं त्या शक्तीच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे ‘अध्यात्म’ होय. म्हणून तर ‘उपासना’ करताना कोणत्याही काल्पनिक देवदेवतांमध्ये अडकता कामा नये! उपासना ‘डोळस’च हवी! नसता-‘माला बनाई काष्ट की। बीच में ड़ाला सुत।माला बेचारी क्या करे। जपनेवाला कुपुत! ।।मुरत बनाई पत्थर की। सुंदर सजाई बहुत ।मुरत बेचारी क्या करे। पुजनेवाला कुपुत!।।’संत कबीरांचा हा दोहा उपासनेसंबंधी खूप काही सांगून जातो. दिशा दाखवतो. आपल्या आराध्य दैवताशी संपूर्ण एकतानतेनं साधायचं अनुसंधान म्हणजे ‘उपासना!’ नित्य एक साधनामार्ग स्वीकारून करायची वाटचाल. त्यात मंत्र, जप-जाप्य, ध्यान-धारणा, पूजा-अर्चना आदी साधनांचा उपयोग केला जातो. अशा साधनांचीही सजगतेनं निवड केल्यास समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्यानुसार उपासनेला दृढ चालवणं सोयीचं ठरतं!मंत्र ही एक स्वयंभू शक्ती आहे! सिद्धमंत्र, वरदमंत्र यासह ती सिद्धीप्रत नेणारी आहे. एकदा एका परधर्मीय प्रचारकानं हिंदू धर्माची चालवलेली निंदा सहन न होऊन एका अस्पृश्य समाजातील सामान्य माणसानं जवळच्याच एका दगडावर मंत्रोच्चारपूर्वक विंचवाचं एक चित्र काढलं! नि त्या निंदकाला त्या चित्राला हात लावण्यास सांगितले. त्यानं अत्यंत कुचेष्टेने त्या चित्रावर बोट ठेवताच प्रचंड वेदना होऊन तो जमिनीवर लोळायला लागला!जोवर अनुभव-प्रतीती येत नाही तोवर शास्त्र हे संशोधन अवस्थेत असतं. धार्मिक विधिनिषेधांचा पाया ‘योगशास्त्र’ हा आहे. हे सिद्ध असताना वेगळी सिद्धता कशाला? व्रत-वैकल्ये त्यासाठी करायची उपासना ही ‘विशेष’ धर्म होत! आज संगणक युगातही मंत्रशक्तीचा, तिच्यातील तादात्म्याचा पाश्चात्त्य शास्त्रज्ञांकडूनही शोध घेतला जात आहे. उपासकाला उपाधीरहित उपासनेतील ध्यानस्थितीत दिव्य श्रुती-रामरक्षा-मंत्रांसारख्या ऐकू येतात! त्यात कार्यशक्ती असते. या अवस्थेत ईश्वर साधकाशी बोलतो! ते शब्द खरे असतात. त्यातील एकही अक्षर वाया जात नाही! असं साक्षात्कार शास्त्र सांगतं. (साक्षात्कार शास्त्र- अंडरहिल पृ. क्र . ३०४)उपासनेतील तादात्म्यभाव उपासकाला ‘स्व’ विसरायला लावतो! अशी उपासना म्हणजे ‘ज्ञानोत्तर भक्ती!’ जिची महती ‘श्रुती’नं गायिली आहे. तिच्यातून उत्पन्न होणारी त्रिज्या तोच खरा ‘उपासना धर्म’ होय! तो समजून घेतल्यास ‘हरी ओम’ असो, वा अन्य जप असो, तो नितळ मनानं चालू ठेवता येतो.‘जे माझ्यात आहे ते सारं काही भगवंतांचंच आहे. हा मनाचा दृढभाव योेग्य उपासनेतून येतो. एकदा राधेनं मुरलीला विचारलं,‘तू कृष्णाला इतकी प्रिय का आहेस?’मुरली म्हणाली, ‘राधे, माझ्यात ही पोकळी आहे. माझ्यातलं असं दुसरं काही नाही!त्यामुळे माझ्यातून सर्व आवाज कृष्णाचाच येतो!तुमच्यात तर सारं तुमचंच भरलं आहे!तिथं कृष्णाला जागाच कुठं आहे?राधिके, म्हणून तर तो तुमच्यापासून दूर राहतो. नि मला मात्र ओठांना लावतो बरं का!!’उपासनेचंही अगदी असंच आहे. ‘अहं’धूप जळल्याशिवाय खरी उपासना येत नाही! मग ती देवाची असो वा एखाद्या कलेची!कला आणि साहित्य तर समाजाच्या आतल्या आवाजाचं कुलूप असतं. ज्यांचा संबंध मनाशी, मन:स्वास्थ्याशी असल्यानं उपासनेतही अहंतारहित असणं मोलाचं असतं. निर्मळ मनानं, विनम्र भावानं, प्रसन्न चित्तानं दृढ उपासना चालू ठेवल्यास उपासकाचे हातही चंदनी होतात! दीन-दुबळ्यांच्या सेवेसाठी ते सदैव सज्ज असतात! त्यातून समाजाचं उन्नयन होतं. विचारांतून ‘प्रगल्भता’ आचारातून ‘सहजता’ नि उच्चारातून ‘विनम्रता’ साधण्यास हवी असलेली मनाची ‘शुद्धता’ उपासनेतून मिळते.‘संसारातील त्सुनामी लाटा! भ्रमिष्ट करिती अज्ञ जीवा!आधाराची उपासना ही! अतर्क्य घडवी सारी किमया!!’माणसानं कायम दु:खाची ‘वजाबाकी’ करावी! म्हणजे सुखाची ‘बेरीज’ होते. हेही आपली डोळस उपासना आपल्याला सांगते! दया, प्रेम हीच पूजा-उपासना अंश शिकवते. आज चौकोनी कुटुंब आपापल्या बेटावर स्वत:चं साम्राज्य उभारू पाहत आहे. ज्येष्ठांच्या-आई, वडिलांच्या नात्यातील दुरावा वृद्धाश्रमाची त्यांना वाट दाखवू लागला आहे. नात्यातील विश्वासार्हता टिकविण्यासाठीही आज दृढ उपासना उपयुक्तच ठरणार आहे.‘निर्वैर व्हावे भुतांसवे,साधन बरवे हेचि एक।’जगद्गुरू तुकोबांनी सांगितलेलं उपासनेचं असं ‘निर्वैर’ साधन स्वीकारल्यास साधकाला आत्मसुखाचा लाभ का नाही होणार?