शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

स्वप्न ज्ञानेशांचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:39 IST

भावार्थदीपिका नावांचा चैतन्यदीप महाराष्ट्रीयांच्या नगरी चेतविणाऱ्या ज्ञानियांचा शिरोमणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलीने महाराष्ट्रातील घर नि घर आपल्या विवेक दीपाने उजळून टाकले.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेभावार्थदीपिका नावांचा चैतन्यदीप महाराष्ट्रीयांच्या नगरी चेतविणाऱ्या ज्ञानियांचा शिरोमणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलीने महाराष्ट्रातील घर नि घर आपल्या विवेक दीपाने उजळून टाकले. नऊ हजारांहून अधिक ओव्यांचे आपले देशीकार लेणे महालया नाम नेवासे ग्रासी पूर्णत्वास गेले तेव्हा ज्ञानदेवासारख्या आनंदयोग्याने विश्वात्मक परमेश्वरी शक्ती व विश्वगुरू संत निवृत्तीनाथांच्याकडे पसायदान मागितले. मुळात पसायदान हे उपेक्षितांचा म्होरक्या संत ज्ञानोबा माउलीने विश्वाला कवेत घेणारे भव्य-दिव्य स्वप्न आहे. दु:ख गिळून गोविंदाचे गीत गाण्याची सहनशीलता व्यक्तिमत्त्वामध्ये मुरावी लागते तेव्हा कोठे म्हणता येते-आता विश्वात्मके देवें। येणे वागयज्ञे तोशावें।तोशोनी मज द्यावें। पसायदान हे।।आपल्या अन्तवृत्तीला उर्ध्वगामी करणारी भव्य-दिव्य स्पप्ने पाहणे हा तर माणसाचा स्थायीभाव आहे; परंतु या स्वप्नाला वैयक्तिक द्वेशाच्या इंगळीने कडाडून चावा घेऊ नये. एकदा की या इंगळीने चावा घेतला की स्वप्ने सापासारखी जमिनीवरूनच सरपटू लागतात. त्यांना मुक्ततेचे नभांगण कधी खुणावतच नाही. वैयक्तिक स्वप्नांच्या भोवतीने वैयक्तिक स्वार्थ जेव्हा पिंगा घालू लागतो, तेव्हा आपल्या पलीकडील जग धुसर वाटायला लागले. ज्ञानवंत मात्र ‘स्व’चे विसर्जन करून ‘समष्टीच्या’ कल्याणाचे स्वप्न पाहतात. त्यांच्या मनीचा स्वप्नरूपी पक्षीराज सारे विश्व आनंदाने बहारून जावुं रे अशी गगनाला स्पर्श करणारी स्वप्ने पाहतात. तसे पाहिले तर जन्मापासूनच्या उपेक्षा वाटायला आलेल्या ज्ञानदेवांनी पसायदानाच्या रूपाने पाहिलेले स्वप्न साऱ्या कुंपणापलीकडे भरारी घेण्याचे काम करते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक