शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
3
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
4
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
5
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
6
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
7
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
8
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
9
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
10
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
11
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
12
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
14
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
15
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
16
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; एक तरुण आला आणि...
17
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
18
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
19
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
20
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?

ज्ञानेश्वरी: भावनेचा फुलोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 22:28 IST

माणसाला धीर धरायला सांगतो तो गुरु.. कृपा करणारा देव असतो. 

- विष्णू महाराज पारनेरकरआपेगावला माऊलींचा जन्म झाला, नेवाशाला ज्ञानेश्वरीला जन्म दिला आणि आळंदीला आपण भक्तांना जन्म दिला असा जन्माचा इतिहास जीवनात आपल्याला पहायला मिळतो. जन्म हा विषय फार कमी जणांना माहित आहे. जन्माच्या कथा जन्म घेतल्यानेही कळत नाहीत. श्रीकृष्णाने अर्जुनाला एकच सांगितले की अर्जुना तुझ्या माझ्यात एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुही मनुष्य रूपात आणि मीही मानुष्य रूपात आहे. फक्त फरक एवढाच की मला मागच्या जन्माच्या गोष्टींचे स्मरण आहे. आणि तुला या जन्मातलं किती आठवतं ते माहित नाही. आता तुझे लाड करायचे ठरवले आहे मी. तू आहेस विद्वानासारखा.  पण तुझी अवस्था पाहून गडबड वाटते. जन्माची कथा म्हणालो ती म्हणजे गीतेची सुरूवात शंकर पार्वतीच्या कथेपासून आहे. पार्वतीने शंकराला विचारले तुम्हाला दोन गोष्टी प्रिय आहेत. राम आणि गीता. मला सांगा,  गीता एवढी का महत्त्वाची. भगवान शंकर म्हणाले, तू जशी नित्य नवी आहेस. तशी ही गीता आहे. मला रोज नवी दिसते. ह्या कथेसारखी ज्ञानेश्वरांनी कथेची प्रथा सुरू ठेवली. ज्ञानेश्वरी म्हणजे कथा आहे. प्रत्येक प्रसंग आहे. विद्वानाच्या पद्धतीने आणि पुराणिकांच्या पद्धतीने. भावार्थ दीपिका.तत्वार्थ दीपिका नाही. भाव समजून घ्यायचा असतो.

आज देवाने अकरावा अध्याय दिला. आपण ईश्वरनिष्ठ. ज्ञानेश्वरीइतका ईश्वराचे दर्शन देणारा दुसरा ग्रंथ नाही. श्रीकृष्ण अर्जुनच्या कथेतला प्रसंग सांगतो, त्यात दुर्योधनाने सैन्य मागितले. क्षत्रियाचा धर्मच असतो. मागितले की द्यायचे. धर्म सर्वांचाच असतो. मागितले की द्यायचं हा माणसाचा धर्म आहे. यालाच आपण मन आणि काळ यांचं साहचर्य म्हणतो. काळ ओळखून मागतो आणि मनाला पटो की न पटो आपण द्यायचं असतं. श्रीकृष्णाला अर्जुन म्हणाले, युद्धभूमीवर या.  श्रीकृष्ण म्हणाले, मी सारथी होतो. मात्र प्रसंग उलटाच झाला. अर्जुन घाबरला. मी येऊनही तू घाबरला, घाम फुटला तर कशाला आलास. तुझा स्वधर्म आहे तू लढ.. एवढं सगळं सांगावं लागतं. माणसाची कशी अडचण असते. एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर तिथे येणार्‍या प्रत्येक प्रसंगाला तुम्ही स्वीकारले पाहिजे. प्रत्येक व्यवस्थेला स्वीकारले पाहिजे हा मोठा संदेश आहे.

कथा कशी वाढत जाते. धृतराष्ट्राने संजयला विचारले. माझे पांडव काय करत आहेत. संजय म्हणाले, कोणी आव्हान केले नाही. युद्धात आव्हान करावं लागतं. हे प्रास्ताविक आहे. श्रीकृष्ण-अर्जुन कळणं अत्यंत आवश्यक आहे. माणूस म्हणून अर्जुन कळला पाहिजे. आपण स्वभाव बदलून टाकतो. हा माणसाचा दोष आहे. अर्जुन अनेक दोषांतून माणूस म्हणून अभ्यासावा. कृष्ण जरी एक असला तरी प्रत्येक जण अर्जुन असतो. आपल्या हातून अनेक चुका होतात. नऊ हजार ओव्यांच्या या ग्रंथात माणूस कसा चुकू शकतो आणि देव कसा सांभाळून घेतो हे सांगितलय. चुका पोटात घालायला गुरु. माणूस चुका करत नसतो. त्या होत असतात . एकदा झालेली चूक परत करायची नसते. तसं इथे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, मला विश्वरूप दाखवा ना. श्रीकृष्ण म्हणाले,  तू लाडका आहे म्हणून ऐकतो. गुरु शिष्याचं किती ऐकतो ते यातून समजतं. गीता हा व्यवहाराचा विषय आहे. तत्त्वज्ञानाचा नाही. म्हणून गीता अवघड झाली. प्रत्येक जण आपल्या तर्काप्रमाणे गीता सांगितली. गुरु अंतःकरणाची माणसं दयाळू असतात. आपल्याला काय काम आहे ते ज्याला कळतं त्याला संत म्हणतात. 

भाव सांगितला की गीता कळून जाईल. भाव हा विषय महत्त्वाचा. माणूस भावनिक असतो. भावनाप्रधान होऊ नये म्हणून ज्याची निर्मिती झाली त्याला विचार म्हणतात. भावना भरून आल्या तर विचारानी बांध घालायचा असतो. भावना नदीसारख्या असतात. भावनेचा फुलोरा मतीवरी... ज्ञानेश्वरी म्हणजे भावनेचा फुलोरा आहे. तुम्ही माझ्या प्रत्येक विषयाला अभ्यास म्हणत आहात. अभ्यास हा माझा विषय नाही. तुम्ही अभ्यासाची धास्ती घेतली. पुष्कळ जण त्यामुळे येत नाही. ज्ञानेश्वरी भावनेचा विषय. माणूस ईश्वर संवाद आहे. गुरु शिष्य संवाद आहे. विजय तिथेच जिथे दोघे आहेत.

युद्ध न करणारी पाच मंडळी होती. त्यात संजय होता मात्र त्याला बारिक गोष्ट कळत होती. विश्वरूप दाखवल्यावर संजय खुश झाला. अर्जुन घाबरला. हा रुपाचा विषय आहे. मानुषी रूप अर्जुनाला आवडलं. आपण किती ईश्वर रूप पहायला आतुर असतो. ज्ञानेश्वरांनी शेतात सुखाची लावणी केली. आपण कशी लावणी करतो. तुमचे रूप पाहून माझ्या ह्रदयात सुखाची लावणी झाली आहे.अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाले, मी तुला एवढं दर्शन दिलं तर तू घाबरला. या अध्यायात आधिदैविक पक्ष आहे. काही आधिभौतिक आहे. गीतेची तीनही रूपे आहेत. वेगळेवेगळे काही नाही. गीता का कळत नाही.. आध्यात्मिक आला की आधिभौतिक विषय येतो. ज्ञान कर्म उपासना या बद्दल सांगतात. माझी शंभर रूपे आहेत.  आपण मध्येच तर्काचा विषय म्हणतो. मध्येच विश्वास म्हणतो म्हणजे आधिदैविक रूप.. गुरुच्या ठिकाणी निष्ठा, देवाच्या ठिकाणी श्रद्धा आणि स्वतःच्या ठिकाणी विश्वास असतो. अर्जुनाशी हा संवाद म्हणजे भावार्थ आहे. भाव नाही कळला म्हणजे भांडण असतं. भाव कळला म्हणजे सख्य, प्रेम.मन समजून सांगणं अत्यंत कठीण आहे. आपल्याला कळत नाही ते एकमेकांचं मन. ज्ञान कुणीतरी देत असतं कर्म आपल्याला करावं लागतं.

मानुषरूप आणि ईश्वररूप मी तुला एकत्र दाखवलं असं भगवंत म्हणतात. प्रत्येकात देव असतो. देवरुप कमीजास्त होत असतं. मानुषरूप जास्त प्रगट होत असतं. आपल्याला यशस्वी व्हायचं तर दोन्ही रूपं विकसित व्हायला हवी. हे अकराव्या अध्यायात आहे म्हणून एकावर एक. दोन्ही एक होणं हा पूर्णाद्वैत आहे. गुरु बद्दल बोलावं ते ज्ञानेश्वरांनी.मी जगायचं ठरवलं हे मानुषरूप आणि मनासारखं जगायचं हे ईश्वररूप. ज्ञानेश्वरीत सतरा जन्माच्या कथा आहेत. व्यापकता आहे. अडेलतट्टू पणा हा माणसाचा गुणधर्म आहे. अकराव्या अध्यायाचा विषय गमतीदार आहे. कृष्णाने अर्जुनाला आंधळा अर्जुन म्हटलय.माणसाचं आणि ईश्वराचं दर्शन एकत्र देण्याचं काम ज्ञानेश्वरीने केलय. आपेगावला आल्याशिवाय आळंदीला जायचं नाही. जन्म कळल्याशिवाय पुरूषार्थ कळूच शकत नाही. ही भावार्थ दीपिका नाही पुरुषार्थ दीपिका आहे. माणसाचा देवावर नसला तरी देवाचा माणसावर विश्वास असतो. माणसाचा आत्मविश्वास कमी जास्त होत असतो. ज्यांना आत्मविश्वास वाढवायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी.माऊलींचा जन्म होतोय असा भाव ठेवा. आपला आणि ईश्वराचा जन्म यातूनच कळेल. आपल्यात जी शक्ती आहे त्याला जन्माला घालायचं तर भाव लागतो. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी.. ईश्वरनिष्ठांनाच मिळतं. गीतेने तहान लागते आणि ज्ञानेश्वरीने ती तहान शमते. आपल्याला वाटतं की अज्ञान शिल्लक राहिले नाही.

जन्माचा विषय म्हणजे सुखाचा विषय. अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ देवविद्येचा आहे. आनंदाची भूमिका नेहमीसाठी असेल तर सुखी होतो.ज्ञानेश्वरी वाचा. ईश्वरी रूपाने माणूस पहा आणि मानुषरूपाने ईश्वर पहा. आपण ईश्वर विसरलोय. पूर्णवादाला हेच नीट  करायचं आहे.माणसाला धीर धरायला सांगतो तो गुरु.. कृपा करणारा देव असतो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक