शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

जाळं या कोळ्याचं नि जाळं त्या कोळ्याचं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 4:39 PM

या कोळ्याच्या जाळ्याचं नि त्या मासे मारणाऱ्या कोळ्याच्या जाळ्याचं एक वैशिष्ट्य समान असतं. कोणताही एक धागा ओढला तरी साऱ्या जाळ्यात ताण जाणवतो. इतकं ते जाळं आतून घट्ट जोडलेलं असतं.

- रमेश सप्रेतुमच्या मनात आलंच असेल ‘हा कोळी कोण नि तो कोळी कोण?’खरंच आहे. हा कोळी म्हणजे आपल्या घरातला कोळी-स्पायडर! आणि तो कोळी म्हणजे मासे मारणारा कोळी-फिशरमन. मराठीत दोन्ही कोळ्यांचं ‘जाळं’ असलं तरी इंग्रजीत मात्र घरातल्या कोळ्याच्या जाळ्याला म्हणतात ‘वेब’ तर मासेमारी करणा-या कोळ्याच्या जाळ्याला म्हणतात ‘नेट’.दत्तगुरूंनी घरातल्या कोळ्याला गुरू केलं. त्याच्याकडून अलिप्तता, कशातही न अडकणे हा गुण घेतला. बघा ना, कोळी जाळं बांधण्यासाठी बाहेरचा कोणताही पदार्थ वा आपल्यासारखं दगड-विटा-सिमेंट असं साहित्य वापरत नाही. त्याच्या नाभीतून जो स्नव (चिकट द्रव पदार्थ) बाहेर पडतो त्यापासून अतिशय सूक्ष्म असा धागा बनवून त्यापासून कोळी आपलं जाळं विणतो. त्यात सुखरूप इकडून तिकडे अलगद प्रवास करतो. स्वत: कधीही आपल्या जाळ्यात अडकत नाही वा घसरून पडत नाही. इतर बारके कीटक जाळ्यात सापडतात तेच या कोळ्याचं भक्ष्य. कोळ्याला संस्कृतमध्ये ‘ऊर्णनाभी’ म्हणजे नाभीतून तंतू बाहेर काढणारा असा शब्द आहे.काही जातीच्या  कोळ्यांचं आणखी एक वैशिष्ट्य दत्तात्रेयांच्या ध्यानात आलं, ते म्हणजे त्या कोळ्याला आपल्या मृत्यूची पूर्वसूचना मिळते. त्याप्रमाणे आपलं जाळं आपणच गिळून तो खाली पडतो. मरतो नि मातीत मिसळून जातो. स्वत:ची कोणतीही वस्तू वा खूण मागे ठेवत नाही. असं मरण तर एखाद्या मुक्त होणाऱ्या योग्यालाच लाभतं. हे सारं पाहून दत्तगुरूंनी त्याला गुरू मानून मनोमन नमस्कार केला.या कोळ्याच्या जाळ्याचं नि त्या मासे मारणाऱ्या कोळ्याच्या जाळ्याचं एक वैशिष्ट्य समान असतं. कोणताही एक धागा ओढला तरी साऱ्या जाळ्यात ताण जाणवतो. इतकं ते जाळं आतून घट्ट जोडलेलं असतं.हे साम्य सोडलं तर या दोन्ही जाळ्यात खूप महत्त्वाचे भेद आहेत. एक म्हणजे या कोळ्याचं जाळं (नेट) हे कृत्रिम असतं. तयार करण्यासाठी त्याला पूर्वी सुताचा दोरा आता नायलॉनचा धागा लागतो. या जाळ्याचा उपयोग मासे पकडण्यासाठी केला जातो. म्हणजे तसं हेही जाळं उदरनिर्वाहासाठीच वापरलं जातं. फक्त आवश्यकतेपेक्षा अधिक पैसा मिळाल्यामुळे व्यवसायाचं जाळं, शाखा वाढू लागतात. इतक्या की त्यात तो कोळीच अडकून पडतो.कोळी हे एक उदाहरण आहे. कोणताही व्यावसायिक एकापेक्षा अनेक ठिकाणी गुंतून पडतो. मन:शांती तर सोडाच शांत होण्यासाठी त्याच्याकडे वेळ उरत नाही. एखाद्या यंत्रासारखा तो आपल्या जाळ्याचा विस्तार (नेटवर्क) वाढवत राहतो नि त्यात अडकून त्याचा गुलाम बनून जीवनातील स्वातंत्र्य, उत्स्फूर्तता गमावून बसतो. एवढा अशांती, अतृप्ती, असमाधानाचा अनुभव येऊनही त्याचं व्याप वाढवणं थांबत नाही. स्वत:च्याच कृतीचा तो गुलाम बनतो.या जाळ्यातून व्याप, उपद्व्याप यांच्या चक्रातून सुटायचं असेल तर काय करायचं? स्वामी रामकृष्ण परमहंसांची एक बोधकथा या संदर्भात खूप प्रभावी आहे.कोळी जलाशयात जाऊन दूरवर जाळं फेकतो. काही वेळ तसंच ठेवून ते ओढून घेतो. तेव्हा दूरचे मासे जाळ्यात अडकतात. फक्त तेच मासे जाळ्याच्या कक्षेत असूनही जाळ्यात सापडत नाहीत जे जाळं फेकणा-या कोळ्याच्या पायाजवळ असतात. याचप्रमाणे सद्गुरू किंवा परमेश्वराच्या पायाशी रमणारे भक्त मात्र संसारातील सारी कर्तव्यं असतानाही प्रपंचात गुरफटत नाहीत, संसारातील देहभोगात गुंतून पडत नाहीत. आणखी एक जाळं सध्या खूप म्हणजे खूपच लोकप्रिय आहे. अनेक संगणक (कॉम्प्युटर्स) एकमेकाला जोडून तंत्रज्ञानानं एक महाजाल (इंटरनेट) तयार केलंय. अक्षरश: जीवनाच्या सर्व अंगाशी संबंधित असलेल्या सर्व विषयांची, क्षेत्रांची, इतिहास-संस्कृतीची, विज्ञान-तंत्रज्ञानाची सर्व माहिती या महाजालामुळे उपलब्ध झालीय. एका क्लिकमध्येही ही माहिती कुणालाही मिळू शकते. आजच्या माहिती युगाचं अवतरण या महाजालातील माहिती ज्ञानाच्या आदान प्रादानानं शक्य झालंय. एक वाईट गोष्ट म्हणजे नातवंडांपासून-आजी आजोबांपर्यंत सर्व वयोगटातील असंख्य माणसं यात उपलब्ध असलेल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रॉम अशा समाज माध्यमात आकंठ बुडून गेली आहेत. त्यातून वाईट, ईल माहितीच्या विळख्यात सर्व मानवजात अडकलीय असं म्हणणं गैर होणार नाही. अर्थात विधायक, विकास घडवायला उपयुक्त असलेली माहितीही अनेक जण मिळवतात. स्मार्ट फोनच्या द्वारा अक्षरश: ‘सारी दुनिया मेरी मुठ्ठीमें ’ हे नुसतं जाहिरातीतलं घोषवाक्य नाही तर आजच्या जीवनशैलीचं प्रतीक बनलं आहे. या जाळ्याची (इंटरनेटची) अतिव्यसनाधीनता (अॅडिक्शन) झालेली उदाहरणं गल्लोगल्लीतच नव्हे तर घरोघरीही पाहण्यात येऊ लागलीयत. ‘संगणक महाजाल (इंटरनेट) हा मित्र की शत्रू यावर अजूनही वाद होतातच. प्रत्यक्षात कोणत्याही वैज्ञानिक शोधाचे उपयोग नि दुरुपयोग असतातच. म्हणून महत्त्व येतं ते ही साधनं वापरणा-या व्यक्तीलाच. आपण संयमपूर्वक विधायक कामांसाठी महाजालाचा उपयोग करायला हवा. जीवनाच्या विध्वंसासाठी नव्हे.एक विशेष गोष्ट अशी की आपण जरी माहितीसाठी नेट (इंटरनेट) वापरत असू तरी प्रत्यक्ष माहिती मिळते ‘वेब (वर्ल्ड वाइडवेब www) मधूनच. नेटपेक्षा वेब महत्त्वाचं आहे हेच खरं. प्रसिद्ध वैज्ञानिक विचारवंत काप्रा यांचं एक पुस्तक आहे ‘वेब ऑफ लाईफ’ जीवनाचं जाळं- विशेषत: आपल्या घरातील संबंधांचं असं जाळं, असा गोफ विणला तर शांती, आनंद यांचा नित्य अनुभव येईल. ज्ञानोबांचं पसायदान प्रत्यक्षात साकारेल-भूतां परस्परें जडो मैत्र जीवांचे।